स्तन कॅन्सरच्या प्रगत देखभालीसाठी जागतिक मार्गदर्शक सूचनांमध्ये भारतीय योगदान महत्त्वपूर्ण
स्तन कॅन्सरच्या प्रगत देखभालीसाठी जागतिक मार्गदर्शक सूचनांमध्ये भारतीय योगदान महत्त्वपूर्ण
८व्या ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर कॉन्फरन्समध्ये भारतीय प्रतिनिधीत्व डॉ ज्योती बाजपेयी यांनी केले
मुंबई, (NHI@.COM) : अपोलो हॉस्पिटल्सने जाहीर केले आहे की, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील मेडिकल आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या लीड कन्सल्टंट, डॉ.(प्रोफेसर) ज्योती बाजपेयी यांनी नुकत्याच पोर्तुगालच्या लिस्बन येथे आयोजित करण्यात आलेल्या एबीसी८-ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर इंटरनॅशनल कन्सेन्सस कॉन्फरन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. एबीसी८ हा जगातील एक सर्वात प्रतिष्ठित मंच आहे. येथे स्तनाच्या कर्करोगावरील उपचार आणि देखभाल क्षेत्रातील आघाडीचे विशेषज्ञ नवीन पुराव्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी, नव्याने उदयास येत असलेल्या उपचार पद्धतींवर चर्चा करण्यासाठी आणि पुढच्या टप्प्यात पोहोचलेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे अद्ययावत करण्यासाठी एकत्र येतात.
डॉ. बाजपेयी यांनी सांगितले की, या वर्षाची बैठक विशेषतः महत्त्वपूर्ण होती, ज्यामध्ये डॉ. फातिमा कार्डोसो, डॉ. लॅरी नॉर्टन, डॉ. एरिक वायनर, डॉ. होप रूगो, प्रो. नादिया हार्बेक, डॉ.रेबेका डेंट, आणि डॉ.सँड्रा स्वेन आणि इतर अनेक आघाडीच्या डॉक्टारांनी प्रतिनिधींना वैद्यकीय क्षेत्रातील अशा नवीन संशोधन, उपचार किंवा तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली, जे डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीत बदल करतील किंवा महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणतील. हे उपचार दीर्घकाळात रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम करतील.ॲडव्हान्स्ड (मेटास्टेटिक/स्टेज IV) स्तनाचा कर्करोग पूर्वी जवळजवळ असाध्य मानला जात असे, परंतु अलिकडच्या वर्षांत या आजाराच्या उपचाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, टार्गेटेड आणि वैयक्तिक उपचारांमुळे रुग्णांना दीर्घ आणि उत्तम गुणवत्तेचे जीवन मिळत आहे.
डॉ. ज्योती बाजपेयी म्हणाल्या,”एबीसी८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे खरोखरच सन्मानाची गोष्ट होती. यातील चर्चा रुग्ण आणि त्यांच्या वास्तविक जीवनातील परिस्थितीशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित होत्या. डॉ. फातिमा कार्डोसो आणि संपूर्ण जागतिक टीमची मी अत्यंत ऋणी आहे, कारण त्यांनी असे वातावरण निर्माण केले जिथे विज्ञान, सहानुभूती आणि वास्तविक सहकार्य एकत्र येतात. आमचे ध्येय स्पष्ट आहे: ठोस डेटाचे आशेमध्ये रूपांतर करणे आणि आम्ही ज्या प्रगतीबद्दल बोलत आहोत, ती लोकांच्या जीवनात वास्तविक बदल घडवून आणू शकेल हे सुनिश्चित करणे.”
मुख्य सत्राचे अध्यक्षपद डॉ.बाजपेयी यांनी ज्युलिया मौसे यांच्यासह भूषवले. डॉ. बाजपेयींनी सांगितले की, ज्युलियाची कथा ही एक प्रभावी आठवण करून देते की आता उपचार खूप पुढे गेले आहेत आणि रुग्ण गंभीर आजारासोबतही (ॲडव्हान्स डिसीज) बराच काळ जगू शकतात. (ज्युलिया स्वतः एक स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) सर्व्हायव्हर आहेत आणि गेल्या दहा वर्षांपासून त्या मेंदूच्या मेटास्टेसिससोबत (मेंदूपर्यंत पसरलेल्या कर्करोगासोबत) जीवन जगत आहेत. त्यांच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णांचे आयुष्यमान वाढले आहे.)
त्यांचा सहभाग जागतिक सहभाग, संशोधन आणि सातत्याने शिकण्याच्या माध्यमातून कॅन्सर उपचार व देखभालीमध्ये प्रगती घडवून आणण्याप्रती अपोलोची बांधिलकी दर्शवतो. त्यामुळे हे सुनिश्चित होते की, भारतीय रुग्णांना सर्वात नवीन आंतरराष्ट्रीय मापदंडांचे लाभ मिळतील. आजच्या काळात कॅन्सर देखभालीचा अर्थ ३६० डिग्री अर्थात सर्वसमावेशक, व्यापक देखभाल असा होतो, त्यासाठी कॅन्सर तज्ञांची वचनबद्धता, नैपुण्ये आणि दृढ संकल्प यांची आवश्यकता असते.




