खेल

आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत श्लोक, कृषीव, आर्या गटविजेते

आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत श्लोक, कृषीव, आर्या गटविजेते

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 05/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड सहप्रायोजित शालेय मुलामुलींच्या जलद बुध्दिबळ स्पर्धेत १३ वर्षाखालील गटात श्लोक परोनीगरने, १० वर्षाखालील गटात कृषीव मनेकने तर ७ वर्षाखालील गटात आर्या महेश्वरीने विजेतेपद पटकाविताना निर्विवाद सर्वाधिक साखळी गुण नोंदविले. पहिल्या पटावर फिडे गुणांकित श्लोक परोनीगरच्या क्वीन्स गॅम्बिट प्रारंभाला फिडे गुणांकित राज गायकवाडने क्वीन्स गॅम्बिट डीक्लाईनने सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे झालेल्या घनघोर युध्दामधील निर्णायक क्षणी मात्र राजने घोडचुक केली. त्याचा पुरेपूर लाभ उठवीत श्लोकने २८ व्या मिनटाला सलग चौथा विजय नोंदविला आणि गटविजेतेपदाला गवसणी घातली.

मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व आरएमएमएस सहकार्यीत स्पर्धेमधील १३ वर्षाखालील गटात श्लोक परोनीगरने (४ गुण) प्रथम, राज गायकवाडने (३ गुण) द्वितीय, अर्णव जगतापने (३ गुण) तृतीय, आयांश पाटीलने (३ गुण) चौथा, राजनंदिनी बुद्बडकरने ( ३ गुण) पाचवा; १० वर्षाखालील गटात कृषीव मनेकने (५ गुण) प्रथम, हृधान पानीने (४ गुण) द्वितीय, ध्रुवा भोसलेने (४ गुण) तृतीय, कैवल्य परबने (४ गुण) चौथा, मायरा गोगरीने (३ गुण) पाचवा तर ७ वर्षाखालील गटात आर्या महेश्वरीने (४ गुण) प्रथम, नीर जुयलने (३ गुण) द्वितीय, चैतन्य आनंदने (२ गुण) तृतीय, मेहान शाहने (२ गुण) चौथा, हृदान शाहने (२ गुण) पाचवा पुरस्कार पटकाविला. विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, बुध्दिबळ प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी, क्रीडाप्रेमी मंगेश चिंदरकर व अर्जुन कालेकर, अॅड प्रकाश लब्धे, क्रीडा मार्गदर्शक सुनील खोपकर आदींनी गौरविले. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!