सहज-सुंदर अॅट-होम हेअर कलरची जाहिरात करणाऱ्या गार्निअर कलर नॅचरल्सच्या नवीन अभियानात रवीना टंडन झळकली
या नवीन जाहिरातीत रवीना टंडन केसांच्या रिच आणि पोषण युक्त लुकसाठी सहज-सुंदर अॅट-होम कलरचे गुणगान करताना दिसते

POSTED BY: MRUNALI SAKPAL DATED ON: 16/3/26 (885012023)
मुंबई, मार्च 2026: गार्निअर कलर नॅचरल्स या आपल्या पोषण देणाऱ्या हेअर कलर रेंजसाठी ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून गार्नियरने पहिल्यांदाच अभिनेत्री रवीना टंडन सोबत हातमिळवणी केल्याचे जाहीर केले आहे. या भागीदारीतून एक नवीन अभियान सुरू झाले आहे, ज्यात रवीना झळकली आहे. ही जाहिरात नैसर्गिक दिसणाऱ्या आणि चमकदार हेअर कलरमधील गार्निअर या ब्रॅंडचे विश्वासार्ह नैपुण्य आणि सर्व वयोगटांमध्ये असलेले रवीनाच्या रूपाचे आकर्षण यांची सांगड घालते.
90 च्या दशकातील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रवीना टंडन आपल्या सहज-सुंदर रूपाबद्दल आणि मोहकतेबद्दल ओळखली जाते. ती जेव्हा गार्निअर कलर नॅचरल्सने घरच्या घरी केसांना रंग लवण्यातील सोपेपणा सांगते, त्यामुळे कसा आत्मविश्वास वाढतो हे सांगते, तेव्हा ते आपल्या मनाला सहज भिडते आणि पटते. या जाहिरातीत रवीना एक मस्त गाणे गुणगुणताना दिसते, जेव्हा अचानक स्वतःचे काही पांढरे झालेले केस तिच्या नजरेस पडतात. ती अजिबात विचलित होत नाही, आणि तिचा हात गार्निअर कलर नॅचरल्सकडे वळतो. यानंतर तिच्यात सहजतेने घडलेले परिवर्तन दिसते. यामधून या उत्पादनामुळे मिळणाऱ्या रिच नैसर्गिक लुकबरोबरच ते उत्पादन वापरण्यातील सुलभता आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे सहज स्थान ठळकपणे जाणवते. रवीनाच्या मोहकतेमुळे ही दैनंदिन घटना सामान्य दिसते आणि उत्कृष्ट रंग, सखोल कंडिशनिंग सोबत केसांना पोषण देणाऱ्या हेअर कलरवरील तिचा आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो.
या प्रसंगी बोलताना गार्निअरचे जनरल मॅनेजर श्री. अजय सिम्हा म्हणाले, “आम्ही गार्नियर परिवारात रवीना टंडनचे सहर्ष स्वागत करतो. रवीनाचा सहजपणा, आत्मविश्वास आणि तिची मोहकता हे सर्वच आमच्या सर्व वयोगटातील उपभोक्त्यांना आपलेसे वाटते आणि तिच्या रूपातून या ब्रॅंडचा विश्वसनीय हेअर कलर नैपुण्याचा वारसा झळकतो. या भागीदारीच्या माध्यमातून गार्निअर कलर नॅचरल्ससह आम्ही सहज-सुलभ रंग आणि आत्मविश्वास साजरा करत आहोत तसेच हे दाखवून देत आहोत की, घरच्या घरी रिच आणि पोषण देणारा केसांचा रंग लावणे किती सोपे आणि कमी वेळात साध्य होऊ शकणारे आहे.”
गार्निअर कलर नॅचरल्स ऑलिव्ह, बदाम आणि अॅव्हकॅडो या तीन पोषक तेलांनी समृद्ध असून ते रिच, नैसर्गिक दिसणारा रंग देते आणि त्याचबरोबर केसांचे कंडिशनिंग देखील करते. कलर बूस्ट टेक्नॉलॉजीने युक्त असलेला हा फॉर्म्युला चमकदार रंग सुनिश्चित करतो. अमोनिया-विरहित हे उत्पादन केसांना रंगवण्याची प्रक्रिया झटपट, सोयिस्कर पद्धतीने आणि दैनंदिन जीवनात सहज साध्य करून देते. या ब्रॅंडमधील रवीनाने दाखवलेला आत्मविश्वास आणि हे उत्पादन वापरण्यातील सुलभता यामुळे पहिल्यांदा वापर करणाऱ्या आणि नियमित हे उत्पादन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक विश्वसनीय ब्रॅंड म्हणून गार्निअर कलर नॅचरल्सचे स्थान अधिक बळकट होते.
आपला उत्साह व्यक्त करत ब्रॅंड अम्बॅसडर रवीना टंडन म्हणाली, ” गार्निअर कलर नॅचरल्ससही भागीदारी करताना मी रोमांचित आहे, कारण हा ब्रॅंड विश्वास आणि आत्मविश्वासाचे मूल्य जाणतो आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या दैनंदिन जीवनात याच मूल्यांचा आधार वाटतो. गार्निअर कलर नॅचरल्स घरच्या घरी केसांना रंग लावणे ज्या पद्धतीने सुलभ करते, ते मला आवडते. आणि हा रंग लावल्यावर मिळणारा लुक अत्यंत नैसर्गिक आणि सुंदर दिसतो. हे झटपट आणि सोयिस्कर सोल्यूशन माझ्या दिनचर्येत अगदी चपखल बसते.”
रिच रंग आणि पोषणाचा फॉर्म्युला देणारे गार्निअर कलर नॅचरल्स अशा उपभोक्त्यांसाठी एक विश्वासार्ह उत्पादन आहे, जे घरच्या घरी सुलभतेने आणि विश्वसनीय पद्धतीने हेअर कलर लावणे पसंत करतात. या नवीन जाहिरातीत रवीना टंडन आपल्या सहज मोहकतेने गार्निअर कलर नॅचरल्ससह एक दैनंदिन क्षण आत्मविश्वासपूर्ण कृतीमध्ये कसा रूपांतरित होतो हे दाखवते.

