खेल

प्रल्हाद नलावडे कॅरम स्पर्धेत तीर्थ, तनया, सारा, देविकाची विजयी सलामी

तीर्थ, तनया, सारा, देविकाची विजयी सलामी

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT.27/12/2025 📞  9004379946

मुंबई,( NHI@24.COM) :आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, अविनाश नलावडे स्पोर्ट्स व सिबीइयू यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक राज्य स्तरीय मोफत शालेय कॅरम स्पर्धेत तीर्थ ठाकर, तनया दळवी, सारा देवन, देविका जोशी, विराज बर्वे, अमेय जंगम आदींनी सलामीचे सामने जिंकले. तीर्थ ठाकरने प्रथमपासून मोठी आघाडी घेत ओम सुरतेचे आव्हान १७-४ असे संपुष्टात आणले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्पर्धेस प्रारंभ केला.

दादर पश्चिम येथील सिबीईयु सभागृहात राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने निर्णायक क्षणी अचूक फटके साधत डावाच्या मध्यापर्यंत आघाडी घेणाऱ्या जान्हवी पालवणकरचा ११-६ असा पराभव केला. सारा देवनने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत वेदिका पोमेंडकरला २५-० असा नील गेम दिला आणि पहिली फेरी जिंकली. अन्य सामन्यात देविका जोशीने आर्या सोनारवर २५-० असा, विराज बर्वेने जयेश कांबळेवर १९-२ असा तर अमेय जंगम अनय म्हेत्रेवर १९-४ असा विजय मिळविला. प्रमुख पंचाचे कामकाज चंद्रकांत करंगुटकर, सचिन शिंदे, अर्जुन कालेकर, संतोष जाधव आदी पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!