AU स्मॉल फायनॅन्स बँके महिलांसाठी क्यूरेटेड बँकिंग ‘M’ सर्कल लॉन्च
AU स्मॉल फायनॅन्स बँके महिलांसाठी क्यूरेटेड बँकिंग ‘M’ सर्कल लॉन्च

POSTED BY: ANAGHA, 06 NOVEMBER 2025 (9004379946)
व्यक्तित्व साजरे करत, ‘M’ सर्कल महिलांसाठी ऑफर करत आहे, स्मार्ट मनी सोल्यूशन्स, आरोग्य सुविधा आणि तिच्या अनेक सिद्धींची कदर करणारे जीवनशैली पुरस्कार
मुंबई, (NHI@24) : भारताची सर्वात मोठी स्मॉल फायनॅन्स बँक आणि युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्यासाठी रिझर्व बँकेची सैद्धांतिक मंजुरी मिळवणारी पहिली बँक अशी ख्याती असलेल्या AU स्मॉल फायनॅन्स बँकेने (AU SFB) आज ‘M’ सर्कलचे अनावरण केले, जो महिलांसाठी एक विशिष्ट बँकिंग प्रस्ताव आहे आणि महिलांच्या विशिष्ट आवश्यकता आणि आकांक्षांनुसार व्यक्तिगत विशेषाधिकार, खास आर्थिक उपाययोजना आणि विशिष्ट जीवनशैली अनुभव प्रदान करण्यासाठी तो बनवण्यात आला आहे.
भारतीय महिलांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत पहिल्यापासूनच महत्त्वाचे योगदान दिले आहे. याचे प्रमाण आता इतके वाढले आहे की, 23 टक्के शहरी महिला आपल्या घरातील प्रमुख आर्थिक निर्णय घेणाऱ्या व्यक्ती आहेत आणि महिलांच्या नेतृत्त्वाखालील लघु व्यवसाय 13.5 टक्के CAGR इतक्या प्रभावी दराने वाढत आहेत. भारतीय महिला संपत्ती निर्मिती, आपल्या वारशाचे तसेच जीवनशैलीचे जतन आणि संरक्षण करण्याबाबत आता खूपच जागरूक झाल्या आहेत. त्यामुळे, पारंपरिक ठेवी आणि कर्जाव्यतिरिक्त त्यांच्या इतर वाढत्या गरजा पूर्ण करणे बँकांसाठी आवश्यक झाले आहे.
AU स्मॉल फायनॅन्स बँक महिला उपभोक्त्यांच्या वाढत्या आकांक्षा आणि बँकिंग आव्हाने समजून घेण्याचा प्रयत्न करत करत असते. यामधून काही मुद्दे समोर आले आहेत:
– विश्वासाने डिजिटल बँकिंग: महिला डिजिटल बँकिंगचा लाभ घेऊ इच्छित आहेत, पण त्यासाठी निर्बाध अनुभव आणि दमदार सुरक्षा उपाय सादर करून त्यांचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे.
– आरोग्य आणि कल्याण व आर्थिक साक्षरता: महिला आपली लक्ष्ये साध्य करण्यात आणि आपले भविष्य सुरक्षित करण्यात शारीरिक आणि आर्थिक आरोग्याचे महत्त्व जाणतात.
– सहयोगी म्हणून संबंध-व्यवस्थापक: महिला कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय वैयक्तीकृत सल्ला आणि तोडगा प्रदान करणाऱ्या मार्गदर्शनाची आणि साहाय्याची कदर करतात.
– वैयक्तीकृत सुविधा: महिला सर्वसामान्य कौटुंबिक लाभांपेक्षा आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत गरजा भागवणारे विशेष लाभ अधिक पसंत करतात.
‘M’ सर्कलचा परिचय
‘M’ सर्कल बहुआयामी महिलांचा- त्यांच्या स्वप्नांचा, आकांक्षांचा आणि अधिक मिळवण्याच्या त्यांच्या जिद्दीचा गौरव करते. ‘M’ म्हणजे अनेक माईलस्टोन (सिद्धी) आणि मोमेंट्स (क्षण) आहेत, जे तिच्या जीवनाची जडणघडण करतात.
