महाराष्ट्रराजनीति

डिजिटल नारी उपक्रमाने महाराष्‍ट्रात लखपती दीदी मोहिमेला गती दिली, दुर्गम भागांपर्यंत सेवा उपलब्‍ध करून दिल्‍या

ग्रामीण व अर्ध-शहरी समुदायांमधील महिला-नेतृत्वित उत्‍पन्‍न वाढीला पाठिंबा

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 04/02/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) : महाराष्‍ट्रात लखपती दीदी मोहिमेअंतर्गत महिला-नेतृत्वित उद्योजकतेला गती मिळत आहे, जेथे ग्रामीण व अर्ध-शहरी भागांमधील महिलांना स्थिर व सुनियोजित उत्‍पन्‍न स्रोत निर्माण करण्‍यासाठी सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. राज्‍याचे १ कोटी लखपती दीदी घडवण्‍याचे लक्ष्‍य आहे. आतापर्यंत ३८ लाखांहून अधिक महिलांनी हा टप्‍पा गाठला आहे, तसेच आणखी ५६ लाख महिलांना संभाव्‍य लाभार्थी म्‍हणून ओळखण्‍यात आले आहे. डिजिटल आजीविका प्‍लॅटफॉर्मवर २.४ कोटी महिलांनी केलेल्‍या नोंदणीमधून त्‍यांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग दिसून येतो, तसेच अनेक महिला विश्वसनीय व स्‍थानिक पातळीवर उपलब्‍ध असलेल्‍या उपजीविका संधींचा शोध घेत आहेत. या सर्वसमावेशक क्षेत्रात पेनीअरबायचा डिजिटल नारी उपक्रम महिलांना त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये सातत्‍यता राखण्‍यास मदत करत आहे, जेथे त्‍यांना त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये सहाय्यक आर्थिक व डिजिटल सेवा प्रदाते बनण्‍यास सक्षम करत आहे.
नोंदणीवरून शाश्वत उत्‍पन्‍नाकडे भर दिला जात असताना विशेषत: उत्‍पन्‍नाचे मर्यादित स्रोत असलेल्‍या लहान शहरांमध्‍ये व गावांमध्‍ये डिजिटल नारी उपक्रम दैनंदिन सेवांसाठी स्‍थानिक मागणीला दुर्गम भागांपर्यंत कमिशन-आधारित उत्‍पन्‍न संधींमध्‍ये बदलत आहे.
पेनीअरबायचा डिजिटल नारी उपक्रम महिलांना साध्या तंत्रज्ञान व सुनियोजित प्रशिक्षणासह सुसज्‍ज करतो, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये सहाय्यक आर्थिक व डिजिटल सेवा देता येतात. प्रत्‍येक डिजिटल नारी ‘बँकर नारी’ म्‍हणून ओळखली जाते, जी खाते उघडणे, खात्‍यामधून पैसे काढणे, पैसे पाठवणे, बिल देयके भरणे, विमा, क्रेडिट, आरोग्‍य व स्‍वच्‍छता सेवा आणि म्‍युच्‍युअ फंड्स अशा आवश्‍यक सेवा देते. प्रत्‍येक व्‍यवहारावर कमिशन मिळते, ज्‍यामुळे महिला स्थिर उत्‍पन्‍न निर्माण करण्‍यास आणि तळागाळापर्यंत आवश्‍यक सेवा उपलब्‍ध करून देण्‍यास सक्षम होतात.
पेनीअरबायच्‍या सीएमओ व डिजिटल नारीच्‍या प्रोग्राम डायरेक्‍टर जयत्री दासगुप्‍ता म्‍हणाल्‍या, ”महाराष्‍ट्रात लखपती दीदी मोहिमेच्‍या दिशने वाटचाल सुरू असताना दुर्गम भागांपर्यंत सतत उत्‍पन्‍न निर्माण करून देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. महिला एजंट्स कुटुंबांना नियमितपणे गरजेच्‍या असलेल्‍या आवश्‍यक सेवा देत आहेत, ज्‍यामुळे वारंवार व्‍यवहार होण्‍यासह कमिशन-आधारित उत्‍पन्‍न मिळत आहे. आमची सुनियोजित प्रशिक्षण व सहजसाध्य तंत्रज्ञान प्रदान करण्‍याची भूमिका आहे, ज्‍यामुळे महिला स्थिर उत्‍पन्‍न निर्माण करू शकतात आणि त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये विश्वसनीय आर्थिक सेवा देऊ शकतात.”
