सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री
बुधवार 04 मार्च 2026 पासून होणार सुरू

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 26/02/2026 📞 8850212023
- सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 1287 रुपये ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 1352 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
- प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक सोमवार, 02 मार्च 2026 आहे.
- बोली/ऑफर बुधवार 04 मार्च 2026 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 06 मार्च 2026 रोजी बंद होईल.
- बोली किमान 11 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 11 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
- कर्मचारी राखीव भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 128 रु. इतकी सूट दिली जाईल
- रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: Click here
मुंबई NHI24.COM(M): सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेड (“कंपनी”)ने प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) बुधवार 04 मार्च 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक कार्यालयीन एक दिवस आधी म्हणजेच सोमवार, 02 मार्च 2026 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 06 मार्च 2026 रोजी बंद होईल.
सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 1287 रुपये ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 1352 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 11 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 11 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
ऑफरमध्ये सध्याचे प्रवर्तक आणि प्रवर्तक समूह विक्री समभागधारक, म्हणजे मनीष शर्मा आणि अश्विनी अमित दीक्षित, तसेच विद्यमान गुंतवणूकदार विक्री समभागधारक, म्हणजे A91 इमर्जिंग फंड II LLP, एनआरजेएन फॅमिली ट्रस्ट (एंट्रस्ट फॅमिली ऑफिस लीगल अँड ट्रस्टीशिप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे प्रतिनिधित्व केलेले), एक्सपोनेंशिया ऑपॉर्च्युनिटीज फंड II, मेस प्रायव्हेट लिमिटेड, 360 वन स्पेशल ऑपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज 8, 360 वन मोनोपोलिस्टिक मार्केट इंटरमीडियरीज फंड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, एक्सपोनेंशिया ऑपॉर्च्युनिटीज लिमिटेड, सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप, सायरस जमशेद गुजदे, कॅप्रि ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, एसव्हीएस ट्रस्ट नं IV, वेंकटेश इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, हिमांशु कांतीलाल संघवी HUF, देवांग मेहता, अतुल हिरालाल शाह, बकुल हिरालाल शाह, देविनजीत सिंग, पेरुमल रामामूर्ती श्रीनिवासन, भाव्या कपूर आणि राहुल बहरी यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 8,043,300 पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेलमध्ये समावेश आहे.
या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या सदस्यतेसाठी (कर्मचारी राखीव भाग) प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सचे आरक्षण समाविष्ट असून त्यांची एकूण रक्कम 10.00 दशलक्ष रु. पर्यंत आहे (जी ऑफरनंतरच्या पेडअप इक्विटी शेअर भांडवलाच्या जास्तीत जास्त [●] % इतकी आहे).
कर्मचारी राखीव भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 128 रु. इतकी सूट दिली जाईल
2007 मध्ये चार आयआयटी मुंबई अभियंत्यांनी स्थापन केलेली सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स ही कंपनी जागतिक स्तरावर कार्यरत नियंत्रण तंत्रज्ञान कंपनी म्हणून विकसित झाली असून ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सातत्याने विस्तारक्षम आणि क्रांतिकारी नवकल्पना सादर करणाऱ्या मोजक्या मूळ भारतीय पुरवठादारांपैकी एक आहे.
ही कंपनी भारत, युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधील प्रमुख OEMs साठी नियंत्रण-केंद्रित इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECUs) ची अग्रगण्य पुरवठादार आहे. पूर्णपणे इन-हाऊस मालकी हक्काच्या नियंत्रण तंत्रज्ञान क्षमतांसह, सेडेमॅक दुचाकी आणि तीन चाकी वाहने, इलेक्ट्रिक वाहने आणि जनरेटर उपयोजना यांना सेवा पुरवते.
धोरणात्मकदृष्ट्या, कंपनी व्यावसायिक वाहन आणि पॉवर टूल्स विभागात विस्तार करत असून, सेन्सरलेस मोटर कंट्रोलमध्ये यशस्वी प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट प्रात्यक्षिके पूर्ण केली आहेत. व्यावसायिक वाहन प्लॅटफॉर्मसाठी ECUs च्या विकासाचे काम सुरू आहे. त्यायोगे कंपनी पुढील वाढीच्या टप्प्यासाठी सक्षमपणे सज्ज होत आहे.
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. तसेच SEBI ICDR नियमनाच्या 32(1) नुसार, नेट ऑफरपैकी किमान 50% भाग Qualified Institutional Buyers (“QIBs”, आणि असा भाग “QIB Portion”) यांना प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल अशी तरतूद आहे. तथापि, कंपनी BRLMs यांच्याशी सल्लामसलत करून SEBI ICDR नियमनाच्या आधारे विवेकाधीन तत्त्वावर QIB Portion मधील जास्तीत जास्त 60% भाग प्रमुख गुंतवणूकदारांना वाटप करू शकते (“Anchor Investor Portion”). यापैकी 40% हिस्सा म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी राखीव असलेल्या प्रमुख गुंतवणूकदार भागांत कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास Net QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Category”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. आणि SEBI ICDR नियमनानुसार नेट ऑफरपैकी किमान 35% भाग Retail Individual Bidders (“RIBs”) यांना वाटपासाठी उपलब्ध असेल (“Retail Portion”). ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफर किमतीएवढ्या किंवा त्याहून अधिक किंमतीला बोली मिळाल्यास कर्मचारी राखीव भागाअंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना इक्विटी शेअर्सचे प्रमाणानुसार वाटप करण्यात येतील.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील.
कंपनीचे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) आणि (BSE आणि NSE एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अॅव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
Disclaimer:
SEDEMAC MECHATRONICS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with RoC and the Stock Exchanges on February 25, 2026. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, and is available on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.sedemac.com and the websites of the BRLMs, i.e., ICICI Securities Limited, Avendus Capital Private Limited and Axis Capital Limited at www.icicisecurities.com, www.avendus.com and www.axiscapital.co.in respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see ‘‘Risk Factors’’ beginning on page 33 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved, for making any investment decision.
The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the “U.S. Securities Act”) or any state securities laws in the United States, and unless so registered may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, such Equity Shares are being offered and sold in offshore transactions as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales occur.
The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction except in compliance with the applicable laws of such jurisdiction. There will be no public offering in the United States.
