मनोरंजन कॅटेगरी

देशातील मनोरंजन क्षेत्र २०३० पर्यंत गाठणार २५,००० कोटींचा टप्पा   

मुंबईत जागतिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये अवतरले भविष्यातील अम्युझमेंट पार्क

POSTED BY: MRUNALI SAKPAL DATED ON 11/3/26 (8850212023)

मुंबई, १० मार्च २०२६:

मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आज भारतीय मनोरंजन उद्योगातील सर्वात मोठ्या ‘IAAPI अम्युझमेंट एक्स्पो २०२६’ च्या २४ व्या आवृत्तीचे शानदार उद्घाटन झाले. १० ते १२ मार्च या कालावधीत चालणाऱ्या या तीन दिवसीय प्रदर्शनात जगभरातील १५ देशांतील २१० हून अधिक प्रदर्शकांनी सहभाग घेतला असून, भारताच्या मनोरंजन क्षेत्रातील भविष्यातील झेप येथे स्पष्टपणे दिसून येयेत आहे

यावर्षी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरला तो म्हणजे ‘गजा’ हा अधिकृत मस्कत. हत्तीच्या शक्तीचे आणि आनंदाचे प्रतीक असलेला ‘गजा’ अभ्यागतांचे स्वागत करत आहे. या प्रदर्शनात वॉटर पार्क अट्रॅक्शन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी अनुभव आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित राईड्सचे सादरीकरण करण्यात आले आहे. उद्योगातील वाढत्या विश्वासाचा पुरावा म्हणजे यावर्षी प्रदर्शकांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उद्घाटन प्रसंगी आंध्र प्रदेशचे पर्यटन मंत्री श्री कांडुला दुर्गेश यांनी या क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “भारताचा मनोरंजन उद्योग १५ टक्के वार्षिक दराने वाढत असून २०३० पर्यंत तो २५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश या विकासात आघाडीवर असून आम्ही गुंतवणूकदारांना २५ टक्के भांडवली अनुदान आणि उद्योगाचा दर्जा देत आहोत. अमरावती ते विशाखापट्टणमपर्यंत आम्ही जागतिक दर्जाची मनोरंजन केंद्रे उभारण्यासाठी सज्ज आहोत.”IAAPI चे अध्यक्ष अंकुर माहेश्वरी यांनी सांगितले की, “डिजिटल युगातही प्रत्यक्ष पार्कमधील थरार ही एक अपरिहार्य गरज आहे. आम्ही भारताला जागतिक स्तरावर अट्रॅक्शन्स आणि मॅन्युफॅक्चरिंगचे केंद्र बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत.” या कार्यक्रमात उद्योगाच्या सुरक्षिततेसाठी ‘IAAPI सेफ्टी हँडबुक’चे अनावरणही करण्यात आले. ‘आयएसी कनेक्ट’ आणि ‘सेफ्टी कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून उद्योगातील तज्ज्ञ आगामी काळातील आव्हाने आणि संधींवर चर्चा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!