महाराष्‍ट्रात बचत गटाचे व्‍यापक नेटवर्क आहे, अनेक महिला आधीच औपचारिक बँकिंग यंत्रणा आणि उदरनिर्वाह उपक्रमांशी जोडलेल्‍या आहेत. स्‍थानिक पातळीवर उपलब्‍धहोण्‍याजोग्या, मागणदायी सेवा मॉडेल्‍सच्‍या माध्‍यमातून या सहभागाला सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न संधीमध्‍ये बदलण्‍यासाठी हा पुढाकार घेण्‍यात आला आहे.
गडचिरोलीमधील नूतन यांच्‍या अनुभवामधून निदर्शनास येते की, उत्‍पन्‍नाची संलग्‍न सेवा मॉडेल्‍स कुटुंबाच्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये स्थिरता आणू शकतात. पूर्वी हंगामी कृषीवर अवलंबून असलेल्‍या त्‍या त्‍यांच्‍या बचत गटाच्‍या माध्‍यमातून डिजिटल नारी उपक्रमामध्‍ये सामील झाल्‍या आणि स्‍वत:च्‍या गावामध्‍ये सहाय्यक बँकिंग सेवा देण्‍यास सुरूवात केली. आज त्या २५० हून अधिक कुटुंबांना मदत करत आहेत. विशेषतः सरकारी अनुदानाचे वाटप होते, तेव्हा त्या गावकऱ्यांना सोयीसुविधा देतात. यामुळे गावातील रहिवाशांना मुलभूत आर्थिक व्यवहारांसाठी लांबचा प्रवास करण्याची गरज भासत नाही. या अतिरिक्‍त कमिशन उत्‍पन्‍नामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे आणि गावात विश्वासार्ह सेवा प्रदाता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
अशा प्रकारचे परिवर्तन नाशिकमध्‍ये देखील दिसून येते, जेथे दिपाली यांनी गृहिणी असण्‍यापासून स्‍वत:चे सहाय्यक सेवा केंद्र चालवण्‍यापर्यंत यशस्‍वी प्रवास केला. डिजिटल नारी उपक्रमामध्‍ये सामील झाल्‍यानंतर त्‍यांना पैसे हस्‍तांतरण व बिल देयके भरणे अशा सेवांच्‍या माध्‍यमातून नियमितपणे उत्‍पन्‍न मिळू लागले. या सेवेमुळे त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ झाली आहे, तसेच त्‍यांच्‍या समुदायामध्‍ये आर्थिक सेवा सुलभपणे उपलब्‍ध करून देणाऱ्या म्‍हणून त्‍यांची ओळख निर्माण झाली आहे.
राज्‍यभरात आपली पोहोच वाढवण्‍यासाठी पेनीअरबाय स्‍टेट रूरल लाइव्हलीहूड मिशन्‍स, बचत गट महासंघ, सूक्ष्‍म आर्थिक संस्‍था आणि विकास संस्‍थांसोबत काम करते. हे सहयोग महिलांना उपक्रमामध्‍ये सामील करणे, त्‍यांना सुनियोजित प्रशिक्षण देणे आणि औपचारिक आर्थिक नेटवर्कमध्‍ये एकीकृत करणे यासंदर्भात मदत करतात.
महाराष्‍ट्र आपल्‍या लखपती दीदी ध्‍येयाच्‍या दिशेने वाटचाल करत असताना डिजिटल नारी उपक्रम डिजिटल उपलब्‍धता आणि कमिशन-आधारित उद्योजकतेला एकत्र करत प्रत्‍यक्ष अंमलबजावणीला साह्य करत आहे. हा उपक्रम अधिकाधिक महिलांना स्थिर उत्‍पन्‍न निर्माण करण्‍यास, स्‍थानिक पातळीवर आवश्‍यक सेवा उपलब्‍ध करून देण्‍यास आणि राज्‍याच्‍या आर्थिक विकासामध्‍ये अधिक सक्रियपणे सहभाग घेण्‍यास सक्षम करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!