गोईंग टू स्कूलकडून बीएमसी आणि ओरॅकलसोबत सहयोगाने मुंबईमध्ये मॅच डे २०२६ लाँच
एसटीईएएम आव्हाने, तंत्रज्ञान आणि लोकप्रिय खेळ फुटबॉलचे उत्साहवर्धक संयोजन

POSTED BY MRUNALI SAKPAL ON DATED 28 FEBRUARY 2026 (9004379946)

MUMBAI (RMN@24.COM)गोईंग टू स्कूल बीएमसीसोबत सामंजस्य कराराच्या (एमओयू) माध्यमातून सरकारी शाळांमधील इयत्ता ५वी ते १०वी तील विद्यार्थीनींसाठी गतीशील भविष्याकरिता सुसज्ज कौशल्ये उपलब्ध करून देत आहे.
ओरॅकलसोबत अत्यंत उत्साहवर्धक सहयोगाच्या माध्यमातून आऊटडोअर स्कूल फॉर गर्ल्स (अँड बॉईज) विद्यार्थीनींना एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत प्रगती करण्यासाठी आवश्यक कौशल्ये देण्यास सज्ज आहे. तसेच, त्यांना शाळेतून कामाच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी किंवा शहरात तिच्या आवडीचा शाश्वत स्टार्टअप सुरू करण्यासाठी सक्षम बनवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
डिझाइन-आधारित कथा, खेळ, फुटबॉल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढी कौशल्ये आत्मसात करत आहेत, ज्याद्वारे त्यांना नवीन पर्यावरणपूरक रोजगार मिळवता येतील. तसेच, ते हवामान बदलावर मात करणारे आणि नवीन पर्यावरणपूरक रोजगार निर्माण करणारे शाश्वत स्टार्टअप्स सुरू करण्यास सक्षम होतील.
मुंबईतील मॅच डे एसटीईएएम, तंत्रज्ञान आणि खेळाचे साजरीकरण होते.
५०० मुले आणि मुली ओरॅकलच्या स्वयंसेवकांसोबत सहयोगाने एसटीईएएम आव्हाने पूर्ण करण्यासाठी या उपक्रमामध्ये सामील झाले होते. प्रत्येक आव्हान सोडवण्यासाठी १ ते १० मिनिटांची वेळमर्यादा होती. एक फेरी संपली की लगेच पुढचे आव्हान, अशा रीतीने ही आव्हाने पार पाडत मुले फुटबॉलच्या मैदानाच्या दिशेने झेपावत होती.
दिवसाची सुरुवात ओरॅकल स्वयंसेवक आणि तरुणांमधील संवादाने झाली. व्यासपीठावरून भविष्यातील रोजगाराच्या संधी, तंत्रज्ञानामुळे तरूणींसाठी उपलब्ध झालेली नवीन पदे आणि एआयचा प्रभावी वापर करण्याच्या पद्धती यावर प्रश्नोत्तरे झाली.
त्यानंतर खऱ्या अर्थाने खेळांना सुरुवात झाली.
एका मोठ्या लीडरबोर्डद्वारे एसटीईएएम आव्हाने आणि फुटबॉलमधील प्रगतीचा मागोवा घेतला जात होता. सर्वजण पूर्णपणे थकून जात नाहीत, तोपर्यंत हा उत्साह सुरू होता आणि शेवटी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या भोजनाचा आस्वाद घेत या उपक्रमाची सांगता झाली.
मुंबई, फेब्रुवारी २८: गोईंग टू स्कूल या सर्जनशील ना-नफा तत्त्वावर आधारित ट्रस्टने बीएमसी व ओरॅकलसोबत सहयोगाने अद्वितीय ‘मॅच डे’चे आयोजन केले. यामध्ये छोट्या फुटबॉल सामन्यांसोबत एसटीईएएम आव्हाने आणि तंत्रज्ञानाचे विशेष संयोजन पाहायला मिळाले.
आपल्याला एकत्र बाहेर पडण्याची आणि खेळण्याची संधी मिळते, तेव्हा तो दिवस नेहमी खास असतो.
मुलांचे २० गट आणि त्यांच्यासोबत असलेले स्वयंसेवक डीजे, एमसीद्वारे नेतृत्वित तंत्रज्ञान आणि फुटबॉलच्या आव्हानांमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक फेरीत कोणता गट विजयी झाला आहे, हे एका मोठ्या लीडरबोर्डवर दाखवले जात होते.
