नीला फिल्म प्रॉडक्शन्सकडून फिल्मसिटीला रुग्णवाहिकेची भेट – शेकडो कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी उपक्रम
नीला फिल्म प्रॉडक्शन्सकडून फिल्मसिटीला रुग्णवाहिकेची भेट

POSTED BY: MRUNALI, 6 October 2025
मुंबई…(NHI@24)…फिल्मसिटीमधील आरोग्य व सुरक्षा सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नीला फिल्म प्रॉडक्शन्सने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संस्थापक आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिके ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे निर्माते-निर्देशक असीत कुमार मोदी यांच्या पुढाकाराने नीला फिल्म प्रॉडक्शन्सतर्फे फिल्मसिटीसाठी सार्वजनिक वापरासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. दररोज शेकडो कामगार, तंत्रज्ञ व व्यावसायिक विविध सेटवर अहोरात्र मेहनत घेतात, त्यांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन ही पहल करण्यात आली असून, कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरते.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री. आशिष शेलार, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, निर्माता आणि दिग्दर्शक असीत कुमार मोदी तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील लोकप्रिय कलाकार उपस्थित होते.
आपले विचार व्यक्त करताना असीत कुमार मोदी म्हणाले, “फिल्मसिटी हे आमच्यासाठी केवळ कामाचे ठिकाण नाही, तर एक कुटुंब आहे. दररोज हजारो कलाकार, कामगार आणि व्यावसायिक येथे गोष्टींना जीवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतात. ही रुग्णवाहिका त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमचे योगदान आहे. रुग्णवाहिका म्हणजे फक्त वाहन नव्हे, तर आपत्कालीन प्रसंगी जीवनदायी साधन आहे. पडद्यावर आनंद निर्माण करण्याबरोबरच या आनंदाच्या जगाला शक्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या काळजी घेणे हीदेखील आमची जबाबदारी आहे.”
फिल्मसिटीमध्ये या रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक मजबूत होऊन, त्वरित मदत उपलब्ध होईल आणि विद्यमान सुरक्षा व्यवस्थेला पूरक ठरेल अशी अपेक्षा आहे.
नीला फिल्म प्रॉडक्शन्सविषयी
असीत कुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालील नीला फिल्म प्रॉडक्शन्स ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दूरदर्शनवर विविध प्रकारच्या काल्पनिक व गैर-काल्पनिक कार्यक्रमांची निर्मिती करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही त्यांची अत्यंत लोकप्रिय मालिका असून, अद्वितीय पात्रं, संवाद आणि सांस्कृतिक प्रभावामुळे गेली १६ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आजवर ४,००० हून अधिक भाग प्रसारित झाले असून, या मालिकेमुळे लाखो प्रेक्षकांना आनंद मिळाला आहे.
श्री. मोदी यांनी नीला मीडियाटेक या उपकंपनीमार्फत Web3 गेमिंग, अॅनिमेशन आणि मर्चेंडायझिंग क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. नवकल्पना आणि सर्जनशीलतेचा वारसा पुढे नेण्याच्या त्यांच्या या प्रयत्नामुळे नीला फिल्म प्रॉडक्शन्स नवनवीन क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करत आहे.


