Business

सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंग सोखी यांची ‘इंची’ ब्रँडमध्ये गुंतवणूक; ५०० कोटींचे लक्ष्य

या भागीदारीमुळे इंडो-चायनीज बाजारात इंचीचे नेतृत्व अधिक मजबूत होणार आहे.

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 03/09/2026 (8850212023)

मुंबई  (NHI24)  नवी मुंबईतील आघाडीची एफएमसीजी कंपनी मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि. ने प्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी यांची आपल्या ‘इंची’ ब्रँडसाठी गुंतवणूकदार आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

२०१७ मध्ये निखिल भारती, आर. पी. चॅटर्जी आणि मनीष परडीवाला यांनी स्थापन केलेल्या इंचीने अल्पावधीतच इंडो-चायनीज विभागात घराघरात स्थान मिळवले आहे. आज कंपनीकडे शेझवान डिप्स, स्प्रेड्स, नूडल्स, सॉसेस, सूप्स आणि कुकिंग मसाले अशा १०० हून अधिक उत्पादनांची श्रेणी आहे.

कंपनीचे संचालक निखिल भारती म्हणाले, “इंची ब्रँड आज वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आम्हाला असा चेहरा हवा होता जो आमच्या उत्पादनांइतकाच लोकांचा लाडका असेल आणि ज्याचा या कॅटेगरीवर विश्वास असेल. शेफ हरपाल हेच त्या योग्य व्यक्ती आहेत. त्यांच्या सहकार्याने पुढील ५ वर्षांत ५०० कोटींचा टप्पा आम्ही पार करू.”

ही भागीदारी केवळ जाहिरातीपुरती मर्यादित नाही. शेफ हरपाल हे उत्पादनांच्या नाविन्य, नवीन रेसिपी आणि घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चव देण्यासाठी क्युलिनरी पार्टनर म्हणून काम करणार आहेत.

शेफ हरपाल सिंग सोखी म्हणाले, “मला हे फक्त एंडोर्समेंट म्हणून नको होते. ज्या ब्रँडच्या व्हिजनवर माझा विश्वास आहे, त्यात मला गुंतवणूक करायची होती. मेल्टिंग पॉटच्या टीमला ग्राहकांची गरज चांगली समजते. माझा अनुभव या ब्रँडसोबत जोडण्याची ही उत्तम संधी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!