शिवनेरकरांचा सत्यशोधकी विचारांचा वारसा नरेंद्र वाबळे उत्तमरीत्या चालवीत आहेत: लोकनेते रामशेठ ठाकूर
शिवनेरकरांचा सत्यशोधकी विचारांचा वारसा

पनवेल(NHI@24) : शिवनेर कार विश्वनाथराव वाबळे यांचा सत्यशोधकी विचारांचा वारसा त्यांचे चिरंजीव आणि शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे हे उत्तम रित्या चालवत आहेत, असे उद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज काढले. शिवनेरच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
लोकनेते ठाकूर पुढे म्हणाले की, शिवनेरचा दिवाळी अंक वाचनीय झाला आहे. मुखपृष्ठावरील अंकिता भोईर या उगवत्या अभिनेत्रीचे छायाचित्र असून ते मुखपृष्ठावर उठून दिसते.
देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर मधुकर भावे यांनी लिहिलेला लेख उत्तम आहे. या अंकातील इतर लेख, मुलाखत, कथा आदी साहित्य दिवाळी अंकाची शोभा वाढवते.
शिवनेर हे एक नामांकित दैनिक असून मी शिवनेर ला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
याप्रसंगी सर्वश्री नरेंद्र वाबळे, दयानंद गांगुला आणि पत्रकार निलेश सोनवणे उपस्थित होते.
शिवनेरकरांचा सत्यशोधकी विचारांचा वारसा नरेंद्र वाबळे उत्तमरीत्या चालवीत आहेत: लोकनेते रामशेठ ठाकूर