आपल्या मुख्य संकल्पनेला अनुसरून मॅच डे २०२६ हा पूर्णपणे ‘प्लास्टिक-मुक्त’ उपक्रम होता. स्थानिक पातळीवर उपलब्ध भोजन पत्रावळीवर वाढण्यात आले आणि संपूर्ण कार्यक्रमस्थळी हवामान कृतीसंबंधित जनजागृतीचे संदेश देण्यात आले.
‘मॅच डे’च्या निमित्ताने साजरे केले जाणारे ‘आऊटडोअर स्कूल फॉर गर्ल्स अँड बॉईज’ सरकारी शाळांमधील ५ वी ते १० वी तील विद्यार्थीनींसाठी एकात्मिक अभ्यासक्रम राबवते. यामध्ये खेळ (फुटबॉल) आणि त्यासोबत डिजिटल साक्षरता, जीवन कौशल्ये, एसटीईएम व शाश्वत उद्योजकता कौशल्यांचा समावेश असतो. या उपक्रमाची आखणी उत्तमप्रकारे करण्यात आली आहे, ज्यामुळे मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील. तसेच, या मुली भविष्यात हवामान बदलाच्या समस्या सोडवणारे आणि शहरात ‘पर्यावरणपूरक नोकऱ्या निर्माण करणारे शाश्वत स्टार्टअप्स यशस्वीपणे सुरू करण्यासाठी सक्षम होतील.
“मॅच डे नेहमी विलक्षण दिवस असतो. आपल्या सर्वांना एकत्र येण्याची, मोकळ्या मैदानात भेटण्याची आणि तरुण पिढीला स्वतःच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या भविष्यातील कौशल्यांवर चर्चा करण्याची, खेळण्याची आणि आनंदाने शिकण्याची ही उत्तम संधी आहे. ओरॅकल आमचे अत्यंत उत्साहवर्धक भागीदार आहेत, जे मुलींना आणि मुलांना भविष्यासाठी सज्ज करणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्ये शिकवण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आमचे त्यांना जगासाठी सक्षम बनवण्याचे ध्येय सारखेच आहे. शाळेत ओरॅकलच्या स्वयंसेवकांना प्रत्यक्ष मैदानात मुला-मुलींना शिकवताना आणि त्यांच्यासोबत खेळताना पाहणे आनंददायी अनुभव असतो. तरुण पिढी प्रगल्भ कौशल्य असलेल्या प्रमुखांना प्रत्यक्ष भेटते, तेव्हा त्यांना नवीन संकल्पना मिळतात आणि आपणही स्वत:ची व जगाची परिस्थिती बदलू शकणारी कौशल्ये शिकू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी ओरॅकलचे मनापासून आभार!”, असे गोईंग टू स्कूलच्या सीईओ लिसा हेडलॉफ म्हणाल्या.
ओरॅकलद्वारे समर्थित ‘द आउटडोअर स्कूल’ मुंबई, बेंगळुरू आणि उत्तर कर्नाटकातील रायचूर येथे कार्यरत आहे. हा उपक्रम मुला-मुलींसाठी शाळांमध्ये जीवन कौशल्ये, डिजिटल साक्षरता, तंत्रज्ञान आणि एसटीईएएम कौशल्यांचे ज्ञान देतो. यामुळे मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्यास आणि भविष्यात नवीन करिअरच्या संधी मिळवण्यास मदत होत आहे.
ओरॅकल व्हॉल्युन्टिअरिंग: जगभरातील ओरॅकलचे स्वयंसेवकांचे समान ध्येय आहे: समाजहित जोपासत प्रगती साधणे. दरवर्षी, हे स्वयंसेवक शेकडो स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक संस्थांना आपला वेळ आणि कौशल्ये देतात, ज्यामुळे दरवर्षी हजारो व्यक्तींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो.
गोईंग टू स्कूल सर्वजनशील, ना-नफा तत्त्वावर आधारित शिक्षण संस्था आहे, जी डिझाइन-आधारित कथांच्या माध्यमातून तरुणांना, विशेषतः मुलींना गतिमान कौशल्यांसह सक्षम करते. ही कौशल्ये त्यांना शाळेत टिकून राहण्यासाठी आणि शालेय शिक्षणानंतर त्यांच्या आवडीचा उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम बनवतात. याद्वारे तरुण पिढी आजच्या काळातील दोन मोठी आव्हाने म्हणजेच तरुणांमधील बेरोजगारी आणि हवामान बदल यांचे निराकरण करण्यासाठी सुसज्ज होते. www.goingtoschool.com




