अॅरिसरने क्रिकेट स्टार रविंद्र जडेजा यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली
अॅरिसरने क्रिकेट स्टार रविंद्र जडेजा यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली

POSTED BY: ANGHA SAKPAL September 5, 2025
राष्ट्रीय, २ सप्टेंबर २०२५: अॅरिसर या दैनंदिन गो-गेटर्ससाठी स्मार्ट-कॅज्युअल लेबलने आज त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेट सेन्सेशन रविंद्र जडेजा यांच्या नियुक्तीची घोषणा केली. क्रिकेट जगतात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले जडेजा अॅरिसररच्या स्टाइलप्रती कटिबद्धतेशी संलग्न आहेत, जी योग्यरित्या फिट बसते, आकर्षक वाटते आणि तुम्हाला शोभून दिसते.
विकसित होत असलेल्या मेन्सवेअर बाजारपेठेत अॅरिसर आरामदायीपणा, कारागिरी व समकालीन डिझाइनच्या संयोजनामुळे इतरांपेक्षा वरचढ आहे. ब्रँड प्रिंटेड, स्ट्रिप व आकर्षक शर्ट्स, पोलो, चिनो, डेनिम व अॅक्टिव्हवेअर अशी विविध वॉर्डरोब भर देतो, जे दैनंदिन वापरासह आधुनिक काळात आकर्षक दिसण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. प्रत्येक पीस सहजतेने डिझाइन करण्यात आला आहे, सीझनला साजेसे आहे, ज्यामुळे पुरूष अधिक आकर्षक व स्टायलिश दिसतात आणि दिवस-रात्र स्वत:ची स्टाइल कायम ठेवू शकतात.
“आम्हाला अॅरिसरचा नवीन चेहरा म्हणून आमच्या कुटुंबामध्ये रविंद्र जडेजा यांचे स्वागत करताना अभिमान वाटतो,” असे अॅरिसरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. आर. अरूणेश्वर म्हणाले. “श्री. जडेजा यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीपासून भारतातील सर्वात विश्वासार्ह अष्टपैलू खेळाडू बनण्यापर्यंतच्या प्रवासामधून अॅरिसरची महत्त्वाकांक्षा, सातत्यता आणि स्टाइलची स्वत:ची गाथा दिसून येते. त्यांचा उत्तम खेळ आणि प्रभावी आत्मविश्वास त्यांना विश्वास व कार्यक्षमतेवर डिझाइन करण्यात आलेल्या ब्रँडसाठी परिपूर्ण चेहरा बनवतात. ट्रेडिंग रंगसंगती, वैविध्यपूर्ण फिट्स आणि कालातीत डिझाइनसह आम्ही सतत प्रगती करणाऱ्यांसाठी आलो आहोत आणि श्री. जडेजा त्यांच्या उत्साहाचे प्रतीक आहेत.”
या सहयोगाबाबत आपला आनंद व्यक्त करत रविंद्र जडेजा म्हणाले, “मला अॅरिसरसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो. हा भारतीय ब्रँड आजच्या काळातील पुरूषांच्या व्यस्त, सक्रिय व नेहमी धावपळीच्या जीवनशैलीला समजून घेतो. अॅरिसरला वेगळे ठरवणारी बाब म्हणजे त्यांनी प्रत्येक पीसमध्ये दर्जा, आरामदायीपणा आणि कारागिरीवर लक्ष केंद्रित केले आहे. मी प्रशिक्षण घेत असो, प्रवास करत असो किंवा कार्यक्रमाला उपस्थित असो मला आकर्षक दिसण्यासोबत आरामदायी वाटणारे पोशाख आवडतात आणि हा ब्रँड याबाबतीत अग्रस्थानी आहे. फिटिंग, फिनिशिंग, फिल सर्वकाही योग्य आहे, तसेच पोशाखांची किंमत देखील परवडणारी आहे, ज्यामुळे मेन्सवेअरमध्ये नवीन उत्साहाची भर झाली आहे. मी अशा स्टाइल व आकर्षकतेसह दैनंदिन फॅशनला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधीत्व करण्यास उत्सुक आहे.”
टेलिव्हिजन, डिजिटल, आऊटडोअर आणि रिटेल टचपॉइण्ट्सवर राबवण्यात येणारी सर्वांगीण मोहिम जाडेजा व अॅरिसरच्या नवीन कलेक्शनला सादर करेल, ज्यामधून स्मार्ट-कॅज्युअल मेन्सवेअर पाहायला मिळतील.
अधिक माहितीसाठी भेट द्या – https://ariser.co.in/