यशस्वीचा शतकी तडाखा, रो-को अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब
भारताने सामन्यासह मालिका जिंकली

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 06/12/2025 📞 9004379946
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकुटाने केलेल्या खेळीच्या जोरावर भारताने एकतर्फी विजय मिळवला. भारताने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने लोळवलं.

भारताने दक्षिण आफ्रिकेला २७० धावांत रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. रोहित आणि यशस्वी यांनी मैदान गाजवलं आणि भारताला दमदार विजय मिळवून दिली. भारताने यावेळी ९ विकेट्स आणि ६१ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. पण पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात्र यावेळी मोठी नामुष्कीची वेळ आली. यशस्वीने यावेळी नाबाद ११६ धावांची खेळी साकारली.
रोहित शर्माने तुफानी फटकेबाजी करत भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल सुरुवातीला फलंदाजी करताना थोडासा अडखळत होता. पण रोहित शर्माने यावेळी त्याला सावरले. रोहित शर्माने यावेळी जास्त स्ट्राइक आपल्याकडे ठेवला आणि यशस्वीला सेट होण्यासाठी वेळ दिला. या गोष्टीचा चांगलाच फायदा यशस्वीने उचलला. रोहित शर्मा सहा धावांवर होता आणि त्यानंतर त्याने पुढे येऊन जो फटका मारला तो नजरेचे पारणे फेडणारा होता. कारण हा चेंडू कधी षटकार गेला, हे कोणालाच कळले नाही. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर आग ओकत होता. रोहित शर्माने आपले अर्धशतक ५४ धावांत पूर्ण केले आणि त्याने शतकाच्या दिशेने कूच करायला घेतली.
कुलदीप-कृष्णाचा कहर
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अर्शदीप सिंह याने रायन रिकेल्टन याला आऊट करत दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. त्यानंतर क्विंटन डी कॉक याने टेम्बा बवुमा याच्यासह दुसर्या विकेटसाठी शतकी तर तिसऱ्या विकेटसाठी मॅथ्यू ब्रिट्झकेसह अर्धशतकी भागीदारी केली. क्विंटन डी कॉक 106 आणि टेम्बा बवुमा याने 48 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सहज 320 पेक्षा अधिक धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र प्रसिध कृष्णा आणि कुलदीप या यादव या भारताच्या वेगवान आणि फिरकी जोडीने कमाल केली. या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचं 47.5 ओव्हरमध्ये 270 रन्सवर पॅकअप केलं. तर अर्शदीप सिंह आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.




