आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत लीलावती, जेजे हॉस्पिटलचा विजयी प्रारंभ
शतकवीर नितीन कांबळेने केडीए हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुसऱ्या सामन्यात जे.जे

POSTED BY: MRUNALI SAKPAL DATED ON : 23/03/26 ( 8850212023 )
आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सामनावीर संदीप कणसे (३७ धावा) व संतोष पंधारे (३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाचा ५ विकेटने पराभव केला आणि सनसनाटी विजयासह सलामीची लढत जिंकली. शतकवीर नितीन कांबळेने केडीए हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुसऱ्या सामन्यात जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटल संघावर ८ विकेटने धडाकेबाज विजय मिळविला. क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे, क्रीडाप्रेमी संजय कदम व प्रभाकर गोलामडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी रुग्णालयीन क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानात उद्घाटनीय शुभेच्छा दिल्या.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. लीलावती हॉस्पिटलचा मध्यमगती गोलंदाज पराग जाधवच्या (२० धावांत ३ बळी) अचूक गोलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलची दुसऱ्या षटकात ३ बाद १५ धावा अशी बिकट अवस्था झाली. परंतु नितीन कांबळेच्या (५० चेंडूत १०३ धावा) झंझावाती शतकी फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाने मर्यादित २० षटकात ६ बाद १५९ धावसंख्या उभारली. संदीप कणसे (२५ चेंडूत ३७ धावा) व संतोष पंधारे (२५ चेंडूत ३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १८.२ षटकात ५ बाद १६३ धावा फटकावून साध्य केले. दुसऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाज प्रवीण वाघेलाच्या हॅटट्रीकमुळे जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटलचा डाव १५.४ षटकात १०७ धावांमध्ये गुंडाळला. मयुरेश पाटीलने नाबाद ४६ धावा केल्या. शैलेश वाघेलाच्या दमदार अर्धशतकामुळे जे.जे. हॉस्पिटलने दहाव्या षटकाला २ बाद १०८ धावा फटकावून बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द




