बॉलीवूड सुपरस्टार बॉबी देओल करणार शोरूमचे शुभारंभ विरार मध्ये कल्याण ज्वेलर्सचे आगमन
भव्य शोरूमचे उद्घाटन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता श्री बॉबी देओल यांच्या हस्ते केले जाईल.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON 10/07/2026 (8850212023)
मुंबई (NHI24.COM) : भारतामधील सर्वात विश्वासू आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने, आज विरारमध्ये आपले पहिले शोरूम सुरु करण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील त्यांच्या रिटेल नेटवर्कला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. या भव्य शोरूमचे उद्घाटन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता श्री बॉबी देओल यांच्या हस्ते केले जाईल.

कल्याण ज्वेलर्ससाठी हे नवीन शोरूम त्यांच्या विस्तार धोरणातील आणखी एक मोठे पाऊल आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी सोने-चांदीची खरेदी अधिक सोपी आणि विश्वासार्ह बनवणे हा या ब्रँडचा उद्देश आहे. या शानदार शोरूममध्ये तुम्हाला सोने, हिरे आणि कीमती रत्नांनी बनवलेल्या दागिन्यांची एकापेक्षा एक उत्तम कलेक्शन्स मिळतील. येथील डिझाईन्समध्ये तुम्हाला पारंपारिक कलाकुसरीसोबतच आजची आधुनिक शैली देखील मिळेल.
रमेश कल्याणरामन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,”महाराष्ट्र नेहमीच आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक राहिला आहे. विरारमध्ये आमचे पहिले शोरूम सुरू करून आम्ही आमचे स्थान अधिक मजबूत करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा विस्तार दर्शवतो की, आम्ही या संपूर्ण परिसरातील ग्राहकांपर्यंत कल्याण ज्वेलर्सचा सर्वोत्तम अनुभव पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, हे नवीन शोरूम आमच्या ग्राहकांना दागिने खरेदीचा एक उत्कृष्ट अनुभव देईल, जिथे त्यांना अप्रतिम कलाकुसर, दागिन्यांचे खूप मोठे कलेक्शन आणि सर्वोत्तम सेवा एकाच छताखाली मिळतील.”
या भव्य शुभारंभाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कल्याण ज्वेलर्स घेऊन आले आहेत, एक खास आणि मर्यादित कालावधी ऑफर! याअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या एकूण खरेदीच्या निम्म्या मूल्यावर मेकिंग चार्जेसमध्ये ०% सूट मिळेल. याशिवाय, ग्राहकांना कल्याणच्या ‘स्पेशल गोल्ड बोर्ड रेट काही फायदा मिळेल.



