कॅम्पसचे नवे पाऊल! लॉन्च केले ॲथलेझर अपेरल, तरुणाईला स्वतःची ओळख जपण्यासाठी आणि स्वतःची शैली मांडण्यासाठी मिळणार नवा ‘कॅनवास’
कॅम्पसचे नवे पाऊल! लॉन्च केले ॲथलेझर अपेरल

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 15/01/2026 📞 8850212023
Mumbai,NHI24.COM(M): स्पोर्ट्स आणि ॲथलेझर फूटवेअर क्षेत्रातील भारतातील एक आघाडीचा ब्रँड ‘कॅम्पस ॲक्टिव्हवेअर’ने ‘अॅथलेझर अपेरल’ (कपडे) श्रेणीत प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. तरुणांना आपली स्टाईल अधिक चांगल्या प्रकारे मांडता यावी, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या आजवरच्या दीर्घ प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, ग्राहकांसाठी सतत काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशातून हा बदल करण्यात आला आहे.
कॅम्पस भारताच्या धाडसी, उत्साही आणि नेहमी बदलासाठी उत्सुक असलेल्या तरुणाईचा आदर करते, जे आपले काम आणि मोकळा वेळ, शिस्त आणि उस्फूर्तता तसेच स्वतःची ओळख आणि समाज यांचा उत्तम ताळमेळ राखतात. याच विचारातून कॅम्पसने आता ‘ॲथलेझर’ कपडे लाँच केले आहेत. याद्वारे कॅम्पसचे ‘मूव्ह युअर वे’ (Move Your Way) हे ब्रीदवाक्य मूर्त रूपात समोर आले आहे. हे कपडे तरुणांना कोणत्याही एका चौकटीत न अडकता आपली स्वतःची स्टाईल आणि ओळख जपण्याची संधी देतात.
कॅम्पसची ‘अॅथलेझर’ कपड्यांची श्रेणी दररोजच्या वापरासाठी डिझाइन केलेली असून यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी पोलो टी-शर्ट्स, राऊंड-नेक टी-शर्ट्स, जॅकेट्स, जॉगर पँट्स आणि कॅप्स उपलब्ध आहेत. यामध्ये वेगवेगळी डिझाइन्स, रंग आणि साईजेस आहेत. त्यांच्या किमती ५९९ रुपयांपासून १८९९ रुपयांपर्यंत ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक ही उत्पादने खरेदी करू शकतील.
आरामदायी राहता आणि वावरता यावे हा विचार डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली ही श्रेणी, त्यातील शानदार डिझाइन्स आणि वैशिष्ट्यांसह तरुणांच्या रोजच्या गरजा पूर्ण करते आणि म्हणूनच दीर्घकालीन मूल्य प्रदान करते. यातील अँटी-ओडर (Anti-odour) आणि अँटी-मायक्रोबियल (Anti-microbial) गुणामुळे दिवसभर फ्रेश वाटते, तर टू-वे स्ट्रेच (Two-way stretch) कापडामुळे हालचाल करणे सहज सोपे होते आणि वापरताना खूप छान अनुभव मिळतो. सुटसुटीत डिझाईन्स आणि आधुनिक रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे कलेक्शन व्यायाम, प्रवास किंवा मित्रांसोबत बाहेर फिरताना अशा सर्व प्रसंगी वापरण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे.
लाँच प्रसंगी बोलताना, कॅम्पस अॅक्टिव्हवेअरचे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ, श्री. निखिल अगरवाल म्हणाले,
“’अॅथलेझर’ कपड्यांच्या बाजारपेठेत पदार्पण करणे हा आमचा एक धोरणात्मक व्यावसायिक निर्णय आहे. यामुळे आम्हाला आमची बाजारपेठ वाढवण्यास आणि सध्याच्या ग्राहकांकडून अतिरिक्त व्यवसाय मिळवण्यात मदत होईल, तसेच ‘मूव्हमेंट’ आणि ‘स्व-अभिव्यक्ती’ (self-expression) या कॅम्पसच्या मूळ ब्रँड तत्त्वज्ञानाशी आम्ही जोडलेले राहू. या नवीन उत्पादनामुळे केवळ ब्रँडचा पोर्टफोलिओ वाढण्याबरोबरीनेच, आधुनिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवरही शिक्कामोर्तब होत आहे.”
ॲथलेझर कपड्यांची ही श्रेणी सध्या कॅम्पसच्या अधिकृत स्टोअर्समध्ये, कंपनीच्या स्वतःच्या वेबसाईटवर तसेच अॅमेझॉन आणि मिंत्रासारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, ज्यामुळे देशभरातील ग्राहकांना ती सहज खरेदी करता येईल. या श्रेणीच्या माध्यमातून, तरुणाईला त्यांची स्वतंत्र ओळख जपण्यासाठी आणि दररोज आत्मविश्वासाने वावरण्यासाठी प्रोत्साहन देत ‘कॅम्पस’ने आपल्या ‘मूव्ह युअर वे’ (Move Your Way) या ब्रीदवाक्याप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.



