केविनकेअरने 'CHIK क्विक क्रीम हेअर कलर' लाँच करत क्रीम हेअर कलरच्या वाढत्या बाजारपेठेत दमदार प्रवेश
केविनकेअरने 'CHIK क्विक क्रीम हेअर कलर' लाँच करत क्रीम हेअर कलरच्या वाढत्या बाजारपेठेत दमदार प्रवेश

Posted By Anagha Sakpal 5 September2025
मुंबई : केविनकेअरने ‘CHIK क्विक क्रीम हेअर कलर’ लाँच करत क्रीम हेअर कलरच्या वाढत्या बाजारपेठेत दमदार प्रवेश केला आहे. अंदाजे १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या आणि दरवर्षी १५% वेगाने वाढणाऱ्या या सेगमेंटमध्ये, बँडने उत्तर प्रदेश, राजस्थान आणि लवकरच मध्य प्रदेशात हे उत्पादन सादर केले आहे. हा ब्रँडसाठी दक्षिण भारताबाहेरचा पहिला मोठा लाँच असून, पुढील काळात देशातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये विस्ताराची योजना आखली आहे.
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी हिला या उत्पादनाची ब्रँड अम्बेसेडर म्हणून नेमण्यात आले आहे. या निमित्ताने बँडने प्रिंट, डिजिटल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पसरलेली ३६०० मार्केटिंग मोहीम राबवली आहे. ग्राहकांना सुलभ, जलद आणि पौष्टिक पर्याय देणारे CHIK क्विक क्रीम हेअर कलर आवळा आणि भृंगराजसारख्या नैसर्गिक घटकांनी समृद्ध आहे. हे उत्पादन फक्त १० मिनिटांत केसांना दोलायमान रंग देण्याचे आश्वासन देते, तसेच अल्ट्रा-रिच आणि ग्लॉसी फिनिशमुळे पारंपरिक हेअर कलर वापरकर्त्यांसाठी अधिक चांगला अनुभव निर्माण करते. नॅचरल ब्लॅक, नॅचरल ब्राउन आणि बरगंडी या तीन शेड्समध्ये उपलब्ध असलेले हे उत्पादन फक्त ११० च्या किफायतशीर किमतीत मिळणार आहे. या लाँचबाबत केविनकेअरचे पर्सनल केअर व्यवसाय प्रमुख रजत नंदा म्हणाले, “CHIK नेहमीच केसांच्या निगेची ओळख सोपी आणि नाविन्यपूर्ण केली आहे. ‘CHIK क्विक क्रीम’ हे त्या वारशाला केसांच्या रंगात आणत आहे.