Uncategorized

एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सो़डल्या

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 14/03/2026 📞  8850212023

NEW DELHI  NHI24.COM(M)  एकीकडे इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असताना आता युद्धासाठी कधीही एका पायावर तयार असणारे उत्तर कोरियाचे  सर्वेसर्वा किम जोंग उन  मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने युद्धाचा सराव सुरु केला आहे. उत्तर कोरियाच्या लष्कराने शनिवारी पूर्व समुद्रकिनाऱ्यावरुन 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे  डागली आहेत. ही केवळ क्षेपणास्त्रांची चाचणी असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरिया आणि जपानने 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दक्षिण कोरियाकडूनही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत भाष्य करण्यात आले आहे. उत्तर कोरियाने पूर्वे समुद्रकिनाऱ्यावरुन अज्ञात वस्तू प्रक्षेपित ( संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी) केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. जपान या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याची माहिती जपानकडून देण्यात आली आहे. सध्या दक्षिण कोरियन लष्कराच्या वार्षिक सैन्य कवायती (फ्रीडम शिल्ड) सुरु आहेत. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात असलेल्या पूर्वापार संघर्षामुळे उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाच्या या वार्षिक सैन्य कवायतींना विरोध केला जातो.  उत्तर कोरियाने शनिवारी अचानक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रचंड मोठी लष्करी ताकद, आधुनिक युद्धसामुग्री आणि अणवस्त्रधारी असलेला उत्तर कोरिया या सगळ्या संघर्षात उतरल्यास हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील सर्व देश उत्तर कोरियाच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत.

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आजचा 15 वा दिवस आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. खनिज तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. दरम्यान, इराण युद्धात माघार घेत नसल्याने आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेचे 2500 मरिन कमांडो आणि एक एम्फिबियस असॉल्ट शिप पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका इराणमध्ये एखादी मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. अमेरिकेने उचललेले युद्धाचे पाऊल बेशरमपणाचे असल्याची भूमिका उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!