रोबो बायोनिक्स आपल्या ‘ग्रिपी बायोनिक आर्म’च्या माध्यमातून भारतातील प्रोस्थेटिक केअरला देत आहे नवीन स्वरूप; अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी क्लिनिक पार्टनरशिप्समध्ये वाढ
रोबो बायोनिक्स आपल्या ‘ग्रिपी बायोनिक आर्म’च्या माध्यमातून भारतातील प्रोस्थेटिक केअरला देत आहे नवीन स्वरूप
Posted BY:: ANAGHA, 12 NOVEMBER 2025 📞 9004379946
मुंबई, (NHIi@24) : भारतातील मेडटेक स्टार्टअप रोबो बायोनिक्सने प्रोस्थेटिक केअर भारतभरात उपलब्ध आणि परवडण्याजोगी करण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रिपी बायोनिक आर्म या कंपनीच्या प्रमुख उत्पादनात मानवकेंद्री डिझाइन आणि डिजिटल नवोन्मेष यांची सांगड घालण्यात आली असून त्यामुळे अवयव काढून टाकलेल्या रुग्णांमधील (अँप्युटी) हालचाल व नियंत्रण दोन्हींमध्ये सुधारणा होत आहे.
जागतिक दर्जाचे प्रोस्थेटिक तंत्रज्ञान भारतीय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या रोबो बायोनिक्स कंपनीने थेट ग्राहकांना सेवा देणारे व्हेंचर म्हणून कामाची सुरुवात केली पण प्रत्येक उत्पादनासाठी होणारा प्रचंड खर्च आणि मर्यादित पोहोच हे अडथळे कंपनीच्या लवकरच लक्षात आले. त्यामुळेच कंपनीने धोरणीपणाने क्लिनिक-चालित बीटूबी मॉडेलकडे स्थित्यंतर केले. यात प्रशिक्षित प्रोस्थेटिक तज्ज्ञांच्या व पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून उत्पादनाची पोहोच वाढवणे शक्य झाले.
कोटक बिझलॅब्ज अॅक्सलरेटर प्रोग्रामच्या माध्यमातून स्टार्टअपच्या वाढीला वेग मिळाला. या कार्यक्रमाद्वारे कंपनीला मेंटॉरशिप, धोरणात्मक मार्गदर्शन प्राप्त झाले तसेच परिसंस्थेत प्रवेश मिळाला. आयआयएमए व्हेंचर्स या आयआयएम अहमदाबादच्या नवोन्मेष व उद्योजकता विभागाच्या सहयोगाने चालवला जाणारा हा कार्यक्रम उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांच्या विस्तृत मेंटॉर नेटवर्कवर तसेच स्टार्टअप्सना वेगाने वाढण्यात मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कवर आधारलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत रोबो बायोनिक्सने आयएसओ प्रमाणन, बडोदा व इंदोरमधील क्लिनिक्सशी सहयोग आणि रुग्णांमधील निष्पत्ती सुधारण्याच्या दृष्टीने अॅपवर आधारित वापर व प्रशिक्षण साधनांचा अवलंब आदी बाबी साध्य केल्या. डॉ. पूजा मुकुल (जयपूर फूट) आणि दिलनवाझ खान यांसारख्या तज्ज्ञांच्या मेंटॉरशिपमुळे (मार्गदर्शन) कंपनीला आपले धोरण अधिक सफाईदार करण्यात तसेच नवोन्मेषाचा आराखडा प्रबळ करण्यात मदत झाली.
या प्रवासाबद्दल सहसंस्थापक लेवेलीन डिसा यांनी नोंदवले की, कोटक बिझलॅब्जने रोबो बायोनिक्सला केवळ व्याप्ती वाढवण्याचा नवीन दृष्टीकोन दिला नाही, तर या कार्यक्रमातील प्रशिक्षण व सत्रांनी टीमला मृत्यूच्या दरीवर मात करून एक प्रस्थापित व्यवसाय निर्माण करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक व शाश्वत मॉडेल्स तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. आयआयएमए व्हेंचर्समधील कोटक बिझलॅब्ज अॅक्सलरेटरमुळे टीमला संकोच दूर करून कठीण निर्णय घेण्यात व वेगाने पुढे जाण्यात मदत झाली.
नवोन्मेष हा गाभा असलेली रोबो बायोनिक्स ही कंपनी भारताच्या मेडटेक क्षेत्राला नवीन आकार देत आहे, एतद्देशीय तंत्रज्ञानही सखोल सामाजिक प्रभावासह जागतिक श्रेणीचा दर्जा देऊ शकते, हे यातून सिद्ध होत आहे. कोटक बिझलॅब्ज अॅक्सलेटर कार्यक्रमाच्या माध्यमातून कोटक महिंद्रा बँक भारतभरातील उच्च-संभाव्यता स्टार्टअप्सना सातत्याने सक्षम करत आहे आणि हेल्थटेक, अॅग्रीटेक, शाश्वतता यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नवोन्मेष जोपासत आहे, व्यापकता आणत आहे व उत्तम प्रभाव निर्माण करत आहे.




