खेल

बीओबी कॅरम स्पर्धेत जितेंद्रला चकवून विकास महाडिक विजेता

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग तर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या मुंबई विभागीय बीओबी कॅरम संघ

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 31/08/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग तर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या मुंबई विभागीय बीओबी कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमधील पुरुष गटाचे विजेतेपद गतउपविजेत्या विकास महाडिकने पटकाविले. गतविजेत्या अझर अन्सारीवर मात करून अंतिम फेरी गाठणाऱ्या जितेंद्र मिठबावकरला द्वितीय मानांकित विकास महाडिकने राणीवर सतत कब्जा मिळवीत अचूक खेळ केला आणि अखेरपर्यंत मोठ्या आघाडीचे वर्चस्व राखत १५-२ असे चकविले.

बॅलार्ड पियर येथील बीओबी क्रीडा गृहामधील महिलांच्या अंतिम फेरीत बिगर मानांकित रुपम कुमारीने अप्रतिम खेळ करीत गतउपविजेत्या ज्योती श्रीमळचे आव्हान १०-४ असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत रुपम कुमारीने गतविजेत्या इंदिरा राणेचा ११-५ असा तर ज्योती श्रीमळने देवी शांतीचा ११-० असा पराभव केला होता. पुरुषांच्या उपांत्य फेरीत चतुर्थ मानांकित जितेंद्र मिठबावकरने गतविजेत्या अझर अन्सारीला ८-१ असे तर विकास महाडिकने हेमंत शेलारला १९-० असे नमविले होते. बँक ऑफ बडोदाचे मुंबई विभागीय जीएम राजेश शर्मा व डीजीएम संजीव सिंघ, क्रीडा संयोजक प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!