कोटक सिक्युरिटीजचा २०२६ करता बाजाराबाबत दृष्टिकोन: जागतिक अस्थिरतेतही समभाग बळकट, तर सोन्याची चमक कायम राहणार
कोटक सिक्युरिटीजचा २०२६ करता बाजाराबाबत दृष्टिकोन: जागतिक अस्थिरतेतही समभाग बळकट

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 03/12/2025 📞 9004379946

मुंबई,( NHI@24.COM) : : कोटक सिक्युरिटीज लिमिटेड (“कोटक निओ”) ने २०२६ मधील शेअरबाजाराच्या वाटचालीबाबतचा ‘मार्केट आउटलुक २०२६’ हा अहवाल आज प्रसिध्द केला. जागतिक पातळीवर अनिश्चितता राहणार असली तरी भारतीय शेअरबाजार आणि आणि कमोडिटी क्षेत्र चांगली कामगिरी करण्याचा आशावाद या अहवालात व्यक्त करण्यात आलेला आहे. आगामी वर्षात गुंतवणूकदारांनी बारकाईने लक्ष ठेवावेत असे ढोबळ आर्थिक पातळीवरील प्रमुख प्रवाह (मॅक्रो ट्रेंड), क्षेत्रनिहाय निर्माण होऊ शकणाऱ्या संधी आणि कमोडिटी क्षेत्रातील प्रवाह याबाबत या अहवालात प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे.
अहवालाच्या अनावरणप्रसंगी बोलताना कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ श्रीपाल शाह म्हणाले, “जागतिक अस्थिरतेतही भारत विकासाचा लखलखणारा दिवा राहणार आहे. कंपन्यांचे उत्पन्न भरभक्कम राहण्याचा अंदाज आणि सरकारच्या धोरणात्मक पाठबळ या दोन घटकांमुळे समभागांबाबत आमचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहे. २०२६ मध्ये सोने गुंतवणूकीसाठी सुरक्षित मालमत्ता म्हणून आपली चमक कायम राखण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर तरुण गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे शेअरबाजार अधिकाधिक विस्तारेल आणि संपत्ती निर्मितीसाठी तो सज्ज आहे.”
गुंतवणूक उद्योगाच्या बाबतीत भाष्य करताना ते पुढे म्हणाले, “सेबीने नुकतेच केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार ६३ टक्के कुटुंबांना शेअरबाजारातील किमान एका तरी गुंतवणूक योजनेबाबत माहिती आहे. परंतु केवळ ९.५ टक्के कुटुंबे शेअरबाजारात गुंतवणूकीबाबत सक्रिय आहेत. यातून भारताच्या शेअर बाजारात वाढीची प्रचंड क्षमता दडली असल्याचे स्पष्ट होते. गुंतवणूक अधिकाधिक सर्वसमावेशक आणि सुलभ करण्यासाठी ब्रोकरेज कंपन्यांनी पुढाकार घेणे अतिशय आवश्यक आहे.”
कोटक सिक्युरिटीज मार्केट आउटलुक २०२६ अहवालात पुढील वर्षासाठी नमूद करण्यात आलेले प्रमुख प्रवाह आणि त्यांच्या परिणामांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे.
शेअर बाजार: आगामी वाटचालीसाठी आशावादी टप्पा
• सप्टेंबर २०२४ मध्ये भारतीय शेअरबाजाराने उच्चांकी पातळी गाठली. तेथून बाजारांमध्ये १७ टक्के घसरण झाली, परंतु २०२५ च्या अखेरीस निफ्टी फिप्टीने पुन्हा एकदा नवीन सर्वकालिन उच्चांकाला स्पर्श केला.
• लार्ज-कॅप्स समभागांमध्ये वाढ झाली तर मिड-कॅप्स आणि स्मॉल-कॅप्समध्ये घसरण झाली.
• ऑटोमोबाईल बँका आणि धातू क्षेत्रातील समभागांनी चमकदार कामगिरी केली तर आयटी आणि एफएमसीजी क्षेत्र अतिशय कमकुवत राहिले.
• विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सातत्याने भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला, परंतु स्थानिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करत बाजाराला वेळोवेळी सावरल्याने भारतीय शेअरबाजारावरील विश्वास आणखी बळकट झाला.
• प्राथमिक बाजारात मजबूत उलाढालीतून गुंतवणूकदारांचा आशावाद आणि लवचिकता अधोरेखित झाली.
निफ्टीबाबत अंदाज आणि आगामी लक्ष्य:
कंपन्यांच्या कमाईबाबतची धारणा आणखी बळकट झाली आहे. निफ्टीचा नफा आर्थिक वर्ष २७ मध्ये १७.६ टक्के आणि आर्थिक वर्ष २८ मध्ये १४.८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
स्थिर धारणा: डिसेंबर २०२६ पर्यंत निफ्टी २९,१२० अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर आर्थिक वर्ष २८ मध्ये १,४५६ रुपयांच्या इपीएसवर २०.० पट पीई गृहीत धरण्यात आलेला आहे.
