खेल

खान आडनावामुळे सरफराजचं टीम इंडियात सिलेक्शन नाही?

खान आडनावामुळे सरफराजचं टीम इंडियात सिलेक्शन नाही?

विरोधकांनी गौतम भारतीय जनता पक्षातील (भाजप) कार्यकाळाचा उल्लेख करत साधला निशाणा

आडनावामुळे सरफराजचं टीम इंडियात सिलेक्शन झालं नाही? विरोधकांनी गौतम गंभीरवर साधला निशाणा

(Photo Credit : Social Media)

 MUMBAI : सर्फराझ खान याची भारताच्या कसोटी संघानंतर भारताच्या अ संघातही निवड न झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. सर्फराझ खानला घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली होती. पण त्यानंतर त्याला पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आलं. यानंतर सिनियर संघात त्याला संधी मिळाली नाहीच, पण आता भारताच्या अ संघातही त्याची निवड करण्यात न आल्याने काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी गंभीरला लक्ष्य केलं आहे.

दक्षिण आफ्रिका ए सीरिजसाठी टीम इंडियाच्या ए संघाची घोषणा झाली आहे. मात्र या घोषणेनंतर मोठा गोंधळ उडालेला दिसतोय. राजकारणात सुद्धा या संघाची चर्चा होत असून खासदार असदुद्दीन ओवैसीनंतर आता काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मदने सुद्धा बीसीसीआयविषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी याप्रकरणात हेड कोच गौतम गंभीरला सुद्धा ओढलं आहे. शमीने गौतम गंभीरवर धार्मिक पक्षपाताचा आरोप केला आहे.

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मदने ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला की सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे भारतीय संघात निवडलं जात नाहीये. शमा मोहम्मद यांनी गंभीरच्या भारतीय जनता पक्षातील (भाजप) कार्यकाळाचा उल्लेख करत म्हटले की, ‘सरफराज खानची निवड त्याच्या आडनावामुळे झाली नाही का? मी फक्त विचारत आहे. या मुद्द्यावर गौतम गंभीरची भूमिका आपल्याला माहिती आहे’.

sarfaraz khan

ओवैसीने पोस्ट शेअर करत प्रश्न उपस्थित केला

सरफराज हा टेस्ट  फॉरमॅटमधील सर्वात सातत्यपूर्ण फलंदाजांपैकी एक आहे, त्याने 56 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये प्रति डाव सरासरी 65.19 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा काढणाऱ्या आणि गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सरफराजने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या फिटनेसमध्ये आणखी सुधारणा केली. मात्र तरीही सरफराजला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) चे प्रेसिडेंट असदुद्दीन ओवैसी यांनी पोस्ट शेअर करत प्रश्न उपस्थित केला. त्याने एक्सवर लिहिलं की, ‘सर्फराज खानची इंडिया ए साठीही निवड का झाली नाही?’.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दोन अनौपचारिक टेस्ट सामन्यांसाठी भारत ए संघाची घोषणा बीसीसीआयने मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) केली. दोन्ही सामन्यांसाठी वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत, पण दोन्ही संघात ऋषभ पंत कर्णधार आणि साई सुदर्शन उपकर्णधार असतील. ही सीरीज १९ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

सरफराज खान हा टेस्ट फॉरमॅटमधील सातत्यपूर्ण फलंदाज आहे. त्याने ५६ फर्स्ट क्लास सामन्यांत सरासरी ६५.१९ धावांची कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट पदार्पण करून त्याने चांगल्या खेळ्या केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो भरपूर धावा काढणारा खेळाडू आहे, पण भारत ए संघात त्याला नाकारण्यात आले.

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून सरफराज खानच्या वगळण्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले, “सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे (खान) भारत ए संघात निवडले गेले नाही का? मी फक्त विचारत आहे. गौतम गंभीरच्या भाजप कार्यकाळाची भूमिका आपल्याला माहिती आहे.” यामुळे धार्मिक पक्षपाताचा आरोप झाला आणि त्यांना सोशल मीडियावर टीका झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!