IPO AND MARKET NEWS

कॅप्री ग्लोबल कॅपिटलकडून ₹५०० कोटींची सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबद्ध आणि परतफेडयोग्य रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीचा ‘पहिला टप्पा’ घोषित

कॅप्री ग्लोबल कॅपिटलकडून ₹५०० कोटींची सुरक्षित

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 10/04/2026 📞  8850212023
  • वार्षिक ९.५०% पर्यंत व्याजदर
  • पतमानांकन: इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगकडून ‘IVR AA/Positive’ आणि अक्यूट रेटिंग्ज अँड रिसर्चकडून ‘ACUITE AA | Stable’ मानांकन
  • रोखे विक्री बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी खुली होईल आणि मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी बंद होईल*
  • रोख्यांची खरेदी-विक्री व्यवहार ‘डीमटेरियलाईज्ड’ (कागदविरहित) स्वरूपात केली जाईल
  • वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केले जाईल; रोखेविक्रीला अतिरिक्त मागणी असल्यास वाटप प्रमाणशीर पद्धतीने होईल.

मुंबई NHI24.COM(M) : कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडने (“कंपनी”) सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबद्ध आणि परतफेडयोग्य ‘अपरिवर्तनीय रोखे – नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी)’च्या सार्वजनिक विक्रीचा ‘पहिला टप्पा’ गुरुवारी जाहीर केला. या रोखेविक्रीतून एकूण ₹५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारला जाणार असून, यामध्ये ₹१,०० कोटींचा मूळ आकार (बेस इश्यू साइझ) निश्चित करण्यात आला असून, अधिक प्रतिसाद मिळाल्यास जास्तीचे ४०० कोटी रुपये स्वीकारण्याचा ‘ग्रीन शू’ पर्याय कंपनीने खुला ठेवला आहे.”

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश शर्मा म्हणाले, “सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबद्ध आणि परतफेडयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांच्या पहिल्या टप्प्यातील विक्रीचा शुभारंभ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. कॅप्री ग्लोबल कॅपिटलमध्ये, आम्ही आमच्या चार कर्ज विभागांद्वारे – म्हणजेच एमएसएमई कर्जे, गृह कर्जे, सोने तारण कर्जे आणि बांधकाम वित्तपुरवठा – विविध प्रकारची सुरक्षित आणि तारण-आधारित कर्जे उपलब्ध करून देतो. भक्कम अंमलबजावणी क्षमता, जोखीम व्यवस्थापनातील विवेकपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक-संपर्कावर असलेला आमचा विशेष भर; या सामर्थ्यांच्या जोरावर, संपूर्ण भारतभर आर्थिक सेवांपासून वंचित असलेल्या ग्राहकांना आधार देण्याच्या आमच्या उद्देशाप्रती आम्ही कटिबद्ध आहोत.”

अपरिवर्तनीय रोख्यांच्या या सार्वजनिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना २४ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने असे गुंतवणुकीचे विविध कालावधीचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, गुंतवणूकदार मासिक किंवा वार्षिक स्वरूपात व्याजाची रक्कम स्वीकारण्याचा पर्याय निवडू शकतात आणि त्यांना वार्षिक ९.५० टक्क्यांपर्यंतचा व्याजदराचा लाभ (कूपन रेट्स) मिळविता येईल. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये अपरिवर्तनी रोख्यांच्या प्रत्येक मालिकेसाठीचे व्याजदर आणि कालावधी यांसह सर्व तपशील नमूद केलेला आहे. हे अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) ‘बीएसई लिमिटेड’वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

रोखेविक्रीची रचना:

मालिका I II III IV V** VI
व्याजप्राप्तीची वारंवारता वार्षिक मासिक वार्षिक मासिक वार्षिक वार्षिक
किमान अर्ज रक्कम ₹10,000 (10 NCDs) and in multiple of ₹1,000 (1 NCD) thereafter.
रोख्यांचे दर्शनी मूल्य / इश्यू किंमत (₹/ एनसीडी) ₹ 1,000
त्यानंतरच्या पटीत (₹) ₹ 1,000 (1 एनसीडी)
कालावधी 24 महिने 36 महिने 36 महिने 60 महिने 60 महिने 120 महिने
श्रेणी I, II, III आणि IV मधील रोखेधारकांसाठी कूपन (% प्रति वर्ष) 9.00% 8.80% 9.15% 8.93% 9.30% 9.50%
श्रेणी I, II, III आणि IV मधील रोखेधारकांसाठी प्रभावी परतावा (प्रति वर्ष) 8.99% 9.15% 9.14% 9.30% 9.29% 9.49%
व्याज देयकाची पद्धत उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांद्वारे
श्रेणी I, II, III आणि IV मधील रोखेधारकांसाठी मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम (₹ / एनसीडी) ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000
मुदतपूर्ती/विमोचन तारीख (वाटपाच्या विहित तारखेपासूनचे महिने) 24 महिने 36 महिने 36 महिने 60 महिने 60 महिने 120 महिने
पुट आणि कॉल पर्याय अनुपलब्ध
कर्जाचे स्वरूप सुरक्षित (Secured)

