खेल

प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय मोफत कॅरम स्पर्धा २७ डिसेंबरला

प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय मोफत कॅरम स्पर्धा २७ डिसेंबरला

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 13/12/2025 📞  8850212023

मुंबई,( NHI@24.COM) :   आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे अविनाश नलावडे स्पोर्ट्स व को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई सहकार्याने २७ डिसेंबर रोजी कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क असून सिबीईयु सभागृह, भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम येथे रंगणार आहे. पहिल्या आठ विजेत्या-विजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.

कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान चिरंतन राहण्यासाठी त्यांचे पुत्र क्रीडा संघटक अविनाश नलावडे यांनी शालेय खेळाडूंच्या प्रतिवर्षी उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयडियल ग्रुपच्या माध्यमातून शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे सातत्य कायम राखले आहे. स्पर्धेप्रसंगी शालेय खेळाडूंना मोफत मार्गदर्शन देखील होणार आहे. चॅम्पियन कॅरमवर ही स्पर्धा एका डावात सहा बोर्डच्या मर्यादेत होईल. स्पर्धेविषयक अधिक माहिती अथवा प्रवेश अर्जासाठी प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे १६ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!