मुंबईत डाबर च्यवनप्राशची पुढाकार: मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात
मुंबईत डाबर च्यवनप्राशची पुढाकार: मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 16/12/2025 📞 9004379946
मुंबई, (NHI@24.COM) : हिवाळा हा भारतातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला ऋतू असला, तरी याच काळात सर्दी, खोकला व श्वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढते. हे आजार प्रामुख्याने कमी रोगप्रतिकारक शक्तीमुळे होतात. सुमारे ३००० वर्षांपासून वापरात असलेले च्यवनप्राश हे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक सूत्र असून, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास तसेच सर्दी-खोकल्यासारख्या दैनंदिन संसर्गांपासून संरक्षण करण्यास मदत करते.
या उपक्रमाची सुरुवात आज नवी मुंबईतील नवी मुंबई म्युनिसिपल शाळा क्रमांक ३१ येथे ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष सत्राद्वारे करण्यात आली. या कार्यक्रमाला प्राचार्या रुपाली गावंड, बेबिताई लांडगे, रवि म्हात्रे तसेच डाबर इंडिया यांचे दिनेश कुमार उपस्थित होते. हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या सत्राचा उद्देश होता. यावेळी मुलांना मूलभूत स्वच्छता आणि पौष्टिक आहाराच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी डाबर इंडिया लिमिटेडचे हेल्थकेअर डायरेक्टर श्री. श्रीराम पद्मानाभन म्हणाले, “डाबर च्यवनप्राश गेली १०० हून अधिक वर्षे प्रत्येक भारतीयाला मजबूत रोगप्रतिकारक शक्ती मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा उपक्रम त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. दरवर्षी अनेकांचे प्राण घेणाऱ्या थंडीच्या लाटांबाबत आम्ही चिंतीत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू मुलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असून, त्याचबरोबर च्यवनप्राश देण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्वही त्यांना समजावून सांगणार आहोत.”
डॉ. प्रसाद यांनी सांगितले, “ऋतू बदलाच्या काळात तापमानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला आणि फ्लूसारखे आजार होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे सर्दी, खोकला व श्वसनाशी संबंधित समस्यांशी लढण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.”
या मोहिमेअंतर्गत डाबर च्यवनप्राशने आग्रा, वाराणसी, कानपूर, भोपाळ, लखनौ, उदयपूर, जयपूर, भुवनेश्वर, कोलकाता, सिलीगुडी, पाटणा, इंदूर, रायपूर, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, म्हैसूर, मुंबई, नागपूर, ग्वालियर आणि चंदीगड अशा भारतातील २१ शहरांतील प्रमुख स्वयंसेवी संस्थांशी (NGOs) भागीदारी केली आहे.



