एलआयसी-आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत शनिवारी शालेय ४६ खेळाडूंमध्ये चुरस
एलआयसी-आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत शनिवारी शालेय ४६ खेळाडूंमध्ये चुरस

Posted BY:: ANAGHA, 14 NOVEMBER 2025 📞 9004379946
MUMBAI (NHI.COM) : बाल दिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह विविध जिल्ह्यातील ४६ खेळाडूंमध्ये १५ नोव्हेंबर रोजी विजेतेपदासाठी चुरस राहील. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, फिडे चेस इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व आरएमएमएस सहकार्याने होणाऱ्या एलआयसी-आयडियल शालेय बुध्दिबळ स्पर्धेचे गटविजेतेपद पटकाविण्यासाठी गोकर्ण औटी, साम्यक कद्रे, ध्रुव सिंग, मिहीत कदम, शार्दुल दरेकर, प्राही श्रेणिक, शर्विल गोल्हार, मेहान शाह, प्रणव जैन, विराज चौधरी, स्वंकित मोहंती, निर्वी जितेश, आर्यन भोसले, अथर्व हिरे, अनिश्का बिया, राज गायकवाड, समर्थ साळगावकर, ऋषील कदम आदी खेळाडू जोदार लढती देण्याच्या पवित्र्यात आहेत. स्विस लीग पध्दतीच्या किमान साखळी ४ फेऱ्यामधील प्रत्येक सामना १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटचा आहे. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुध्दिबळ पट व घड्याळ दिले जाणार आहेत.
एलआयसी-आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत शनिवारी शालेय ४६ खेळाडूंमध्ये चुरस




