भारतीय रिअल इस्टेटमध्ये नवा इतिहास एका दिवसात ३०० घरांच्या नोंदणींचा विक्रम
एका दिवसात ३०० घरांच्या नोंदणींचा विक्रम इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON: 19/03/26 ( 8850212023 )
मुंबई दि. १८ (प्रतिनिधी) : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात आजवर कधीही न झालेला एक ऐतिहासिक चमत्कार भारतीय रिअल इस्टेट मध्ये महाराष्ट्रात घडला आहे. पुणे येथील क्रिसाला डेव्हलपर्सने भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात एक ऐतिहासिक विक्रम करत एका दिवसात ३०० हून अधिक घरांच्या नोंदण्या पूर्ण केल्या आहेत. “क्रिसाला ग्रँड रेकॉर्ड रजिस्ट्री” या उपक्रमांतर्गत साध्य झालेल्या या यशाची नोंद “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” आणि “एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” मध्ये एका दिवसात सर्वाधिक मालमत्ता करार पूर्ण करणारे डेव्हलपर म्हणून करण्यात येत आहे.
या प्रक्रियेची पडताळणी आणि प्रमाणित करण्यासाठी दोन्ही रेकॉर्ड संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम केवळ रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठा टप्पा नसून भारताच्या डिजिटल इंडिया या व्यापक दृष्टीकोनाला बळ देणारा आहे. डिजिटल दस्तऐवजीकरण, सुलभ पडताळणी प्रणाली आणि समन्वित नोंदणी प्रक्रियेच्या मदतीने मालमत्ता व्यवहार अधिक पेपरलेस, फेसलेस आणि कार्यक्षम कसे होऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले.
मर्यादित कालावधीत पार पडलेल्या या नोंदणी उपक्रमामुळे शेकडो गृहखरेदीदारांना एका दिवसात सहज आणि सुरळीतपणे मालमत्ता नोंदणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. मोठ्या प्रमाणावर झालेली ही नोंदणी प्रक्रिया एक आधुनिक नवकल्पक आणि पहिल्यांदाच साध्य झालेली कामगिरी आहे.
या विक्रमाबद्दल बोलताना क्रिसाला डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अग्रवाल म्हणाले,“हा विक्रम आमच्या प्रकल्पांवर गृहखरेदीदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. केवळ दोन महिन्यांत फेज १ ‘एव्हरलँड’ आणि फेज २ ‘एव्हरलिन’ या प्रकल्पांमध्ये जवळपास २००० घरांची विक्री झाली आहे. आजचे ग्राहक फक्त घराच्या आकारावर लक्ष न देता संपूर्ण लाइफस्टाइल इकोसिस्टममध्ये गुंतवणूक करत आहेत. या उपक्रमाद्वारे आम्ही तंत्रज्ञान आणि सुयोग्य नियोजनाच्या मदतीने डिजिटल युगात घरमालकीची संकल्पना कशी बदलू शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”




