Uncategorizedटेक्नोलॉजी

सॅमसंगकडून गॅलेक्सी एस२६ सिरीजच्या अर्ली डिलिव्हरीची घोषणा

सॅमसंगकडून गॅलेक्सी एस२६ सिरीजच्या अर्ली डिलिव्हरीची घोषणा

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 11/03/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M)  : : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतातील डिवाईसेस प्री-बुक केलेल्‍या ग्राहकांसाठी त्‍यांची सर्वात प्रगत एआय-संचालित स्‍मार्टफोन श्रेणी गॅलेक्‍सी एस२६ सिरीजच्‍या अर्ली डिलिव्‍हरींची घोषणा केली.

एस२६ अल्ट्रा, एस२६+ व एस२६ हे स्‍मार्टफोन असलेल्‍या गॅलेक्‍सी एस२६ सिरीजमध्‍ये जगातील मोबाइल फोन्‍ससाठी पहिला बिल्‍ट-इन प्रायव्‍हसी डिस्‍प्‍ले आहे, जो एजेंटिक एआयच्‍या माध्‍यमातून अद्वितीय डिस्‍प्‍ले अनुभव देतो. एजेंटिक एआय नेहमीच्‍या टास्‍क्‍सची हाताळणी करते, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍यासाठी महत्त्वाच्‍या असलेल्‍या गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करू शकतात.

क्‍वॉलकॉम स्‍नॅपड्रॅगन ८ एलाइट जेन ५ प्‍लॅटफॉर्मची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्रा सीपीयू, जीपीयू व एनपीयू कार्यक्षमतेमध्‍ये मोठ्या वाढीची खात्री देतो. या स्‍मार्टफोनची जाडी फक्‍त ७.९ मिमी आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये सुपर फास्‍ट चार्जिंग ३.० देखील आहे, ज्‍यामुळे स्‍मार्टफोन फक्‍त ३० मिनिटांमध्‍ये ७५ टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होतो.

गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्राच्‍या कॅमेऱ्यामध्‍ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत, जेथे अंधुक प्रकाशात अधिक सुस्‍पष्‍ट फोटोग्राफीसाठी व्‍यापक अपेचर्स, तसेच अंधुक प्रकाशात आकर्षक, सुस्‍पष्‍ट फूटेजसाठी सुधारित नाइटोग्राफी व्हिडिओ आहे. यामधील अपग्रेडेड सुपर स्‍टेडी तंत्रज्ञान व्हिडिओ कॅप्‍चर करताना स्थिर फ्रेमिंगची खात्री देते. सेल्‍फी कॅमेऱ्यामध्‍ये एआय आयएसपी सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामधून मिश्र प्रकाशात नैसर्गिक स्किन टोन्‍स व सुस्‍पष्‍टतेची खात्री मिळते. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, हा डिवाईस हाय-क्‍वॉलिटी व्हिडिओच्‍या कार्यक्षम कम्‍प्रेशनसाठी अॅडवान्‍स्‍ड प्रोफेशनल व्हिडिओ (एपीव्‍ही) मानक असलेला पहिला गॅलेक्‍सी आहे.

या सिरीजमध्‍ये एआय एडिटिंग टूल्‍स असण्‍यासोबत सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जसे नाऊ ब्रिफ आणि सुधारित सर्कल टू सर्च. तसेच बिक्‍सबी, जेमिनी व परप्‍लेक्सिटी सारख्‍या एजंट्ससह एकीकरण आहे. सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे, जेथे डिवाईसेसमध्‍ये प्रायव्‍हेट अल्‍बम, नॉक्‍स मॅट्रिक्‍स प्रोटेक्‍शन, ओएस अपग्रेड्सचे सात जनरेशन्‍स आणि सात वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत.

गॅलेक्‍सी एस२६ सिरीज भारतात आघाडीचे ऑनलाइन व मुख्‍य रिटेलर्सकडे १० मार्च २०२६ पर्यंत प्री-ऑर्डर्ससाठी उपलब्‍ध आहे. गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्राची किंमत १,३९,९९९ रूपयांपासून सुरू होते, तर गॅलेक्‍सी एस२६+ ची किंमत १,१९,९९९ रूपयांपासून सुरू होते. सर्वात किफायतशीर एस२६ बेस व्‍हेरिएण्‍टची किंमत ८७,९९९ रूपयांपासून सुरू होते.

या तिन्‍ही मॉडेल्‍समध्‍ये युनिफाईड डिझाइन शैली आहे, तसेच कोबाल्‍ट व्‍हायोलेट, व्‍हाइट, ब्‍लॅक व स्‍काय ब्‍ल्‍यू या आकर्षक रंगांमध्‍ये येतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!