मध्य प्रदेशमहाराष्ट्र

ब्रिटानिया न्यूट्रीचॉईस आणि आमिर खान एकत्र, एक चांगली निवड पुढचे निर्णय सोयीचे बनवते हे सांगणार

ब्रिटानिया न्यूट्रीचॉईस आणि आमिर खान एकत्र,

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 21/01/2026 📞  8850212023

                                                                                                ~ब्रिटानिया न्यूट्रीचॉईसतर्फे १०० टक्के धान्य सफरचंद दालचिनीच्या चवीच्या कुकीजही सादर~

मुंबई NHI24.COM(M)  आज तुम्ही चहा मध्ये साखर टाकाल की नाही? ब्रिटानिया न्यूट्रीचॉईस हा भारतातील एक आघाडीचा बिस्किट ब्रँड आहे. या ब्रँडने अशा रोजच्या आयुष्यातील छोट्या पण चांगल्या निवडींबाबत एका नव्या संवादाची सुरुवात केली आहे. एक चांगला निर्णय पुढचा चांगला निर्णय घेणं सोपं करतं हा या संवादाचा गाभा आहे. एक साधीशी कल्पना तुमच्या पुर्ण दिवसावर एखादा छोटासा निर्णय कसा प्रभाव टाकतो, हे यातून कळतं. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आमिर खान आता ब्रँडचा चेहरा म्हणून पुढे आले आहेत. या नव्या जाहिरातीत ते या मूळ संकल्पनेला आपल्या चार्म आणि सहजसुंदर विनोदाने अधिकच खुलवतात.

लोव लिंटासने ही संकल्पना मांडली आहे. या जाहिरातींमध्ये फक्त एखाद्या घटनेवर भर न देता एकुणच एक चांगला निर्णय तुमच्या विचारांमध्ये कसा बदल घडवतो, हे दाखवण्यात आले आहे. एक चांगला निर्णय पुढच्या गोष्टींना गती देतो, पुढचे निर्णय त्यामुळे फार सहज आणि नैसर्गिक वाटू लागतात, हे या फिल्म्समध्ये दाखवण्यात आले आहे. रोजच्या आयुष्यातले नेहमीचे काही प्रसंग आाणि आमिरचा स्क्रीनवरील सहज वावर यातून ही जाहिरात आपल्याला सांगते की एक छोटासा पण चांगला निर्णय रोजच्या आयुष्यातले निर्णय सहज बनवतो.

ब्रिटानिया न्युट्रीचॉईसतर्फे विविध प्रकारच्या आवडींसाठी विविध प्रकारच्या कुकीज उपलब्ध आहेत. या उत्पादन यादीत १०० टक्के पिठापासून बनवलेल्या ( मैदा नसलेल्या)  न्युट्रीचॉईस डायजेस्टिव आणि न्युट्रीचॉईस ओट्स अॅण्ड मिलेट्स चा नवा अवतार म्हणजेच मिलेट पीठापासून बनलेली बिस्किटे तीन वेगवेगळ्या चवींमध्ये उपलब्ध आहेत.

उत्पादन यादीत अधिक भर घालत ब्रिटानिया न्युट्रीचॉईसने 100% Millets सफरचंद दालचिनी चवीच्या कुकीज सादर केल्या आहेत. या कुकीज १०० टक्के धान्याच्या पिठापासून बनवल्या आहेत आणि त्यात मुख्य घटक आहे ज्वारी. उत्तम घटकांनी बनलेल्या स्नॅक्सला दररोजच्या आयुष्यात प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांना या कुरकुरित आणि चविष्ट कुकीज नक्कीच आवडतील. शिवाय यात राळे आणि नाचणीची वैशिष्ट्येही मिळतात. या कुकीजमध्ये साधे आणि विचारपूर्वक तत्वज्ञान वापरण्यात आले आहे ( अतिरिक्त साखर नाही, मैदा नाही आणि पाम तेल नाही), त्यामुळे चटकन स्नॅक्स हवे असल्यास हा अगदी सोयीस्कर पर्याय आहे. १०० ग्रॅमच्या पॅकसाठी ५५ रु. अशी किंमत असलेल्या या कुकीज महत्त्वाच्या शहरांमधील सर्व आधुनिक ट्रेड स्टोअर्स आणि आघाडीच्या ई-कॉमर्स व्यासपीठांवर उपब्लध आहेत.

या सहकार्याबद्दल आमिर खान म्हणाले, “या जाहिरातीतील मूळ विचार फार खरा आणि सहज आहे, हे मला फार आवडलं. आपण सगळेच दररोज फारसा विचार न करता छोटे-छोटे निर्णय घेत असतो. पण, ही संकल्पना तुम्हाला सांगते की तुमचा एक चांगला निर्णय पुढचे निर्णय घेणं सोपं बनवतं आणि त्यातून तुमच्या दिवसाचा कलच हळूहळू बदलतो. ब्रिटानिया न्युट्रीचॉईसला लोकांसोबत हलकाफुलका, प्रामाणिक संवाद साधायचा आहे. मला हेच फार भावलं. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असल्याने या फिल्म्स करणं ही फार आनंदाची बाब ठरली.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!