फिलिप्सचे ‘वन शेफ’ : भारतीय घरातील स्मार्ट आणि ‘ऑल-इन-वन’ स्वयंपाकाच्या एका नव्या युगाची सुरुवात
रणवीर ब्रार यांनी मुंबईतआयोजित केलेल्या ‘शेफ्स टेस्टिंग टेबल’ या कार्यक्रमात याचे उद्घाटन झाले.

POSTED BY: MRUNALI SAKPAL DATED ON : 18/03/2026 ( 8850212023 )
मुंबई, 18 मार्च 2026: फिलिप्स होम अप्लायन्सेसने फिलिप्स वनशेफ सादर करण्याची घोषणा आज केली. स्वयंपाकासाठी हे एक नावीन्यपूर्ण, सर्वसमावेशक स्मार्ट उपकरण असून, रोजचा स्वयंपाक सोपा करण्यासोबतच भारतीय घरांसाठी पाककलेचे नवनवीन पर्याय करून पाहण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे.
रणवीर ब्रार यांनी मुंबईतआयोजित केलेल्या ‘शेफ्स टेस्टिंग टेबल’ या कार्यक्रमात याचे उद्घाटन झाले. पदार्थांची चव पाहून, इंटरॅक्टिव्ह फूड स्टेशन्सच्या माध्यमातून भारतातील विविध खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेण्यासाठी पाहुण्यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, ब्रार यांनी वर्सुनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. गुलबहार तौरानी यांच्यासोबत भारतीय पदार्थांच्या चवीशी कुठेही तडजोड न करता स्वयंपाकघरातील आधुनिक तंत्रज्ञान क्लिष्ट पाककृती कशा सहज- करू शकते, हे दाखवून दिले.
हे लॉन्च म्हणजे आधुनिक भारतीय स्वयंपाकघराची पुनर्कल्पना करण्याच्या दिशेने फिलिप्सने टाकलेले नवीन पाऊल आहे. ‘वनशेफ’मध्ये 33 स्मार्ट कुकिंग फंक्शन्स एकाच उपकरणात कार्यरत आहेत. प्रगत ‘अँबीहीट™’ तंत्रज्ञान वापरण्यात आलेले हे उपकरण, योग्य तापमान आणि एकसमान उष्णतेचा वापर करून विविध पदार्थ तसेच स्वयंपाकाच्या टप्प्यांनुसार स्वतःला जुळवून घेते. यामुळे रोजच्या साध्या जेवणापासून ते सणासुदीच्या खास पदार्थांपर्यंत, विविध प्रकारच्या पाककृतींमध्ये एकसारखी चव आणि उत्तम स्वाद मिळतो.
लाँचप्रसंगी गुलबहार तौरानी म्हणाले, “भारतीय घरांमध्ये प्रत्यक्षात स्वयंपाक कसा केला जातो हे समजून घेणे आणि त्यांच्या रोजच्या सवयीच्या गोष्टींमध्ये सहज सामावले जाणारे उपकरण डिझाइन करणे, यावर आमचे नेहमीच लक्ष राहिले आहे. भारतीय स्वयंपाक अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अनेकदा वेळखाऊ असतो. म्हणूनच चवीशी तडजोड न करता प्रक्रिया सुलभ करणारे उपाय अधिकाधिक महत्त्वाचे ठरतात. वनशेफच्या माध्यमातून, आम्ही स्वयंपाकाची अनेक तंत्रे एकाच इंटेलिजेंट प्लॅटफॉर्मवर आणू इच्छितो, जो रोजच्या स्वयंपाकाला अधिक सहज आणि चविष्ट बनवतो. व्यावहारिक आणि उद्देशपूर्ण अशा दोन्ही नावीन्यपूर्णतेद्वारे आधुनिक भारतीय स्वयंपाकघराची पुनर्कल्पना करण्याच्या आमच्या व्यापक वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.”
“भारतीय पाककला अत्यंत वैविध्यपूर्ण आणि बहुआयामी आहे; आणि चवीशी कोणतीही तडजोड न करता, पाककला अधिक सुलभ बनवण्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हेच संतुलन साधण्याच्या उद्देशाने ‘वन शेफ’ची रचना करण्यात आली आहे. यामुळे गृहिणी अधिक सहजतेने आणि आत्मविश्वासाने विविध प्रकारच्या पाककृती करण्याचा प्रयत्न करू शकतील,” असे शेफ रणवीर ब्रार म्हणाले.
वनशेफच्या माध्यमातून, फिलिप्सने एअर फ्रायिंग, स्टर फ्रायिंग, स्टीमिंग आणि बॉइलिंग यांसारखी स्वयंपाकाची अनेक तंत्रे एकाच कॉम्पॅक्ट उपकरणात एकत्र आणत ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दृष्टिकोनामुळे स्वयंपाकघरातील कामाची प्रक्रिया सोपी होते आणि गृहिणी अनेक उपकरणे न हाताळता विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकतात. भारतीय घरांचा विचार करून डिझाइन केलेले, वनशेफचे सहज वापरता येणारे कंट्रोल्स आणि गाइडेड कुकिंग प्रोग्राम्स ग्राहकांना शेफ-प्रेरित पाककृती सहजपणे तयार करण्यास मदत करतात.
या कार्यक्रमात ‘घरगुती स्वयंपाक आणि स्वयंपाकघरातील नवनिर्मितीचे भविष्य’ या विषयावर एका चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रणवीर ब्रार, गुलबहार तौराणी, दिग्दर्शिका फराह खान आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ राजीव मखनी यांचा सहभाग होता. ‘स्मार्ट उपकरणां’मुळे आधुनिक कुटुंबांना दैनंदिन स्वयंपाकाचा अनुभव किती वेगळा आणि आनंददायी वाटतो, यावर प्रकाश टाकला.
किंमत आणि उपलब्धता फिलिप्स वनशेफ हे 19 मार्चपासून क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारखी प्रमुख किरकोळ विक्री दुकाने आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल.
मॉडेल सर्वोत्तम किंमत (रुपयांमध्ये) उपलब्धतावनशेफ Rs. 19,995/- 19 मार्चपासून




