टेक्नोलॉजी

OPPO इंडियाच्या   नवीन Find X9 Series चा  नवा प्रीमियम स्मार्टफोनचा अनुभव

OPPO इंडियाच्या   नवीन Find X9 Series चा  नवा प्रीमियम स्मार्टफोनचा अनुभव

POSTED BY : ANAGHA SAKPAL, 20 NOVEMBER 2025R 📞9004679946

ऑलराउंडर  फ्लॅगशिप फोन ग्राहकांना  सुरवातीची किंमत INR 74999 ला उपलब्ध

 नवी दिल्ली, : OPPO इंडियाने आज भारतभर उत्सुकतेने वाट बघत असलेली Find X9 सिरीज  लाँच केली असून, भारतातील प्रीमियम स्मार्टफोन विभागातील आपली मजबूत वाटचाल सुरु ठेवली आहे. Find X च्या परंपरेला पुढे नेत, नवीन मालिकेत Find X9 आणि Find X9 Pro या मॉडेल्सचा समावेश असून, फ्लॅगशिप स्मार्टफोन काय देऊ शकतात याचे नवे मापदंड या मालिकेने निर्माण केले आहेत. ही नवीन मालिका एक उत्कृष्ट सर्वांगीण अनुभव देते ज्यामध्ये हॅसलब्लॅडने सह-इंजिनियर केलेली नव्या पिढीची कॅमेरा प्रणाली, क्रांतिकारी बॅटरी लाइफ, शक्तिशाली कार्यक्षमता आणि सहज, बुद्धिमान ColorOS 16 यांची जोड प्रदान करते.

या लाँचनंतर भारतातील OPPO च्या मजबूत बाजार कामगिरीची नोंद घेण्यात आली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या वर्ल्डवाईड क्वार्टरली मोबाईल फोन ट्रॅकर (Q3 2025) नुसार, ब्रँडने 13.9% बाजारपेठेतील वाट्यासह दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

 Find X9 Pro हा 16GB + 512GB प्रकारात INR 109999 ला उपलब्ध आहे, तर Find X9 हा 12GB + 256GB आणि 16GB + 512GB अशा दोन प्रकारांत अनुक्रमे INR 74999आणि INR 84999 ला उपलब्ध आहे. हे दोन्ही प्रकार 21 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील.

 Find X9 Pro हा OPPO ई-स्टोअर, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट  आणि सर्व प्रमुख किरकोळ दुकानांमध्ये उपलब्ध असेल. Find X9 हा OPPO ई-स्टोअर,  फ्लिपकार्ट आणि प्रमुख किरकोळ दुकानांमध्ये उपलब्ध असेल. हॅसलब्लॅड टेलिकनव्हर्टर किट  अतिरिक्त INR 29,999  मध्ये OPPO – इ- स्टोर वर  उपलब्ध असेल.

Find X9 Series सोबतच, OPPO ने त्यांचे नवीन TWS — Enco Buds3 Pro+ — लाँच केले आहेत. यांची किंमत INR 2099 आहे, तर 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान लाँच ऑफर अंतर्गत INR 1899 मध्ये उपलब्ध असतील. हे OPPO ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन आणि प्रमुख किरकोळ दुकानांमध्ये उपलब्ध असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!