देशमहाराष्ट्र

आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडची (एईएसएल) जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये राष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी

४ विद्यार्थी त्यांच्या राज्यांत प्रथम क्रमांकावर

POSTED BY ANAGHA SAKPAL ON DATED 01/03/2026(9004379946)

१,०९४विद्यार्थ्यांनी ओलांडला ९९ पर्सेंटाइलचा टप्पा, तर ४,२७६विद्यार्थ्यांना ९५ पर्सेंटाइलहून अधिक गुण

●  २०विद्यार्थ्यांना एकेका विषयात पैकीच्या पैकी १०० पर्सेंटाइल गुण; १७ विद्यार्थी शहरातपहिल्या क्रमांकावर

●  आकाशएज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडची (एईएसएल) जेईई मेन २०२६ मध्ये उत्तम प्रादेशिक कामगिरी: दक्षिण विभागातून ६,७३६ विद्यार्थी पात्र ठरले, तर पश्चिम विभागातून पात्र ठरलेल्याविद्यार्थ्यांची संख्या ४,७६९

● उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रदर्शन: जेईई मेन २०२६ मध्ये १४ विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्सेंटाइलहून अधिक गुण, ५५ विद्यार्थ्यांना ९९.९५ पर्सेंटाइलहून अधिक गुण, ११३ विद्यार्थ्यांना ९९.९० पर्सेंटाइलहून अधिक गुण, तर ५५८ विद्यार्थ्यांना ९९.५० पर्सेंटाइलहून अधिक गुण

राष्ट्रीय, (NHI@24.IN) आकाशएज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) या परीक्षेसाठी सराव सेवा पुरवणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्यासंस्थेच्या देशभरातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) या परीक्षेत अपवादात्मक कामगिरी करून दाखवली आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरीचे दर्शनघडवल्यामुळे, इंजिनीअरिंगप्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या संस्थांमधील ‘आकाश’चे आघाडीचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

नॅशनलटेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १६फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, एईएसएलने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरीकेली आहे. एकूण ४,२७६विद्यार्थ्यांनी ९५ पर्सेंटाइलहून अधिक गुण प्राप्त केले, त्यापैकी १,०९४ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवले. चारगुणवत्ताधारक विद्यार्थी त्यांच्या राज्यात पहिल्या क्रमांकावर आहेत, तर १७विद्यार्थी शहरांतून पहिले आले आहेत. ‘आकाश’च्यासर्व केंद्रांवरील विशेष कामगिरी आणि सातत्य यांतून दिसून येते.

दक्षिणविभागातून एकूण ६,७३६विद्यार्थी जेईई मेन २०२६ परीक्षेसाठी पात्र ठरले, तर पश्चिम विभागातील ४,७६९ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. यातून आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एईएसएल) दोन्ही विभागांतील दमदार प्रादेशिक कामगिरीचे दर्शन घडते.

राज्यातून प्रथम आलेल्याविद्यार्थ्यांची यादी बघितल्यास, उत्कर्ष खोखर ९९.९९ पर्सेंटाइलगुण मिळवून उत्तरप्रदेशातून प्रथम आला आहे, तर अजैय पी.ने ९९.९९ पर्सेंटाइलगुण मिळवून तमिळनाडूतून प्रथमक्रमांक पटकावला आहे. अभिनव बत्ता ९९.८३ पर्सेंटाइलगुण मिळवून जम्मू-कश्मीरमधून प्रथम क्रमांकावर आला आहे, तर हर्ष अगरवालने९९.७७ पर्सेंटाइल गुणांसह दमन व दिऊमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यातून ‘आकाश’ची जेईई मेन २०२६परीक्षेतील विविध राज्यांमधील उत्तम कामगिरी अधोरेखित होते.

यशाच्यासर्वोच्च स्तरावर:

  • १४विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्सेंटाइलहून अधिक गुण
  • ५५विद्यार्थ्यांना ९९.९५ पर्सेंटाइलहून अधिक गुण
  • ११३विद्यार्थ्यांना ९९.९० पर्सेंटाइलहून अधिक गुण

स्वतंत्र विषयांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत, एईएसएलच्या २१ विद्यार्थ्यांनी एकेका विषयातपैकीच्या पैकी म्हणजेच १०० पर्सेंटाइल गुण पटकावले आहेत: भौतिकशास्त्रात १० विद्यार्थ्यांनी, ८विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्रात, तर ३ विद्यार्थ्यांनी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.

वर्गातीलअध्ययन, संमिश्रअध्ययन तसेच डिजिटल अध्ययन मंच अशा सर्व शैक्षणिक परिसंस्थांमधील एईएसएलची दमदारकामगिरी या निकालांमधून अधोरेखित होते. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, केंद्रीय प्रदेशांतून तसेच डिजिटल मंचांवरून सारखीच उत्कृष्ट कामगिरीझाली आहे.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी)  व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. चंद्रशेखर गरिसा रेड्डी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हणाले: “जेईई मेन २०२६ (सत्र १) परीक्षेतील आमच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमानवाटतो. यानिकालांमधून विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिस्तबद्ध तयारी आणि आमच्या अनुभवी अध्यापकांनी त्यांना केलेले अविरत सहाय्य दिसून येते. आमचे रचनाबद्ध अभ्यासक्रम, कठोर चाचणी पद्धत आणि डेटावर आधारित मार्गदर्शनाचा दृष्टीकोन यांमुळेविद्यार्थ्यांच्या संकल्पना अगदी स्पष्ट होतात आणि त्यांना उत्तम राष्ट्रीयपर्सेंटाइल्स प्राप्त करण्यात मदत होते.

“उत्तमकामगिरी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय सातत्यपूर्ण सराव, स्वयंशिस्त, नियमित चाचण्या, वक्तशीर मूल्यमापन आणि एकाग्र उजळणी पद्धतींनादिले. रचनाबद्धशैक्षणिक मांडणी आणि सातत्यपूर्ण कामगिरी विश्लेषण यांमुळे कच्चे दुवे लवकर ओळखण्यात मदत होते आणि गुणांमध्ये स्थिर पद्धतीने सुधारणा करता येते.वर्षातूनदोनदा घेतली जाणारी जेईई मेन विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी देतेआणि एनआयटी, आयआयटीआदी शिक्षणसंस्थांमध्ये तसेच केंद्राद्वारे प्रायोजित अन्य तंत्रज्ञानसंस्थांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पात्र ठरवण्याकरता जेईई मेनचे गुणग्राह्य धरले जातात. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्सकरता पात्र ठरण्यासहीजेईई मेनचे गुण ग्राह्य धरले जातात.

पर्सेंटाइलबॅण्ड्स आणि विषयवार उत्कृष्टता यांमध्ये उत्तम प्रतिनिधीत्व करणारी एईएसएल इंजिनीअरिंग प्रवेशाच्या तयारीतील विश्वासाचीराष्ट्रीय स्तरावरील संस्था म्हणून आपले स्थान अधिकाधिक भक्कम करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!