टॉप न्यूज़महाराष्ट्र

भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर

धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 28/04/2026 📞  8850212023
मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर

मुंबई NHI24.COM(M) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधानपरिषदेत जावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर शिंदे गटाकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजपाने या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादा जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे यावेळीदेखील भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत पक्षात बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील बऱ्याच बड्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. परंतु भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपाने यावेळी माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता सातव यांनादेखील विधानपरिषदेचे तिकीट देण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात काम करणाऱ्या चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. यात विवेक कोल्हे यांच्या रुपात फक्त एक नाव नवे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्नेहलता कोल्हे यांना पक्षश्रेष्ठीने विश्वासात घेतलं होतं. तुमचा पुढील काळात योग्य तो सन्मान केला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. विवेक कोल्हे हे स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. त्यांना आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे.

प्रमोद जठार हे कोकणाच्या राजकारणातील प्रमुख नावांपैकी एक आहे. ठाण्यामधून माधवी नाईक यांनाही संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या भाजपाच्या महामंत्री म्हणून पक्षाचे काम केलेले आहे. महिलांचे प्रतिनिधीत्त्व म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली आहे. संजय भेंडे यांनीही पक्षासाठी काम केलेले आहे. सुनील कर्जतकर यांच्याकडे आरएसएस म्हणजेच संघाचा एक चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनाही भाजपाने यावेळी संधी दिली आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे. सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं यातून स्पष्ट होते. परंतु विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र नंबर लागू शकलेला नाही.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारत संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील हे आमदार निवृत्त होत आहेत.

निवृत्त आमदारांचा पत्ता कट झाला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारत संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार  निवृत्त होत आहेत.

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राणा आणि कडू यांच्यात काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यानरवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.  बच्चू कडून यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी रवी राणा मदत करणार का याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!