आरोग्यमहाराष्ट्रलोकल न्यूज़

महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये स्ट्रोक केअर मजबूत करण्यासाठी आणि रुग्णांचे परिणाम सुधारण्यासाठी रोडमॅप तयार केला

रुग्णांचे परिणाम सुधारण्यासाठी रोडमॅप तयार केला

POSTED BY MRUNALI SAKPAL ON DATED 06/03/2026(885021023)

मुंबई, (NHI@24.IN): इंडियन मेडिकल पार्लिमेंटेरियन्स फोरम (आयएमपीएफ)ने युरोपियन बिझनेस ग्रुपसोबत सहयोगाने महाराष्ट्र स्ट्रोक समिटचे आयोजन केले. या समिटला नॉलेज पार्टनर म्‍हणून मेडट्रॉनिकचे पाठबळ लाभले आहे.
भारतात मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजारांमध्‍ये स्ट्रोकचा चौथा क्रमांक आहे, तर विकलांगत्वाच्या कारणांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू आणि विकलांगत्व या बाबतीत महाराष्ट्र भारतातील टॉप १० राज्यांमध्‍ये सामील आहे. या चिंताजनक आकडेवारीमधून सार्वजनिक जागरूकता वाढवण्‍याची, वेळेवर निदान करण्‍याची आणि स्ट्रोकच्या रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी क्रिटिकल केअर इन्फ्रास्ट्रक्चर म्‍हणजेच अतिदक्षता पायाभूत सुविधा प्रगत करण्‍याची गरज दिसून येते.
सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे स्ट्रोक उपचारांमध्ये लक्षणीय टेक्निकल प्रगती झाली आहे, पण अजूनही मोठी आव्हाने कायम आहेत. भारतात, सामान्यतः स्ट्रोकची धोक्याची लक्षणे ओळखण्याबाबत कमी जागरूकता, प्रशिक्षित डॉक्टर व सुविधांच्या अभाव, सिद्ध झालेल्या उपचार पद्धतींचा मर्यादित वापर आणि उपचारांचा वाढता खर्च यामुळे अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्‍ये जाण्‍यास उशीर करतात, ज्यानंतर उपचारासाठी होणारा खर्च अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जातो. या फोरममध्ये केईएम हॉस्पिटलच्‍या डीन डॉ. संगीता रावत यांनी ‘भारतातील स्ट्रोक व्यवस्थापनाचे क्लिनिकल पुरावे’ (आयसीएमआर व पीआरएएएन अभ्यास) आणि केईएम हॉस्पिटलचे प्राध्यापक व युनिट हेड डॉ. नितीन एन. डांगे यांनी ‘एमजेपीजेएवाय अंतर्गत स्ट्रोक उपचारांचा समावेश व आवश्यक पाठबळ’ या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. या फोरमने स्ट्रोक सेवा वितरणातील सध्याच्या त्रुटींचे सखोल परीक्षण करण्यावर आणि शाश्वत उपायांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. तसेच, उच्च दर्जाचे उपचार वेळेवर, प्रभावीपणे आणि सर्वांना समान रीतीने उपलब्ध व्हावेत यासाठी स्ट्रोक सेंटर्सची स्थापना आणि सक्षमीकरण करण्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनावर देखील चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी, *महाराष्ट्र सरकारचे माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाशराव आबिटकर म्हणाले* , “स्ट्रोक हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मृत्युदर आणि दीर्घकालीन अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्याचा खोलवरचा सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक परिणाम ओळखून, भारत सरकारने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत व्यापक स्ट्रोक केअर पॅकेजेस समाविष्ट करून एक परिवर्तनकारी पाऊल उचलले आहे. या पॅकेजेसमध्ये थ्रोम्बोलिसिस, समर्पित स्ट्रोक केअर युनिट्समध्ये व्यवस्थापन आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी यासारख्या महत्त्वाच्या हस्तक्षेपांचा समावेश आहे. हा धोरणात्मक समावेश देशाच्या आरोग्यसेवा संरचनेला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रगत, वेळेनुसार संवेदनशील स्ट्रोक थेरपीजची उपलब्धता वाढवून आणि रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करून, हा उपक्रम आरोग्यसेवा पुरवठ्यामध्ये समानता आणि परवडणाऱ्या क्षमतेच्या तत्त्वांना बळकटी देतो.”
*राज्यसभेचे सदस्य आणि इंडियन मेडिकल पार्लमेंटेरियन्स फोरमचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे* म्हणाले, “महाराष्ट्र स्ट्रोक समिट आपल्या राज्यात अधिक प्रतिसादात्मक आणि समतापूर्ण स्ट्रोक केअर इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्ट्रोक हा भारतातील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी एक आहे आणि वाढत्या ओझ्यासाठी – विशेषतः मुंबईसारख्या शहरी केंद्रांमध्ये – त्वरित, समन्वित आणि पद्धतशीर कृतीची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान आणि क्लिनिकल क्षमतांमध्ये प्रगती उत्साहवर्धक असली तरी, आपण एकत्रितपणे सततच्या अडथळ्यांना तोंड दिले पाहिजे आणि स्ट्रोकसाठी तयार नेटवर्क मजबूत करणारे, वेळेनुसार संवेदनशील उपचारांची उपलब्धता वाढवणारे शाश्वत, स्केलेबल उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भूगोल किंवा आर्थिक स्थिती काहीही असो – प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि उच्च-गुणवत्तेची काळजी मिळेल याची खात्री केली पाहिजे.”
*मेडट्रॉनिक इंडियाच्‍या न्यूरोसायन्स आणि स्पेशलिटी थेरपी विभागाचे वरिष्ठ संचालक प्रतीक तिवारी* म्हणाले, “सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) संपूर्ण महाराष्ट्रामध्‍ये स्ट्रोक व्यवस्थापनाला प्रगत करण्‍यासाठी प्रभावी आणि शाश्वत मॉडेल आहे. जनजागृती वाढवत, उपचारांचा वेग निश्चित करत, उच्‍च दर्जाची क्लिनिकल सेवा देत आणि प्रबळ तंत्रज्ञान क्षमतेचा वापर करत पीपीपी मॉडेल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्ट्रोक केअर यंत्रणेला मोठ्या प्रमाणात मजबूत करू शकते. रूग्‍ण निष्‍पत्ती वाढण्‍याच्‍या खात्रीसाठी आणि स्ट्रोकसंदर्भात दिल्‍या जाणाऱ्या उपचार पद्धतींचा दर्जा सुधारण्यासाठी हे प्रयत्‍न अत्यंत मोलाचे ठरतील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!