आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने व्हॅल्यू फॅशन श्रेणी अधिक मजबूत केली; OWND! ची रिटेल उपस्थिती वाढवली
मुंबईत OWND! चे पदार्पण; भारतात ७५वे स्टोअर लाँच

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 23/03/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडचा जनरेशन-झेडवर लक्ष केंद्रित करणारा फॅशन ब्रँड OWND! भारतात ७५ स्टोअर्ससह मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे. ब्रँडने दोन नवीन स्टोअर्स लाँच करत मुंबईमध्ये प्रवेश केला आहे, जो ब्रँडच्या विकास प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. यासह ब्रँडने प्रमुख फॅशन-केंद्रित बाजारपेठांमध्ये उपस्थिती दृढ करणे सुरू ठेवले आहे.
मुंबईमध्ये प्रवेशाला साजरे करत OWND! ने भव्य लाँच इव्हेण्टचे आयोजन केले, ज्यामध्ये ब्रँडचा उत्साह आणि ओळख पाहायला मिळाले. या इव्हेण्टमध्ये डायनॅमिक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये खो गये हम कहाँ चित्रपटातील मुख्य अभिनेता आदर्श गौरव याने शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर उपस्थिती दर्शवली. या इव्हेण्टमध्ये मुंबईतील फॅशन प्रेमी आणि तरुण समुदायाचा मोठा सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे स्टाइल, अभिव्यक्ती आणि संस्कृतीचा उत्साहपूर्ण सोहळा रंगला.
मालाडमधील इन्फिनिटी मॉल आणि ठाण्यातील आर-मॉल येथे स्थित असलेली दोन नवीन स्टोअर्स अनुक्रमे ५९०० चौरस फूटांहून अधिक आणि ७६०० चौरस फूटांहून अधिक क्षेत्रावर विस्तारलेली आहेत. सर्वोत्तम अनुभव देणारी आणि अत्यंत उत्साहवर्धक रिटेल स्पेस म्हणून डिझाइन केलेली ही स्टोअर्स OWND! ब्रँडची धाडसी आणि अर्थपूर्ण ओळख सादर करतात. येथे ग्राहकांना प्रगत फॅशन कलेक्शन, सुटसुटीत मांडणी आणि प्रत्यक्ष व डिजिटल अनुभवांचा सुरेख संगम पाहायला मिळेल. हे स्टोअर्स ग्राहकांमधील नाविन्यता शोधण्याची वृत्ती, वैयक्तिकता आणि स्व-अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत पॅण्टालून्स व OWND!च्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर संगीता तनवानी म्हणाल्या, आम्हाला OWND!साठी ७५ स्टोअर्सच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा अत्यंत अभिमान वाटतो. यामधून ब्रँडने भारतातील तरूणांसोबत निर्माण केलेले दृढ संबंध दिसून येतात. मुंबईमध्ये आमचा प्रवेश आमच्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जेथे या शहराचा तरूणांमधील उत्साही संस्कृती व फॅशनवर प्रभाव दिसून येतो. आम्ही विकसित होत असताना आमचे ग्राहकांशी संलग्न राहण्यावर आणि त्यांच्यासह विकसित होणारा ब्रँड निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित आहे.
OWND! ब्रँड स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि सतत चर्चेत असलेल्या पिढीसाठी फॅशन-फॉरवर्ड कलेक्शन्सची व्यापक श्रेणी देतो. दैनंदिन आवश्यक पोशाखांपासून फॅशनेबल पेहरावांपर्यंत ब्रँड मेन्सवेअर, विमेन्सवेअर व किड्सवेअरमध्ये आरामदायीपणा, वैविध्यता आणि व्यक्तिमत्त्वासह अधिक उपलब्धता देतो. जागतिक फॅशन ट्रेंड्सचा मागोवा घेत आणि स्थानिक आवडीनिवडींचे (Local sensibilities) भान ठेवत OWND! आपले नवीन कलेक्शन्स सतत लाँच करत असते, ज्यामुळे ग्राहकांना नेहमीच काहीतरी नवीन आणि ट्रेंडी मिळत राहते.
७५ स्टोअर्सपर्यंत पोहोचण्याच्या टप्प्यामधून OWND!चा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि जनरेशन झेड ग्राहकांसोबत प्रबळ सांस्कृतिक संबंध दिसून येतात. ब्रँड फॅशनच्या पलीकडे जाणाऱ्या रिटेल अनुभवांना आकार देत आहे, संबंधित, सर्वसमावेशक आणि तरूणाईने भरलेल्या संस्कृतीमध्ये सामावलेले वातावरण निर्माण करत आहे. गतीशीलता, फॅशनेबल पैलू आणि ग्राहक-केंद्रित विचारसरणीवर सतत लक्ष केंद्रित करत OWND! देशभरात आपली उपस्थिती अधिक वाढवण्यास सज्ज आहे.