ज्यांनी कोणत्याही मालिकेची निवड नमूद केलेली नाही, अशा अर्जदारांना ‘मालिका V’ मधील रोख्यांचे वाटप कंपनीकडून केले जाईल.

 १.   ज्या मालिकांमध्ये व्याजाचे वितरण वार्षिक आधारावर केले जाणार आहे, अशा मालिकांच्या बाबतीत, रोख्यांच्या दर्शनी मूल्यावर संबंधित व्याज हे ‘वाटपाच्या मानित तारखे’च्या प्रत्येक वर्धापनदिना दिवशी दिले जाईल. वार्षिक मालिकांअंतर्गत व्याजाचे अंतिम पेमेंट रोख्यांच्या विमोचनाच्या वेळी केले जाईल.

२.   ज्या मालिकांमध्ये व्याजाचे वाटप मासिक तत्त्वावर केले जाणार आहे, अशा मालिकांच्या संदर्भात, संबंधित व्याज रोख्यांच्या दर्शनी मूल्यावर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दिले जाईल. मासिक मालिकेअंतर्गत व्याजाचे शेवटचे वाटप रोख्यांच्या विमोचनाच्या वेळी केले जाईल. मासिक मालिकेअंतर्गत रोख्यांच्या व्याजाच्या पहिल्या वाटपासाठी, ‘वाटपाची मानित तारखे’पासून पुढील महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे व्याज एकत्रित केले जाईल आणि त्या पुढील महिन्याच्या (म्हणजेच दुसऱ्या महिन्याच्या) पहिल्या दिवशी ते दिले जाईल.

३.   स्रोतातून कर कपातीस (टीडीएस) अधीन, जर लागू असेल तर.

४.   सेबीच्या एनसीएस मुख्य परिपत्रकानुसार कंपनीच्या रोख प्रवाहाशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया दिनांक ३० मार्च २०२६ रोजीच्या ‘पहिला टप्पा’ माहितीपत्रकातील ‘परिशिष्ट डी’ पाहावे.

 या रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५% निधीचा वापर पुढील कर्जवाटप, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जांचे व्याज व मुद्दल परतफेड करण्यासाठी केला जाईल; आणि उर्वरित निधीचा वापर ‘सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी’ करण्याचे प्रस्तावित आहे. हा वापर ‘पहिला टप्पा’ रोखे विक्रीतून उभारलेल्या आणि वाटप केलेल्या रकमेच्या २५% पेक्षा जास्त नसावा, अशी अट यास लागू आहे; तसेच हे वापर ‘भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (परिवर्तनीय नसलेल्या प्रतिभूतिंचे निर्गमन आणि सूचीकरण) विनियम, २०२१’ (SEBI NCS Regulations, 2021) च्या अनुषंगाने केले जातील.

About Capri Global Capital Ltd:

Capri Global Capital Limited is a well-diversified retail focused systemically important Non-Banking Financial Company listed on the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited. With an AUM of Rs. 304,064.59 million as on December 31, 2025 on consolidated basis, and serving customer base of 626,161 through 13,066 employees and 1,331 branches, as of December 31, 2025. Company offers a wide range of secured and collateralized loans across four primary lending segments – MSME Loans, Gold Loans, and Construction Finance while Housing Loans are offered through its 100% subsidiary, Capri Global Housing Finance Limited (“CGHFL”). Company also has fee-based businesses such as distribution of car loan products and has a composite license for distribution of Life, General and Health insurance policies.

Disclaimer:

*The Tranche I Issue may close on such earlier date or extended date as may be decided by the Board of Director or the Management Committee, subject to necessary approvals.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!