‘M’ सर्कल हे नव्या महत्त्वाकांक्षांचा नेटाने पाठपुरावा करणाऱ्या आणि सर्वार्थाने जीवन जगणाऱ्या महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. ‘M’ सर्कल हे प्रत्येक महिलेतील ‘M’ साठी आहे – Me आणि मायसेल्फ ! ते तिचे व्यक्तित्व, तिची पसंत आणि आपल्या प्रवासाला मोहकता देण्याच्या तिच्या हातोटीचा गौरव करते.
पारंपरिक बँकिंग प्रोग्राम एक सिंगल महिला-केंद्रित खाते देतात, पण ‘M’ सर्कल काही विशेष लाभ प्रस्तुत करते, जे बचत, चालू आणि NRI खात्यांमध्ये देण्यात येणाऱ्या AU ivy, AU ईटर्निटी, AU Royale आणि AU प्लॅटिनम वगैरे AU SFB च्या प्रीमियम ऑफरिंग्जपेक्षा अधिक आहेत.
मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ
- खास बँकिंग लाभ: लॉकर भाड्यावर अतिरिक्त 25% सवलत; प्राधान्य कर्ज दरात 0.2% कमी व्याज
- स्मार्ट आर्थिक स्वातंत्र्य उपाय: महिलांच्या स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी आणि जीवन लक्ष्याच्या दिशेने त्यांची जलद वाटचाल व्हावी यासाठी खास तयार केलेले गुंतवणूक कार्यक्रम आणि आर्थिक साक्षरता उपक्रम.
- समुदाय आणि संवाद: एकत्रितपणे आर्थिक आत्मविश्वास वाढविण्यासाठी निवडक कंटेंट, तज्ज्ञांची सत्रे आणि साथीदारांच्या प्रेरक कहाण्यांपर्यंत पोहोच.
- आरोग्य देखभाल आणि कल्याण: विनामूल्य प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या (कॅन्सर तपासणीसहित); स्त्री रोग, बाल रोग तज्ज्ञांशी अमर्यादित ऑनलाइन सल्ला व ऑफलाइन भेटीची सूट आणि कल्ट जिममध्ये सवलतीसह 1 वर्षाचे कल्ट होम सदस्यत्व; फार्मसी आणि निदानावर बचत.
- जीवनशैली आणि खरेदीतील लाभ: नायका, आजिओ लक्स, कल्याण ज्वेलर्स, बुकमायशो, झेप्टो आणि स्विगीवर खास ऑफर्स
- बिझनेस सोल्यूशन्स (महिला उद्योजिकांसाठी): व्यवसायोपयोगी वस्तूंची विनामूल्य प्राप्ती (UPI QR, POS, पेमेंट गेटवे, विझिटिंग कार्ड); कर आणि हिशेबात मदत; ब्रॅंडिंग व मार्केटिंगच्या ऑफर्स; ZOHO Books च्या माध्यमातून स्मार्ट बुककीपिंग आणि CRM साधने.
AU स्मॉल फायनॅन्स बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि डेप्युटी CEO श्री. उत्तम टिबरेवाल म्हणाले, “AU SFB येथे आम्ही हे जाणतो की, वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आणि व्यवसायातून आलेल्या महिलांच्या आर्थिक गरजा आणि आकांक्षा विशिष्ट असतात, मग त्या गृहिणी असोत, नोकरी करणाऱ्या व्यावसायिक असोत किंवा उद्योजिका असोत. ‘M’ सर्कल सह आम्ही महिलांना एक विवेकपूर्ण आणि वैयक्तीकृत बँकिंग अनुभव प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत. एक असा अनुभव जो त्यांच्या विशेष गरजा पूर्ण करेल, त्यांच्या व्यक्तित्वाची कदर करेल, त्यांचे यश साजरे करेल आणि त्यांच्या आकांक्षांना पाठबळ देईल. ती आपल्या घरची अर्थव्यवस्था सांभाळत असो, कॉर्पोरेट क्षेत्रात प्रगतीशील असो किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करत असो, ‘M’ सर्कल हे प्रत्येक टप्यावर तिला मदत करण्यासाठी बनवण्यात आले आहे. AU SFB भारतातील लक्षावधी महिलांच्या प्रवासात सहभागी होताना गर्व अनुभवत आहे आणि त्यांची सन्मानपूर्वक, आदरपूर्वक आणि काळजीपूर्वक सेवा करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
AU स्मॉल फायनॅन्स बँकेने महिलांसाठी क्यूरेटेड बँकिंग ‘M’ सर्कल लॉन्च केले



