भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये दाखल;भारताने उपांत्य फेरीत रचले विक्रम
भारताने उपांत्य फेरीत रचले विक्रम

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 00/02/2026 📞 8850212023
वैभव सूर्यवंशी आणि जॉर्जच्या वादळापुढे अफगाणिस्तानची दाणादाण
भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव केला. अफगाणिस्तानने 311 धावांचं लक्ष्य दिलं असताना, वैभव सूर्यवंशीच्या वादळाने त्यांची दाणादाण वाढवली.
मुंबई NHI24.COM(M): भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव केला. अफगाणिस्तानने 311 धावांचं लक्ष्य दिलं असताना, वैभव सूर्यवंशीच्या वादळाने त्यांची दाणादाण वाढवली. वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावा केल्या. या खेळीनंतर अफगाणिस्तानने दिलेले 311 धावांचं लक्ष्यही भारतीय संघासमोर ठेंगणं वाटू लागलं होतं. भारताने 41.1 ओव्हरमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केलं. 7 गडी राखून भारताने हा सामना जिंकत दिमाखात फायलनमध्ये प्रवेश केला आहे.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह काही विक्रमांना गवसणी घातली आहे.


अंडर-19 वर्ल्डकपचा अंतिम सामना 6 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला होता.
वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. वैभवने केवळ 24 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. तथापि, वैभव त्याच्या अर्धशतकानंतर जास्त काळ टिकला नाही. त्याने 33 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 68 धावा केल्या. एरॉन जॉर्ज शेवटपर्यंत टिकला आणि 104 चेंडूत 115 धावा केल्या.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने 4 गडी गमावत 310 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. उस्मान सादत आणि खालिद अहमदझाई यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. दीपेश देवेंद्रनने खालिदला (31) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर उस्मान सादत आणि फैसल शिनोजादा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या.
फैसल शिनोजादा आणि उजैरुल्लाह नियाझाई यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. शिनोजादा यांनी 93 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा केल्या. उजैरुल्लाह नियाझाईने 86 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. भारतीय संघाकडून कनिष्क चौहानने सर्वाधिक 2 विकेट बळी घेतले.




