Uncategorizedखेल

श्री उद्यानगणेश कबड्डी: आंध्रा, मोडक, एनकेईएस, भावे हायस्कूल उपांत्य फेरीत

श्री उद्यानगणेश कबड्डी: आंध्रा, मोडक, एनकेईएस, भावे हायस्कूल उपांत्य फेरीत

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 17/12/2025 📞  9004379946

मुंबई,( NHI@24.COM) : श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये आंध्रा एज्युकेशन हायस्कूल-वडाळा, ताराबाई मोडक हायस्कूल, विनोबा भावे शाळा, एनकेईएस आदी शाळांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात ज्ञान विकास, एसआयईएस, डॉ. आंबेडकर, गौरीदत्त मित्तल आदी शालेय संघांनी उपांत्यपूर्व फेरी जिंकली. श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात आंध्रा एज्युकेशन हायस्कूलने श्री गणेश इंग्लिश स्कूलचा ४३-२६ असा पराभव करतांना सांघिक खेळ विजयी संघाला उपयुक्त ठरला.

अन्य मुलांच्या सामन्यात ताराबाई मोडक हायस्कूलने महिला मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयाचे आव्हान ४०-२५ असे संपुष्टात आणतांना दर्शन तोंडलेकरने चढाईत व प्रथम नाईकने पकडीत छान खेळ केला. अष्टपैलू तेजस कुंभार व विशाल लोंढे यांना उशिरा सूर सापडल्यामुळे महिला मंडळ शाळेला पराभवास सामोरे जावे लागले. कप्तान स्वराज काशे व वेदांत सकपाळ यांच्या आक्रमक खेळामुळे एनकेईएस हायस्कूलने मुंबई पब्लिक स्कूलचा ५०-३० असा तर विनोबा भावे शाळेने सनराईज हायस्कूलचा ४०-१४ असा पराभव केला. मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत ज्ञान विकासने आंध्रा एज्युकेशनला २७-२५ असे, एसआयईएसने मावळी मंडळ शाळेला ३०-१० असे, डॉ. आंबेडकर शाळेने सरस्वती विद्या मंदिरला ३०-१८ असे तर गौरीदत्त मित्तल हायस्कूलने जवाहर मराठी शाळेला ४०-२२ असे चकविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!