पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या ५६व्या आवृत्तीचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांच्या हस्ते संपन्न
पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या ५६व्या आवृत्तीचे उद्घाटन

POSTED BY: ANGHA SAKPAL, SEPTEMBER 18 , 2025
मुंबई, (NHI) : डॉ. बत्रा फाऊंडेशनतर्फे वार्षिक प्रमुख प्रदर्शन ‘मॅजिक मोमेंट्स ‘चे ५६व्या आवृत्तीचे आज उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी उत्तर ध्रुव प्रदेशातील निसर्गरम्य विलोभनीय दृश्यांचे टिपलेल्या छायाचित्राचे संग्रह प्रदर्शित करण्यात आले. पाच दिवसांचे हे प्रदर्शन सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांच्या हस्ते उद्घाटित झाले. प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य असून, ते सर्वसामान्यांसाठी २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, २२६, नरिमन पॉइंट, मुंबई येथे खुले राहणार आहे.

या प्रसंगी भाष्य करताना पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्हणाले,
“एक डॉक्टर म्हणून मला ठाऊक आहे की छायाचित्रणासारखा एखादा छंद केवळ तणावमुक्ती आणि मानसिक उत्तेजन देत नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासही मदत करतो. माझ्यासाठी छायाचित्रण ही केवळ सर्जनशील अभिव्यक्ती नसून ती निर्णयक्षमता वाढवते, बारकाईने निरीक्षण करण्याचे प्रशिक्षण देते आणि ‘पाहणे’ व ‘समजून घेणे’ यातील फरक शिकवते; ज्याचा उपयोग मला रुग्णांना अचूक औषधोपचार देण्याच्या माझ्या क्षेत्रातही होतो.
हे प्रदर्शन उत्तर ध्रुवाच्या भव्य आणि नाजूक सौंदर्याने प्रेरित असून, केवळ छायाचित्रांचे दर्शन नाही तर आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करणारा संदेश आहे. ‘क्लिक करा, नाहीतर क्षण निघून जाईल’ ही भावना पर्यावरणासाठी ‘उशीर होण्याआधी कृती करा’ या आवाहनाशी अतिशय सुसंगत आहे.
माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त प्रतिभा आणि कलाकार दडलेला असतो. जर आपण ती समाजहितासाठी वापरली, तर आपण अधिक आनंदी, सुसंस्कृत आणि शाश्वत जग निर्माण करू शकतो.
या उपक्रमात कला, जनजागृती आणि कृती यांचा संगम साधल्याबद्दल मी निकॉन तसेच सर्व पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
या प्रसंगी अभिनेते शेखर सुमन म्हणाले, “या कार्यक्रमाचा भाग होण्याचा मला अत्यंत आनंद आहे, कारण हा कार्यक्रम आपल्या पृथ्वीच्या अद्वितीय सौंदर्याचा उत्सव साजरा करतो आणि एक अर्थपूर्ण सामाजिक संदेशही देतो. डॉ. बत्रा फाउंडेशन कला माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवते हे पाहून प्रेरणा मिळते. डॉ. बत्रा यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने मला थक्क केले आहे. जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथी क्लिनिक शृंखलेचे संस्थापक, वृद्धाश्रमासाठी निधी संकलनासाठी गाणारे कलाकार, आंतरराष्ट्रीय लेखक आणि हे त्यांचे ५६वे छायाचित्र प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे नाही, तर जीवनाचा उत्सव आहे आणि समाजातील दुर्बल घटकांना मदत करून समाजाला काहीतरी परत देण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे.”
मॅजिक मोमेंट्स या प्रदर्शनाने केवळ कलात्मक सौंदर्यामुळे नव्हे, तर त्यामागील उदात्त हेतूमुळेही अनेक वर्षांपासून मुंबईच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेत आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. निकॉनच्या सहकार्याने आयोजित केलेले हे प्रदर्शन पुन्हा एकदा सिद्ध करते की, कला केवळ सौंदर्य निर्माण करत नाही, तर करुणा जागवण्याची ताकदही बाळगते. या प्रदर्शनातून मिळणारी सर्व निधी व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेस दिली जाणार आहे. हा उपक्रम मॅजिक मोमेंट्सच्या स्थापनेपासूनच त्याचा अविभाज्य भाग राहिला आहे.




