झायनोव्हा शाल्बी रुग्णालयात कर्करुग्णांसाठी ऑन्कोलॉजी विभाग सुरू
एकाच छताखाली मिळणार अत्याधुनिक कर्करोग उपचार
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 17/02/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M): देशात सध्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरची वाढती रुग्णसंख्या पाहता झायनोवा शाल्बी हॉस्पिटल्समध्ये कर्करोगाने पिडीत रुग्णांवर उपचारांसाठ ऑन्कोलॉजी विभागास सुरूवात केली आहे. या नव्याने सुरु झालेल्या ऑन्कोलॉजी विभागात कर्करोग तपासणी, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर, बायोप्सी सुविधा, केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीसह एंड-टू-एंड ऑन्कोलॉजी सेवा पुरविली जाणार आहे.
या विभागात वरिष्ठ सल्लागार हेड ॲण्ड नेक ऑन्को-सर्जन डॉ. दीपक खन्ना, हेड ॲण्ड नेक ऑन्को-सर्जन डॉ. जेरुशा फर्नांडिस, वरिष्ठ स्त्रीरोग ऑन्को-सर्जन आणि रोबोटिक सर्जन डॉ. प्रशांत न्याती, वरिष्ठ सल्लागार थोरॅसिक सर्जन आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रिया एशपुनियानी, स्तन कर्करोग आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. संदीप बिप्टे आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हेपेटोपँक्रिटोबिलरी सर्जन डॉ. प्रसाद पांडे आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीप व्होरा कार्यरत आहेत.
कर्करोग हा देशातील प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहे. बदलती जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचा वाढता वापर, आहाराच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, पर्यावरणीय घटक आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यास टाळाटाळ करणे हे कर्करोगास कारणीभूत असे प्रमुख घटक आहेत. स्तन, फुफ्फुस, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, हेड ॲण्ड नेक आणि प्रोस्टेट कॅन्सर यासारख्या सामान्य कर्करोगांचे निदान वाढत्या प्रमाणात होत आहे. उशिरा निदान झाल्यास अवयवांचे नुकसान, मेटास्टेसिस आणि जगण्याचा दर कमी होणे यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात, ज्यामुळे वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
मुंबईतील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे हेड ॲण्ड नेक ऑन्को-सर्जन डॉ. दीपक खन्ना म्हणाले, आमचा ऑन्कोलॉजी विभाग हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेळीच निदान आणि उपचार पुरविण्यास सक्षम आहे. वेळीच निदान आणि योग्य उपचारांमुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता येते आणि कर्करोगावर मात करणे शक्य होते. आम्ही विलंब न करता अचुक तपासणी, कर्करोगाचा टप्पा आणि त्यानुसार कर्करोगावरील उपचार पध्दत सुनिश्चित करण्यावर विशेष भर देतो. केवळ वैद्यकीय व्यवस्थापनच नाही तर, उपचारापासून ते रुग्ण बरा होईपर्यंतचा प्रवास तसेच रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि आजाराच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाला विशेष आधार देणे हे आमचे ध्येय आहे.
डॉ. दीपक पुढे म्हणाले, वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त, याठिकाणी रुग्णांना पुर्ववत आयुष्य जगण्यासाठी आणि आजाराची भिती दूर करण्यासाठी आहाराविषयक मार्गदर्शन आणि मानसिकदृष्ट्या आधार दिला जाईल. या संपुर्ण प्रवासात आमची टीम रुग्णाच्या कुटुंबियांशी संपर्कात राहील आणि त्यांना वेळोवेळी आधार देईल.
आज याठिकाणी ऑन्कोलॉजी विभागास सुरूवात करत आणखी आरोग्य सेवा बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑन्कोलॉजी विभागाची सुरुवात ही प्रगत पायाभूत सुविधा आणि अनुभवी तज्ञांच्या मदतीने योग्य उपचार पुरविण्यासाठी करण्यात आली आहे. हा उपक्रम रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता, उपचारांमधील सुलभता आणि विश्वासाच्या आधारावर राबविला जात असल्याची प्रतिक्रिया झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल्स सीओओ रेनी वर्गीस यांनी स्पष्ट केले.