तेजीची धारणा: ३२,०३२ अंशाचे लक्ष्य राहील (पीईच्या २२ पट).
मंदीची धारणा: नकारात्मक परिस्थिती राहिल्यास निफ्टी २६,२०८ अंशाच्या नजीक राहिल (पीईच्या १८ पट).
चालू वर्ष 26 साठी गुंतवणूकीकरता आमची पसंतीची क्षेत्र: बीएफएसआय, तंत्रज्ञान, हेल्थकेअर आणि हॉस्पीटॅलिटी
कमोडीटीज: सोने चमकेल, चांदीसुध्दा चमकणार
• २०२५ मध्ये सोन्याने चमकदार कामगिरी बजावताना दरात ५५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ साध्य केली. अर्थव्यवस्थेत कमालीची अनिश्चितता, विविध देशांमध्ये भू-राजकीय तणाव आणि जगभरातील मध्यवर्ती बँकेच्या जोरदार खरेदीमुळे सोन्याने प्रति औंसला ४,००० डॉलर दर ओलांडून शानदार कामगिरी केली आहे.
• रुपयाच्या घसरणीमुळे भारतात सोन्याच्या किंमती ६० टक्क्यांनी वाढल्या
• औद्योगिक पातळीवर व्यापार शुल्कासंबंधित अडथळे असूनही सुरक्षित-गुंतवणूकीचे साधन म्हणून वाढलेली मागणी आणि संरचनात्मक पुरवठ्यातील तूटीमुळे चांदीने दरात १०० टक्के वाढ साध्य करत जोरदार कामगिरी बजावली आहे.
• भू-राजकीय पातळीवरील तणावरुपी धक्के आणि त्याचबरोबर अतिरिक्त पुरवठ्याने कच्च्या तेलाच्या किमतीत १९ टक्के घट झाल्याने २०२६ मध्ये खनिज तेलदराच्या वाटचालीबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
• तांबे आणि अॅल्युमिनियमसारख्या मूलभूत धातूंचे दर अतिशय स्थिर राहिले आहेत. याची प्रमुख कारणे म्हणजे संरचनात्मक पातळीवर टिकलेली स्थिरता, एकीकडे वाढत्या विद्युतीकरणामुळे मागणीत वाढ तर दुसरीकडे पुरवठ्यातील अडचणी आदी कारणांमुळे दरांत अस्थिरता कायम आहे.
You can read the complete report here:
https://www.kotaksecurities.com/uploads/K_Sec_Market_Outlook_2026_66d62ea075.pdf
About Kotak Securities Limited
Kotak Securities Limited (KSL), a subsidiary of Kotak Mahindra Bank, is a full-service stock broking firm catering to retail and institutional investors across all segments of the capital market. Through a tie-up with partner brokers, the company also provides direct access to the US markets. Supported by a strong research team, robust digital trading platform Kotak Neo, large branch network & franchisee base, and referral coordinators spread across Kona Kona of India, KSL processes lakhs of secondary market trades every day. As of 30th September, 2025, KSL has a national footprint of 150 branches,1471 authorised person across 374 cities in India serving a client base of more than 60 lakhs. KSL provides a wide array of investment options in equities, derivatives (equities, commodities, currency). It also offers depository services and is engaged in the distribution of third-party products like mutual funds and insurance.
For more information, please visit https://www.kotaksecurities.com
Kotak Mahindra Group
Disclaimer
Kotak Securities Limited: CIN: U99999MH1994PLC134051, SEBI Registration No. INZ000200137 (Member of NSE, BSE, MSE, MCX & NCDEX), NSDL/CDSL: IN-DP-629-2021, AMFI-registered Mutual Fund Distributor. AMFI ARN: 0164, Date of Registration: July 07, 2002, Current validity of AMFI ARN – July 23, 2027, PMS INP000000258 and Research Analyst: INH000000586; BSE Enlistment No: 5035 for compliance T&C and disclaimers, Visit https://bit.ly/longdisc
Compliance Officer Details: Mr. Hiren Thakkar. Call: 022 – 4285 8484, or Email: ks.compliance@kotak.com.
Investments in securities market are subject to market risks, read all the related documents carefully before investing.
Registration granted by SEBI, Enlistment as RA and certification from NISM in no way guarantee performance of the intermediary or provide any assurance of returns to investors. Any views and/or opinions stated are personal. Please do thorough research or consult your financial manager/advisor before making an investment.
Please read the SEBI prescribed Combined Risk Disclosure Document prior to investing. Brokerage will not exceed SEBI prescribed limit. For compliance T&C and disclaimers, visit https://www.kotaksecurities.com/disclaimer/. All the offers related to MTF are subject to provisions under SEBI circular CIR/MRD/DP/54/2017 dated June 13, 2017.




