हम डेव्हलपर्स’च्या वतीने कांदिवली पश्चिम मेट्रो स्टेशनचे नामकरण
मुंबईतील शहरी रिअल इस्टेट विकासाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 24/02/2026 📞 8850212023
मुंबईस्थित रियल इस्टेट विकासकातर्फे सुमारे 10 लाख चौरस फूट क्षेत्रासह उपनगरी पाऊलखुणांचा विस्तार सध्या विकासाधीन
मुंबई NHI24.COM(M) – दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या मुंबईतील प्रमुख रिअल इस्टेट डेव्हलपर ‘हम डेव्हलपर्स’ने आज शहरी संपर्कजाळ्याला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला. कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकाचे “हम डेव्हलपर्स-कांदिवली वेस्ट” असे अधिकृत नामकरण करण्यात आले. हे धोरणात्मक पाऊल मुंबईच्या विकासासाठी हम डेव्हलपर्स’ची दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते आणि शहराच्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये, विशेषतः त्याच्या सर्वात गतिमान पश्चिमी उपनगरीय मार्गिकांपैकी एकामध्ये गुंतवणुकीचा एक नाविन्यपूर्ण प्रकार दर्शवते.
कांदिवली मेट्रो स्टेशनवरील रिब्रँडिंग उपक्रम हा एकात्मिक आणि कार्यक्षम शहरी जोडणी निर्माण करण्याच्या हम डेव्हलपर्सच्या दृष्टीकोनाचा पुरावा म्हणता येईल. कांदिवली, एक प्रमुख क्षेत्र जेथे कंपनीची प्रस्थापित उपस्थिती असून लक्षणीय विकासाचा विस्तार करत आहे. मेट्रो स्थानकाशी असलेला हा दृश्यमान संबंध मुंबईच्या शहरी उत्क्रांतीमध्ये योगदान देण्याच्या हम डेव्हलपर्सच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.
‘हम डेव्हलपर्स’चे व्यवस्थापकीय संचालक चिंतन मणियार म्हणाले, “दोन दशकांहून अधिक काळापासून,’ हम डेव्हलपर्स ‘हे नाविन्यपूर्ण संशोधन, शाश्वतता आणि उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांद्वारे मार्गदर्शित मुंबईचे परिदृश्य बदलण्यासाठी समर्पित आहे. कांदिवली मेट्रो स्थानकाचे नव्याने नामकरण हे या शहराशी आणि तेथील समुदायांशी असलेल्या आपल्या संबंधांचे स्पष्ट प्रतीक आहे. हा उपक्रम मुंबईच्या शहरी विकासाप्रती आमची बांधिलकी दर्शवतो. तसेच धोरणात्मकदृष्ट्या आमचा ब्रँड दैनंदिन शहरी जीवनाच्या केंद्रस्थानी, सूक्ष्म बाजारपेठेत ठेवतो . हीच आमची ओळख आहे. हे केवळ ब्रँड दृश्यमानतेबद्दल नसून हजारो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष योगदान देण्याबद्दल आहे.”
खासगी क्षेत्रातील संस्था ब्रँडिंग आणि वर्धित उपक्रमांद्वारे सार्वजनिक जागांशी कशा प्रकारे संलग्न होऊ शकतात यासाठी हे सहकार्य एक महत्त्वपूर्ण उत्क्रांती दर्शवते. वाहतुकीचे जाळे सुधारून तसेच निवासी मागणीत वाढ करून, चांगल्या प्रकारे जोडलेला सूक्ष्म बाजार म्हणून कांदिवली पश्चिमचा उदयही या पुनर्नामकरणातून अधोरेखित होतो. आपला ब्रँड हा मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा असलेल्या पर्यायाल जोडून, हम डेव्हलपर्स एक अग्रगण्य विकासक म्हणून आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. हम डेव्हलपर्सने पश्चिम उपनगरांच्या विकसित शहरी ओळखीमध्ये सखोल गुंतवणूक केली आहे.
हम डेव्हलपर्सने दहिसर, बोरीवली, कांदिवली, मलाड आणि शेजारच्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थिती स्थापित केली आहे. जवळपास 15 हून अधिक पूर्ण झालेले प्रकल्प आणि 10 हून अधिक चालू तसेच आगामी घडामोडींसह, कंपनी वेळेवर वितरण, दर्जेदार बांधकाम आणि विचारपूर्वक नियोजित मांडणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखली जाते. या बांधिलकीमुळे हम डेव्हलपर्सने 2,000 हून अधिक कुटुंबांचा विश्वास संपादन केला आहे.
हम’च्या घडामोडींची रचना आधुनिक जीवनमान, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन मूल्य यांच्यात समतोल साधण्यासाठी, धोरणात्मकदृष्ट्या जोडलेल्या उपनगरीय ठिकाणी विश्वासार्ह जागा शोधणाऱ्या घर खरेदीदारांची पूर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनी विविध सीएसआर उपक्रमांद्वारे समाजासाठी सक्रियपणे योगदान देते.
हम डेव्हलपर्स’चे चालू असलेले तीन प्रकल्प- हम सोलारिस (कांदिवली पश्चिम), हम गगनसागर (बोरीवली पश्चिम) आणि हम दुर्गा (दहिसर पूर्व)-पुढील सहा महिन्यांत पूर्ण होतील. ज्यामुळे वेळेवर वितरण करण्याच्या त्यांच्या मजबूत ट्रॅक रेकॉर्डला बळकटी मिळेल.



