आरोग्य आणि आनंद घराघरांत पोहोचविणार अपोलोची जागतिक चळवळ
आरोग्य आणि आनंद घराघरांत पोहोचविणार अपोलोची जागतिक चळवळ
१.९ मिलियन व्यक्तींच्या आयुष्यात अपोलो फाउंडेशनच्या सामाजिक कार्यक्रमांनी प्रभाव घडवून आणला
नवी मुंबई, (NHI): अपोलो हॉस्पिटल्सने आपला ४२ वा वर्धापन दिन साजरा केला आहे. या ४२ वर्षात २०० मिलियनपेक्षा जास्त आयुष्यांमध्ये अपोलो हॉस्पिटल्सने परिवर्तन घडवून आणले, १८५ पेक्षा जास्त देशांमध्ये विश्वास संपादन केला आणि भारतभरातील १९ हजार पेक्षा जास्त पिनकोड्सना आपल्या सेवासुविधा पोहोचवल्या आहेत. अपोलोने भारतातील पहिले कॉर्पोरेट हॉस्पिटल १९८३ साली सुरु केले. गेल्या चार दशकात ५१ लाखांहून जास्त शस्त्रक्रिया आणि २७ हजार अवयव प्रत्यारोपणे करून अपोलोने आरोग्यसेवा क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. अपोलोने ११ लाखांहून जास्त प्रोफेशनल्सना प्रशिक्षित करून देशात कुशल आरोग्यसेवा मनुष्यबळ निर्माण केले.
डॉ प्रताप सी. रेड्डी, चेयरमन, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप म्हणाले,”१९८३ साली जेव्हा अपोलोने सुरुवात केली तेव्हा केवळ एक हॉस्पिटल नव्हे तर एका चळवळीचा प्रारंभ झाला. गेल्या चार दशकांत या चळवळीला उत्तरोत्तर बळ मिळत गेले, २०० मिलियन लोकांच्या आयुष्यात अपोलोने आपला प्रभाव निर्माण केला, १८५ देशांमध्ये विश्वास संपादन केला आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काय शक्य आहे त्याची नवी व्याख्या रचली. जागतिक दर्जाची देखभाल सहजपणे उपलब्ध व्हावी आणि भविष्यासाठी नेहमी सज्ज असावे हे आमचे व्हिजन आहे. जागतिक मंचावर भारत स्थान मिळवत असताना, अपोलो देशाच्या वाटचालीला चालना देईल, आपला समाज अधिकाधिक निरोगी आणि सुदृढ व्हावा यासाठी प्रयत्न करत राहील, वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सीमा रुंदावत राहील आणि हे सुनिश्चित करेल की, प्रत्येक कुटुंब आपल्या भविष्याकडे आशेने, निरोगीपणे आणि आनंदाने पाहू शकेल.”
भारतामध्ये आयुर्मान आणि आरोग्य मानके यामध्ये सातत्याने वाढ होत आहे व अपोलोची वाटचाल त्याच्याशी खूप जवळून निगडित आहे. आरोग्य उपचार व देखभालीसाठी परदेशात जावे लागण्याचे प्रमाण कमी करून, सर्व क्षेत्रांमध्ये क्लिनिकल मापदंड उंचावून आणि दर्जेदार आरोग्यसेवा लाखो लोकांपर्यंत पोहोचवून, अपोलोने दीर्घायुष्य, आजारातून बरे झाल्यानंतर दीर्घकाळ जिवंत राहण्याचा दर आणि विश्वसनीय आरोग्य देखभाल डेस्टिनेशन म्हणून भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे.
डॉ प्रीता रेड्डी, एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेयरमन, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप म्हणाल्या,”राष्ट्राची ताकद तेथील लोकांच्या आरोग्यामध्ये असते. भारतातील डॉक्टर, नर्सेस आणि देखभाल करणाऱ्या व्यक्ती हे देशाच्या प्रगतीचे मूक शिल्पकार आहेत. अपोलोमध्ये आम्ही फक्त हॉस्पिटल्स नाही उभारली तर मनुष्यबळ निर्माण केले. जेव्हा आम्ही लोकांमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आम्ही सन्मान, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद आणि देशाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करतो.”
अपोलोने भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहरा बदलावला आहे. दक्षिण आशियातील पहिले प्रोटॉन कॅन्सर सेंटर, भारतातील पहिले एआय-प्रिसिजन ऑन्कोलॉजी सेंटर आणि या क्षेत्रातील पहिले सायबरनाईफ® रोबोटिक रेडिओसर्जरी सिस्टीम अशा अनेक गोष्टी भारतात प्रथमच करण्याचा मान मिळवला आहे. आज अपोलो २८ प्रगत रोबोटिक प्लॅटफॉर्म्सचे, एआय-पॉवर्ड कार्डिओव्हस्क्युलर रिस्क प्रिडिक्शन आणि प्रगत रियॅलिटी-असिस्टेड सर्जरीजचे नेतृत्व करत असून भविष्यातील औषधोपचार आज उपलब्ध करवून देत आहे.




