भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते अक्षय पात्रच्या ५ बिलियन मध्यान्ह भोजन देण्याच्या टप्प्याला आणि २५ वर्षांच्या सेवेला प्रशंसित करण्यात येणार
२५ वर्षांच्या सेवेला प्रशंसित करण्यात येणार

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 13/03/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अक्षय पात्र फाऊंडेशनच्या भारतातील मुलांसाठी ५ बिलियन मध्यान्ह भोजन पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक टप्प्याला, तसेच फाऊंडेशनच्या २५ वर्षांच्या सामाजिक सेवेच्या पूर्ततेला प्रशंसित करण्यात येणार आहे. फाऊंडेशनचे हे प्रयत्न भारत सरकारच्या प्रमुख पीएम पोषण उपक्रमाचा भाग आहेत. या इव्हेण्टची थीम ‘विकसित भारतसाठी सुपोषित व सुशिक्षित भारत’ आहे, ज्याला बालपोषण व शिक्षणाच्या माध्यमातून नवीन व विकसित भारत घडवण्याच्या दृष्टिकोनाचा पाठिंबा आहे.
भारताच्या माननीय राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवतील आणि माननीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेन्द्र प्रधान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील. १७ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये (आरबीसीसी) अक्षय पात्रचे संस्थापक – अध्यक्ष श्री. मधू पंडित दासा आणि उपाध्यक्ष श्री. चंचलापती दासा यांच्यासह संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमाला वरिष्ठ सरकारी अधिकारी, प्रतिष्ठित नेते, सार्वजनिक धोरणकर्ते, दानशूर व्यक्ती, भागीदार, समर्थक आणि प्रमुख भागधारक उपस्थित राहतील. तसेच, अक्षय पात्रच्या माजी लाभार्थ्यांपैकी काही विद्यार्थी, पालक, सरकारी शाळांचे शिक्षक आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित असतील.
या उपक्रमामधून २००० मध्ये स्थापना झाल्यापासून पौष्टिक मध्यान्ह भोजनाच्या माध्यमातून वर्गामधील भूकेचे शमन करण्याप्रती, तसेच मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्याप्रती अक्षय पात्रचे शाश्वत प्रयत्न दिसून येतील. फाऊंडेशन सध्या भारतातील १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमधील २.३५ दशलक्षहून अधिक मुलांना पौष्टिक मध्यान्ह भोजन देते.
