कौटुंबिक ताण आणि नातेसंबंधातील दुरावा ठरतोय मुंबईतील महिलांसाठीचा प्रमुख चिंतेचा विषय : किशोरवयीन मुली शोधत आहेत आधार : एमपावर ची माहिती
किशोरवयीन मुली शोधत आहेत आधार

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 18/03/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या एमपावर उपक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्या विषयी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, या उपक्रमातून मुंबईतील महिलांना त्रासदायक ठरलेल्या मानसिक तणावाला अधोरेखित करण्यात येत असून यामध्ये पारिवारीक संघर्ष, नात्यांमधील तणाव आणि वैवाहिक आव्हानांचा मुकाबला विविध वयोगटांतील महिला करावा लागत आहे. या माहितीतून असे ही समोर येते की किशोरवयीन मुली या सातत्याने आधार शोधत असून यातून असे दिसून येते की वाढती जागरुकता आणि मानसिक आरोग्या विषयीचा तरुण मुलींमधील खुलेपणा पुढे येत आहे.
गेल्या वर्षभरात मुंबईतील एमपावरची समुपदेशन केंद्रे, हेल्पलाईन्स, सामाजिक उपक्रम, शालेय उपक्रम आणि मानसिक आरोग्य सेवा यांच्याकडे निर्माण झालेल्या माहितीतून हे निष्कर्श काढण्यात आलेले आहेत :
यामध्ये ज्यांना आधाराची गरज असते ते :
• यांतील २००,७६० लाभार्थी हे किशोरवयीन (०-१७ वर्ष) असून अधिकतर या शाळा किंवा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संपर्कात आल्या आहेत.
• २२,९४० महिला या १८-२५ वर्ष वयोगटातील असून त्यांनी शिक्षणातील तणाव, करियर मधील अनिश्चितता आणि नातेसंबंधांतील आव्हानांसाठी संपर्क साधाला होता.
• १९,८६४ महिला या २६-४९ वयोगटातील होत्या, त्यांच्या बाबतीत समुपदेशकांना सातत्याने वैवाहिक समस्या, नात्यांतील तणाव आणि पारिवारीक तणावाची जाणीव दिसून आली.
• ५,९६८ महिला या ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या होत्या त्यांच्या कडून पारिवारीक तणाव, एकटेपणा आणि मानसिक तणाव हे काळजी घेण्या मुळे तसेच बदलत्या पारिवारीक गोष्टींची चर्चा करण्यात आली.
मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्या व्यावसायिकांच्या मते सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुली अधिक प्रमाणात येत असल्या तरी सुध्दा तरुण महिलांचे सल्लामसलत सेवा आणि हेल्पलाईन्स कडे होणारा वाढता कल पाहता त्या मदत मिळवण्यासाठी कचरत नसल्याचे दिसून येते.
विविध उपक्रमांमध्ये काऊन्सेलर्सनी असे निरिक्षण नोंदवले की रॉमेंटिक ताण, वैवाहिक तणाव आणि पारिवारीक तणाव यांमुळे अधिकतर महिला या महिलांशी बदलत्या नातेसंबंधांचे घटक, कामाचा ताण आणि शहरातील बदलत्या वातावरणातून निर्माण होणार्या अपेक्षांबद्दल बोलत असतात.
पश्चिम विभागातील तुलनात्मक माहितीवरुन असेच ट्रेन्ड्स दिसून येतात. संपूर्ण पश्चिम भारतातील मानसिक आरोग्य व्यावसायिक हे नातेसंबंधांतील अस्थैर्य, काम-घरचा तणाव आणि मानसिक अस्थैर्य याबाबत चिंता व्यक्त करतात, विशेषकरुन त्यांना कौटुंबिक अपेक्षा आणि व्यावसायिक जाबबदार्यांचा समतोल राखतांना त्रास होत आहे.
एकूणच या माहिती तून हे अधोरेखित होते की शहरी भारतातील महिलांच्या मानसिक आरोग्याच्या अनुभवांना बदलत्या सामाजिक भूमिका, नातेसंबंधांचे दबाव आणि कौटुंबिक अपेक्षा कशा आकार देत आहेत.
या निष्कर्शां विषयी आपले विचार व्यक्त करतांना आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट आणि एमपावरच्या संस्थापिका आणि चेअरपर्सन नीरजा बिर्ला यांनी सांगितले “ महिलांच्या मानसिक आरोग्य हे केवळ वैयक्तिक अनुभवांनी आकार घेत नसते तर त्यांचे रोजचे काम, कुटुंब आणि समाज यांच्या रोज कशा वावरतात यामुळे घडत असते. एमपावरच्या विविध शहरे आणि समाजांमध्ये केलेल्या कामा मुळे आंम्हाला असे दिसून आले की महिला त्यांच्या मानसिक आरोग्या विषयी खुलेपणान बोलत असून आधाराची मागणी करत आहेत. एक समाज म्हणून आपण प्रतिसाद देणे आवश्यक असून सोपे उपाय, घरांमध्ये पापमुक्त पध्दती तयार करणे, कामाच्या जागा आणि समाजात सुध्दा महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.”



