एसआरसीसी.. मुंबई यांनी सेरेब्रल पाल्सी साठीचे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू
एसआरसीसी.. मुंबई यांनी सेरेब्रल पाल्सी साठीचे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू

POSTED BY: ANGHA SAKPAL. 4 October 2025
हे अद्वितीय सेंटर सेलेब्रल पाल्सी व न्यूरोमस्कुलर विकारांनी पीडित मुलांना व तरूणांना सर्वांगीण, किफायतशीर व बहुआयामी केअर

मुंबई, ‹NHI.COM>.: मुंबईमधील एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ, मुंबई, मुंबईच्या पहिल्या महिला ऑर्थोपेडिक सर्जन दिवंगत डॉ. पेरिन कावसजी मुल्लाफिरोज यांच्या सन्मानार्थ डॉ. पी. के. मुल्लाफिरोज मेमोरियल सेंटर फॉर सेरेब्रल पाल्सीचे उद्धाटन केले आहे. डॉ. पेरिन यांनी अथक मेहनत घेत सेरेब्रल पाल्सीने पीडित मुलांवर उपचार केले. हे अद्वितीय विशेषीकृत सेंटर एकाच छताखाली सेलेब्रल पाल्सी आणि इतर न्यूरोमस्कुलर विकारांनी पीडित मुलांना व तरूणांना सर्वसमावेशक, दयाळू व बहुआयामी केअर देईल.
एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ, मुंबई, परिसरात स्थित या विशेष सेंटरचा सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी दीर्घकालीन, बहुआयामी व्यवस्थापनातील तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे, ज्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केलेल्या वैद्यकीय, सामाजिक आणि पुनर्वसन सेवा एकत्रित करेल. सर्व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील रुग्णांसाठी या सेवा परवडणाऱ्या आणि सुलभ केल्या जातील.
डॉ. पेरिन कावसजी मुल्लाफिरोज या भारतातील अग्रणी महिला ऑर्थोपेडिक सर्जन होत्या आणि मुंबईतील पहिल्या महिला ऑर्थोपेडिक सर्जन होत्या. त्यांनी आपले जीवन अपंग मुलांसाठी, विशेषतः सेरेब्रल पाल्सी आणि संबंधित अपंगत्व असलेल्या मुलांसाठी समर्पित केले. त्या पूर्वीच्या चिल्ड्रन्स ऑर्थोपेडिक हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय संचालक होत्या, जेथे आज एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ, मुंबई, आहे. डॉ. मुल्लाफिरोज यांच्या समर्पण आणि कौशल्यामुळे हॉस्पिटलला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. सेरेब्रल पाल्सीवर उपचार करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १९६३ मध्ये, त्यांनी वैद्यकीय तज्ञांच्या टीमचा समावेश असलेल्या प्रमुख विशेष उपचार प्रकल्प म्हणून सेरेब्रल पाल्सी युनिट सुरू केले.
नवीन उद्घाटन करण्यात आलेल्या डॉ. पी. के. मुल्लाफिरोज मेमोरियल सेंटरमध्ये ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी, फिजियोथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्स, सायकोलॉजी आणि सामाजिक कार्यामधील तज्ञांच्या टीमचा समावेश आहे, जे समन्वित, समर्पित व सर्वसमावेशक केअर देतात. या सहयोगात्मक दृष्टिकोनामधून वैद्यकीय व्यवस्थापनाची, तसेच पुनर्वसन, माहितीपूर्ण पाठिंबा, कौटुंबिक समुपदेशन आणि रूग्णांसाठी जीवनाच्या दर्जामध्ये दीर्घकालीन सुधारणेची देखील खात्री मिळते.
मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मॅनेज्ड बाय नारायणा
हेल्थ, मुंबई, हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार आणि प्रमुख पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स सर्जन डॉ. तरल नागदा म्हणाले, “नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या परिसरात स्थित या विशेष सेंटरचा सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी दीर्घकालीन, बहुआयामी व्यवस्थापनातील तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे, ज्यासाठी मुलांच्या विकासासाठी एसआरसीसी सेंटरसोबत सहयोगाने प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केलेल्या वैद्यकीय, सामाजिक आणि पुनर्वसन सेवा एकत्रित करेल.”
मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ, मुंबई, हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार आणि पीडियाट्रिक न्यूरोलॉजी प्रमुख डॉ. अनैता हेगडे म्हणाल्या, “सेरेब्रल पाल्सी फक्त वैद्यकीय स्थिती नाही तर आजीवन प्रवास आहे, ज्यासाठी दयाळू व सर्वसमावेशक केअर, बहुआयामी पाठिंबा आणि लवकर हस्तक्षेपाची गरज आहे. या सेंटरसह आमचा मुलांना व त्यांच्या कुटुंबांना समाधानकारक जीवन जगण्यास मदत करण्यासाठी योग्य टूल्स, थेरपी आणि आधारासह सक्षम करण्याचा मनसुबा आहे.”
हे सेंटर डॉ. पी. के. मुल्लाफिरोज यांचा वारसा कायम ठेवण्याप्रती समर्पित आहे. डॉ. पी. के. मुल्लाफिरोज यांच्या अग्रणी कार्याने भारतातील पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स आणि पुनर्वसन क्षेत्रात बदल घडवून आणला. अत्याधुनिक वैद्यकीय केअरसह कुटुंबांना माहिती व सामाजिक पाठिंबा देत या सेंटरचे सेलेब्रल पाल्सी आणि इतर न्यूरोमस्कुलर विकारांनी पीडित मुलांसाठी व तरूणांसाठी आशेचा किरण बनण्याचे ध्येय आहे.
हेही वाचा :




