आशीर्वाद आटा गहुच्या दाण्याला कृतज्ञतेची वंदना अर्पण करून साजरा करत आहे गणेशोत्सव
Ganesh Chaturthi is celebrated by offering gratitude to the blessed wheat grain.

ब्रँडने “गहू गहू आहे विशेष, प्रत्येक गव्हामध्ये आहे गणेश” हा नवा उपक्रम सुरू केला आहे – उत्सवाची भावना आणि परंपरा यांचा संगम साधणारा असा हा पहिल्यांदाच राबवलेला उपक्रम.
मुंबई, (NHI): आयटीसीच्या आशीर्वाद आटाने मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंडपांपैकी एक “अंधेरीचा राजा” येथे आपला एक अनोखा उत्सवी उपक्रम सादर केला आहे. “गहू गहू आहे विशेष, प्रत्येक गव्हामध्ये आहे गणेश” या विशेष मोहिमेद्वारे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाद्वारे आशीर्वादने शुद्धता आणि भक्तीभावाला हृदयस्पर्शी वंदन करत, एक दिव्य आश्चर्य उघडले आहे — शुद्ध गव्हाच्या एका दाण्यावर कोरलेली श्रीगणेशांची प्रतिमा. दोन दशकांहून अधिक काळ आशीर्वाद हे भारतातील सर्वात विश्वासार्ह आटा ब्रँड म्हणून घराघरात पोहोचले आहे आणि उत्तम दर्जाचा गहू पुरवला आहे. हा उपक्रम ब्रँडच्या शुद्धता आणि गुणवत्तेप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे.
या मोहिमेचे मुख्य आकर्षण आहे गणेशा क्रिएशन झोन — जिथे गव्हाच्या शुद्धतेला एक भक्तिपूर्ण अनुभवाच्या रूपाने साकारले आहे. येथे भक्तांना स्वतःच्या कल्पनेप्रमाणे श्रीगणेशांची कलाकृती तयार करण्यासाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येक कलाकृतीचे रूपांतर एका भव्य सुवर्ण गव्हाच्या दाण्यावरील प्रतिमेत केले जाते, त्यावर भक्ताचे नाव कोरले जाते. हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी भक्तांना श्रीगणेश कोरलेला गव्हाचा दाणा, सोबत प्रसाद व उत्सवी भेट पॅक स्मृतिचिन्ह म्हणून दिले जाते.
या प्रसंगी बोलताना श्री. अनुज रुस्तगी, चीफ एक्झिक्युटिव्ह – स्टेपल्स, फूड्स डिव्हिजन, आयटीसी लि. म्हणाले: “महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत भव्यतेने साजरा केला जातो. आम्हाला भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करायचा होता. ‘गहू गहू आहे विशेष, प्रत्येक गव्हामध्ये आहे गणेश’ ही मोहीम या भावनेचे दर्शन घडवते. आशीर्वादचा प्रत्येक गव्हाचा दाणा श्रीगणेशाच्या आशीर्वादाइतकाच विशेष आहे , शुद्ध आणि उत्तम दर्जाचा, कारण ते योग्य शेतांमधून काळजीपूर्वक निवडलेले असतात. आमच्या नुकत्याच लाँच केलेल्या आशीर्वाद चक्की रेंज प्रिमियम सीहोरी,सीहोरी,लोकवन आणि खपली आटा या मूल्यांचे प्रतीक असून, मुंबईतील गृहिणींच्या पसंतीचे ठरले आहेत.”
उत्सवाच्या सोहळ्याला अधिक रंगत आणण्यासाठी लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्प्रुहा जोशी यांनी आशीर्वादच्या या क्रिएशन झोनला भेट दिली आणि भक्तांसोबत संपूर्ण उपक्रमाचा अनुभव घेतला. तसेच जागतिक स्तरावर प्रसिद्ध सूक्ष्मचित्रकार पन्ना महेश्वरी यांनी आपल्या अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करत प्रत्यक्ष गव्हाच्या दाण्यावर हाताने श्रीगणेशांची प्रतिमा रंगवली. या कलाकृतींपैकी निवडक गव्हाचे दाणे मान्यवर
व्यक्ती आणि भाग्यवान भक्तांना स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आले, ज्यामुळे हा गणेशोत्सव खरोखरच आगळावेगळा ठरला.
स्प्रुहा जोशी म्हणाल्या: “गणेशोत्सव हा प्रत्येक मुंबईकराच्या हृदयाजवळचा सण आहे. हा सुंदर उपक्रम आपले दैवत आपल्या जीवनातील प्रत्येक अंगाला कसे स्पर्श करते याचे उत्तम दर्शन घडवतो.आशीर्वाद आटाच्या या उपक्रमाचा भाग होण्याचा मला अभिमान वाटतो.”
या उपक्रमाला अधिक दृढ करण्यासाठी आशीर्वाद आटा ने “गव्हाच्या दाण्यांवर कोरलेल्या सर्वाधिक श्रीगणेश मूर्तींचे वितरण” या विक्रमासाठी प्रयत्न करण्याची घोषणा केली आहे. हा क्रिएशन झोन २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान, दररोज सायं. ४ नंतर भक्तांसाठी खुला असेल.