Business

चुपा चुप्स कंपनीने क्रेझी रॅफे नावाची लांब, ट्विस्टेड जेली आणली बाजारात ज्यामुळे मिळणार मजेशीर खाण्याचा आनंद येणार परत

मजेदार आणि चवदार कँडी खायला आवडणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी खास बनवलेली

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON: 16/3/26 (8850212023)

मार्च 2026: परफेट्टी व्हॅन मेल्ले कंपनीचा कन्फेक्शनरी ब्रँड चुपा चुप्सने क्रेझी रॅफे नावाची नवीन जेली बाजारात आणली आहे, ही जेली लांब, वाकडी-तिरपी असून आतमध्ये फिलिंग आहे, त्यामुळे रोजच्या स्नॅकिंगला मजेशीर ट्विस्ट मिळतो, दिसायला वेगळी आणि मजेदार असल्यामुळे किशोरवयीन आणि लहान मुलांसाठी खास तयार केली आहे. 30 ग्रॅ वजनाची ही जेली ₹20 ला मिळते.

क्रेझी रॅफे तयार करताना एक साधी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली. आजची तरुण पिढी फक्त चव बघत नाही. त्यांना दिसायला मजेदार, खेळता येईल अशी आणि मित्रांसोबत शेअर करता येईल अशी कँडी आवडते. रोजच्या क्षणांत थोडी मजा आणि उत्सुकता आणणारे स्नॅक्स त्यांना हवे असतात. लांब आणि वाकडी-तिरपी आकाराची जेली आणि जिराफपासून प्रेरित डिझाइनमुळे क्रेझी रॅफे साध्या कँडीला मजेशीर अनुभव देते.

या जेलीच्या बाहेर स्ट्रॉबेरी चवीचे कव्हर आहे, जे लाल रंगाच्या 2 छटांमध्ये दिसते, आतमध्ये क्रीमी व्हॅनिला फिलिंग आहे. आंबट आणि गोड चव एकत्र आल्यामुळे खाण्याचा वेगळा अनुभव मिळतो, लांब आणि वाकडी-तिरपी आकारामुळे ही जेली ताणून खाणे, मित्रांसोबत शेअर करणे आणि मज्जा घेत घेत खाणे सोपे होते. ब्रेकमध्ये किंवा मित्रांसोबत गप्पा मारताना क्रेझी रॅफे खाण्यात वेगळी मजा देते.

परफेट्टी व्हॅन मेल्ले इंडियाच्या मार्केटिंग विभागाच्या संचालिक गुंजन खेतान या नवीन सुरुवातीबद्दल बोलतांना म्हणाल्या, “चुपा चुप्स हा ब्रँड क्रिएटिव्हिटी, स्वतःची ओळख आणि मजा यासाठी ओळखला जातो. क्रेझी रॅफेमधून आजच्या किशोरवयीन मुलांसाठी काहीतरी नवीन, मजेदार आणि खेळकर फॉरमॅट देण्याचा प्रयत्न केला आहे. ही फक्त चवीसाठीनाही, तर रोजच्या क्षणांना थोडी मजा आणि वेगळा अनुभव देण्यासाठी आहे. लांब वाकडी-तिकडी जेली आणि आतले फिलिंग यामुळे खाण्यात छोटा सरप्राइज मिळतो. त्यामुळे जेली प्रकारात पुन्हा उत्सुकता आणि चर्चा वाढेल अशी अपेक्षा आहे.”

जिराफपासून प्रेरित पॅकेजिंगमुळे या प्रॉडक्टचा लूक आणखी वेगळा दिसतो, त्यामुळे दुकानाच्या शेल्फवर तो लगेच लक्ष वेधून घेतो. लांब आणि आकर्षक डिझाइनमधून ब्रँडचा अनुभव देण्याचा विचार दिसतो तसेच तरुण ग्राहकांनी रोजच्या छोट्या क्षणांत थोडी मजा आणि आनंद घ्यावा, असा संदेश यातून दिला आहे.

भारतामध्ये कन्फेक्शनरी बाजार सतत बदलत आहे, आता लोकांना फक्त चव नाही, तर मजा देणारे आणि वेगळा अनुभव देणारे स्नॅक्सही आवडत आहेत. चुपा चुप्सने क्रेझी रॅफेमधून तरुणांना आवडेल असा नवीन आणि वेगळी कँडी अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रेझी रॅफेची सुरुवात फेब्रुवारी 2026 मध्ये झाली. सध्या ही जेली भारतभरच्या दुकानांमध्ये ₹20 प्रति पॅक दराने मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!