देश

कलाकुसर,​​आराम आणि जबाबदार डिझाइनवर लक्ष केंद्रित करून गोदरेजच्या इंटेरियोचे नवीन सॉफ्ट फर्निशिंग कलेक्शन

~ सॉफ्ट फर्निशिंग श्रेणीतून ₹5 कोटी उत्पन्नाचे ब्रँडचे लक्ष्य ~

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 26/02/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M): गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपमधील एक आघाडीचा फर्निचर ब्रँडइंटेरियो बाय गोदरेजने गाहकांसाठी त्यांच्या गृह सजावटीच्या कलेक्शनचा विस्तार केला आहे. आपल्या घराला एक नवीन लूक देण्यासाठी एक नवीन सॉफ्ट फर्निशिंग कलेक्शन त्यांनी लाँच केले आहे. या नवीन कलेक्शनमुळे आधुनिक भारतीय घरांसाठी डिझाइन केलेले ब्रँड म्हणून इंटेरियोचे स्थान मजबूत होत आहे. तर आरामकलाकुसर आणि शाश्वत आकर्षणावर लक्ष केंद्रित करून राहणीमानाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी केवळ फर्निचर नव्हे तर त्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी उपलब्ध होत असल्याने त्यांचा वेगाने विस्तार होत आहे.

पदार्पणाच्या पहिल्या श्रेणीमध्ये कुशन कव्हरथ्रोटेबल लिननहातमाग कापड आणि हाताने भरतकाम करत तयार केलेले गालिचे यांचा समावेश आहे. हेरलूम नागा सारख्या कारागीर समूहांसोबत भागीदारी करूनब्रँडचा उद्देश स्वदेशी हस्तकला पुनरुज्जीवित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. पारंपरिक वारसा जपतानाच त्याला आधुनिक तंत्राची जोड देत त्याला आजच्या ग्राहकांच्या आवडीनिवडीशी जोडले जाते.

गोदरेजच्या इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुख डॉ. देव नारायण सरकार म्हणालेआधुनिक भारतीय घरे ही पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी आणि महत्त्वाचे म्हणजे नवीन बदल स्वीकारणारी आहेत. ती काम करण्याचीएकत्र येण्याचीआराम करण्याची आणि आपले व्यक्तिमत्त्व दर्शवणारी ठिकाणे आहेत. कार्यक्षमतासौंदर्यशास्त्र आणि टिकाऊपणा असं सगळं ग्राहकांना एकत्र देणारी ही उत्पादने आहेत. आमचे सॉफ्ट फर्निशिंग कलेक्शन याच  संकल्पनेवर आधारित आहे. जो संपूर्ण दुरुस्तीशिवाय आधुनिकताजेतवाने आणि वैयक्तिक आवडीनिवडी जपत इंटीरियर करण्याची लवचिकता देतो. हायब्रिड कामासाठी जागेची रचना करणाऱ्या घरांपासून ते हस्तनिर्मित कापड शोधणाऱ्या डिझाइन-जागरूक ग्राहकांपर्यंतही श्रेणी आज भारतातील अनेक जीवनशैलींचे प्रतिनिधित्व करते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनआम्ही सॉफ्ट फर्निशिंगला वाढीचा एक मजबूत आधार म्हणून पाहतो. डिझाइनवर भर असलेल्या टिकाऊ उत्पादनांसाठी ग्राहकांची मागणी वाढत असताना ही श्रेणी आमच्या गृह समाधान पोर्टफोलिओमध्ये अर्थपूर्ण योगदानाची अपेक्षा करते.”

या कलेक्शनमध्ये नॉन-इम्प्रेशन व्हेल्व्हेट्सटेक्सचर्ड जॅकवर्ड्सहातमागावर विणलेले कापड आणि हाताने भरतकाम केलेले असे वैविध्य आहे. तसेच भारतीय लोकर आणि व्हिस्कोसपासून हाताने बनवलेले गालिचे आहेत. नैसर्गिक रंग आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर यासह टिकाऊपणा या संपूर्ण श्रेणीमध्ये अंतर्भूत आहे. ज्यामुळे दर्जा आणि फिनिशिंगशी तडजोड केली जात नाही याची खात्री होते. सोप्या स्टाइलिंगसाठी डिझाइन केलेले हे कलेक्शन पॅटर्न आणि सॉलिड्समध्ये क्युरेटेड मिक्स-अँड-मॅच देतेज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरांना आधुनिक टच देणे सोपे जाते.

या सॉफ्ट फर्निशिंग कलेक्शनची किंमत 499 ते 22,000 रुपयांदरम्यान आहे. ती मेट्रोटियर 1 आणि टियर 2 शहरांमधील इंटेरिओ स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. येत्या काही महिन्यांत ब्रँडने आपल्या होम ऍक्सेसरीज पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करण्याची योजना आखली आहे.

परिशिष्ट:

सॉफ्ट फर्निशिंग्जच्या श्रेणीमध्ये याचा समावेश:

  • कुशन कव्हर्स (499 – 1,299): इकत प्रिंट्स, गुंतागुंतीच्या भरतकामासह मेडो ब्लूम्स, प्राण्यांच्या प्रिंट्ससह वाइल्ड म्यूज, बौहॉस-प्रेरित भूमितीय, अमूर्त नमुन्यांसह आधुनिक मोझेक, हाताने केलेल्या कारागिरीसह सवाना ट्रायबल आणि बाउकल टेक्सचर्ड फिनिशसह अनेक थीमवर आधारित खास डिझाइन असलेला वैविध्यपूर्ण संग्रह. हे कव्हर्स नॉन-इंप्रेशन व्हेल्व्हेट्स, टेक्सचर्ड जॅकवर्ड्स, पॉली-कॉटन ब्लेंड्स आणि हँडलूम मटेरियलसह प्रीमियम फॅब्रिक्सपासून बनवले आहेत. प्रत्येक कव्हरमध्ये उच्च दर्जाचे YKK झिपर आणि टिकाऊपणासाठी उत्कृष्ट शिलाई आहे.
  • थ्रो (1,500 – 3,300): मऊ आणि आरामदायी साहित्यापासून बनवलेले थ्रो जे कोणत्याही जागेत उबदारपणा आणतात आणि वेगळा लूक देतात, ते कुशन कलेक्शनला आणखी पूरक ठरतात.
  • टेबल लिनन (1,200): अत्याधुनिक स्टाइलिंग आणि सोप्या देखभालीसह जेवणाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेले सुंदर टेबल लिनन.
  • गालिचे (5,000 – 22,000): प्रीमियम इंडियन लोकर आणि व्हिस्कोसपासून हाती बनवलेले गालिचे, ज्यामध्ये विविध पोतांसह हाताने केलेली कारागिरी आहे. या संग्रहात 5 फूट वर्तुळाकार ते 5’x8′ आयताकृती आकाराचे गडद रंग, भौमितिक नमुने, अमूर्त डिझाइन आणि समकालीन आकृतिबंधांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!