Business

डॉ. हेगडे चषक शालेय कॅरम स्पर्धेत आर्यन, निधी, तनया, पुष्करची विजयी सलामी   

डॉ. हेगडे चषक शालेय कॅरम स्पर्धेत आर्यन, निधी, तनया, पुष्करची विजयी सलामी

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 08/06/2026 ( 8850212023 )

Mumbai ( NHI24.COM ) आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक १६ वर्षाखालील शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची निधी सावंत, महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पोद्दार हायस्कूल-मालाडचा पुष्कर गोळे आदींनी सलामीचे सामने जिंकले. कार्डीनल ग्रेसियस हायस्कूलच्या विराज खरात विरुध्द अचूक फटके साधत आर्यन राउतने २५-२ असा विजय संपादन केला.

परेल येथील आरएमएमएस सभागृहात सुरुवातीपासून आघाडी घेणाऱ्या सुळे गुरुजी शाळेच्या ग्रीष्मा धामणकरला निधी सावंतने निर्णायक क्षणी मोठा बोर्ड घेत ११-७ असे चकविले. अभा टलेलेने प्रारंभ उत्तम करूनही सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखणाऱ्या तनया दळवीकडून १४-५ असा पराभव पत्करला. अन्य सामन्यात पुष्कर गोळेने रोहांशू सोळंकीवर १९-१ असा, रत्नागिरीच्या आदित्या देसाईने आर्यन राठोडवर ८-६ असा तर रुद्र पोसरेकरने सार्थक लाडवर १०-४ असा विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. विविध जिल्ह्यातील ६२ खेळाडूंच्या सहभागाने सुरु झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आयडियलचे सल्लागार विलास डांगे, क्रीडाप्रेमी विजय रायमाने, दिलीप वरेकर, नितीन कोलगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक १६ वर्षाखालील शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची निधी सावंत, महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पोद्दार हायस्कूल-मालाडचा पुष्कर गोळे आदींनी सलामीचे सामने जिंकले. कार्डीनल ग्रेसियस हायस्कूलच्या विराज खरात विरुध्द अचूक फटके साधत आर्यन राउतने २५-२ असा विजय संपादन केला.

परेल येथील आरएमएमएस सभागृहात सुरुवातीपासून आघाडी घेणाऱ्या सुळे गुरुजी शाळेच्या ग्रीष्मा धामणकरला निधी सावंतने निर्णायक क्षणी मोठा बोर्ड घेत ११-७ असे चकविले. अभा टलेलेने प्रारंभ उत्तम करूनही सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखणाऱ्या तनया दळवीकडून १४-५ असा पराभव पत्करला. अन्य सामन्यात पुष्कर गोळेने रोहांशू सोळंकीवर १९-१ असा, रत्नागिरीच्या आदित्या देसाईने आर्यन राठोडवर ८-६ असा तर रुद्र पोसरेकरने सार्थक लाडवर १०-४ असा विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. विविध जिल्ह्यातील ६२ खेळाडूंच्या सहभागाने सुरु झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आयडियलचे सल्लागार विलास डांगे, क्रीडाप्रेमी विजय रायमाने, दिलीप वरेकर, नितीन कोलगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!