Business

किया इंडियाने कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही लाइन-अपचा विस्‍तार केला

किया इंडियाने कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही लाइन-अपचा विस्‍तार केला

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 24/03/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) : किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आपल्‍या कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीचे मॉडेल इअर २०२६ (एमवाय२६) एडिशन लाँच केले आहे. या अपडेटमध्‍ये विद्यमान ७-सीटर पर्यायाव्‍यतिरिक्‍त ६-सीटर कॉन्फिग्‍युरेशनसह दुसऱ्या रांगेमध्‍ये कॅप्‍टन सीट्स सादर करण्‍यात आली आहे, तसेच नवीन ट्रिम्‍स आणि नवीन डिझाइन पॅक अपडेट्ससह लाइनअप विस्‍तारण्‍यात आली आहे. एकत्रित, या सुधारणांनी कियाच्‍या पहिल्‍या मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकलला ग्राहकांच्‍या बदलत्‍या पसंतींनुसार अधिक प्रबळ केले आहे.

नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या जीटी-लाइन ट्रिम्‍स (जीटीएक्‍स व जीटीएक्‍स+)मध्‍ये स्‍पोर्टियर विशिष्‍टतेसह वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍टायलिंग सुधारणा, तसेच नवीन अलॉई व्‍हील डिझाइन, लाइम ब्रेक कॅलिपर्स आणि मेटल पेडल्‍स आहेत. याउलट, एक्‍स-लाइन एक्‍स्‍टेण्‍डेड रेंज व्‍हेरिएण्‍टमध्‍ये गडद, अधिक लक्षवेधक आकर्षकता आहे, जी अरोरा ब्‍लॅक पर्लसह विशेष डार्क गन मेटल एक्‍स्‍टीरिअर रंगामधून दिसून येते. नेक्‍स्‍ट-जनरेशन तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये, जसे डिजिटल की आणि सर्वोत्तम हीटर तंत्रज्ञान जीटीएक्‍स+ आणि एक्‍स-लाइन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सादर करण्‍यात आली आहेत. स्‍टॅण्‍डर्ड रेंज ट्रिम्‍समध्‍ये नवीन डिझाइन करण्‍यात आलेले आर१६ ४०.५६ सेमी (१६ इंच) ब्‍लॅक हाय ग्‍लॉस ऐरो अलॉई व्‍हील्‍स देखील आहेत.

एमवाय26 कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये आता 6-सीटर कॉन्फिगरेशनसह दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स देण्यात आल्या असून, यामुळे अधिक आरामदायी आणि प्रीमियम प्रवास अनुभव मिळतो. तसेच 7-सीटर पर्याय जीटीएक्स, जीटीएक्स+ आणि एक्स-लाइन ट्रिम्समध्ये उपलब्ध असून मोठ्या कुटुंबांसाठी अधिक सोयीस्कर ठरतो.

एमवाय२६ लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. अतुल सूद म्‍हणाले, ”कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही इलेक्ट्रिक गतीशीलतेला दैनंदिन वापरासाठी व्‍यावहारिक व संबंधित करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आली. अधिकाधिक ग्राहक ईव्‍हींचा अवलंब करत असताना ईव्‍हींसाठी अपेक्षा तंत्रज्ञानापलीकडे जात आहेत, जेथे अधिक आरामदायीपणा, स्थिर आसन व्‍यवस्‍था आणि विशिष्‍ट डिझाइनसाठी मागणी वाढत आहे. एमवाय२६ मधून नवीन ट्रिम्‍स व ६-सीटर कॉन्फिग्‍युरेशनसह या अभिप्रायाला देण्‍यात आलेला प्रतिसाद दिसून येतो, जे आरामदायीपणा व वैविध्‍यता वाढवतात, तसेच भारतातील ग्राहक महत्त्व देणारी व्‍यावहारिकता कायम ठेवतात.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!